२१ दिवसांच्या चॅलेंजच्या शेवटी
२० दिवसांपुर्वी मी एक लक्ष्य निश्चित केले होते की मी दररोज एक लेख लिहीन व वाचकांसोबत शेअर करेन. हे शेअर करण्याचा उद्देश हा होता कि त्यानिमीत्ताने माझा हा संकल्प दृढ होईल. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत मी एकही शब्द लिहिला नव्हता आणि काही लोकांनी मेसेज पाठवले होते की ते माझ्या लेखाची वाट पहात आहेत. त्यामुळे लेख लिहिण्याच्या प्रक्रियेला चालना मिळाली. पहिला लेख लिहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मी अजून काही साध्य करू शकतो, ते लोकांबरोबर शेअर करू शकतो आणि ह्या सर्वांचे एका सामाजिक प्रयोगात रुपांतर करू शकतो. आहारातील साखर कमी करणे, १०० सुर्यनमस्कार घालण्याची क्षमता विकसित करणे आणि मेडिटेशन करणे असे तीन अधिकचे संकल्प निश्चित केले. वाचकांकडून आणि आजुबाजूच्या लोकांकडून मिळालेला प्रतिसाद माझ्या अपेक्षेपेक्षा बराच जास्त होता. माझे बरंचसं लेखन विविध विषयांवर झालं. बरेच लेख माझ्या कामाच्या कृषि, शेतकरी ह्या विषयांवर होते पण ह्या एकमेकांशी जोडलेल्या जगात मला वाटतं ह्या विषयांशी प्रत्येकाचा संबंध दुरान्वये तरी येतोच. हे चॅलेंजच्या स्वरूपात लेखन करण्याआधी काही विषय माझ्या डोक्यात घोळत होते पण त्यावर...