शेतीतील युवापिढी
काही दिवसांपुर्वी मी एक नाशिक जिल्ह्याच्या एका तालुक्यातील शेतीच्या अभ्यासामध्ये सहभागी झालो होतो. त्या अभ्यासामधला एक छोटा प्रश्न होता की तरूण शेतीमध्ये कसे सहभागी होत आहेत? त्यांना शेतीमध्ये रहायचे आहे की अन्य व्यवसायांचा पर्याय त्यांना अधिक चांगला वाटतो. आपली समाजव्यवस्था बरीचशी पुरुषप्रधान असल्यामुळे युवतींनी शेतीमध्ये काहीही केलं तरी ते असलेल्या समाजनियमांना अपवाद असल्याने साधारण समाजातील कल समजून घेण्यासाठी बऱ्याचश्या पुरुष युवकांसोबत ही चर्चा झाली.
ह्या चर्चांमधुन बरेच लक्षवेधी मुद्दे निदर्शनास आले. जिथे शेतीचा खुप चांगला विकास झाला होता, तिथे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली होती आणि शेतकऱ्यांना आपल्या मुलांना चांगले शिक्षण देता आले होते आणि ही मुले शहरांमध्ये बऱ्याच प्रमाणात चांगल्या सुरक्षित नोकऱ्या मिळवू शकली होती. ज्या शेतकऱ्यांना आपल्या उत्पन्नात वाढ करता आली नव्हती त्यांना आपल्या मुलांना उच्चशिक्षण देता आले नव्हते. असे जे युवक होते ते आपल्या शेतीमध्येच राहण्यास इच्छुक होते. ह्या त्यांच्या निर्णयामागील कारणे विचारली तेंव्हा बऱ्याच जणांनी सांगितले की शहरात जाऊन ज्याला सामाजिक प्रतिष्ठा नाही अशी अकुशल कामे करण्यापेक्षा स्वतःच्या शेतात मालक म्हणून राबणे जास्त योग्य वाटते.
हा जो कल आहे तो महाराष्ट्राच्या अन्य भागांमध्ये कसा आहे त्याबद्दल त्याठिकाणी केलेल्या चर्चांशी ताडून बघितले आणि तेथेही समान पॅटर्न मिळाला. पश्चिम विदर्भामध्ये जेथे कोरडवाहू शेतीमध्ये तीव्र समस्या आहेत तेथेही शेतकऱ्यांना स्वतःची मुले शेतीमध्ये राहिलेली नको आहेत आणि त्यांच्या शिक्षणासाठी शेतकरी जमिनी विकण्यापर्यंत पाऊल उचलत आहेत. मराठवाड्यामध्ये एकुणच शेती दुष्काळामुळे कमी उत्पन्नाची आहे तेथेही शिक्षण कमी असण्यामुळे गावामध्ये राहिलेल्या युवकांचे प्रमाण फार मोठे आहे. माझ्या स्वतःच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत शेतकरी त्यांच्या मुलांना शहराकडे कायमसाठी किंवा लांब कालावधीसाठी पाठवण्याकडे प्रयत्नशील असतात. परंतु बरेच युवक शहरांमध्ये असलेल्या अनेक समस्या व कमी प्रतीच्या आयुष्याला कंटाळून गावाला परत येत आहेत.
बऱ्याचश्या ठिकाणी असलेले हे ग्रामीण शेतकरी युवक आधुनिक तंत्रज्ञान व्यवस्थित समजुन घेताना दिसतात आणि डिजिटल गोष्टींचे महत्वही त्यांना पटलेले आहे. व्हॉट्सअॅाप आणि इतर समाज माध्यमांचा वापर ते मार्केटींगसाठी करतात आणि युट्युबचा वापर शेतीतले नवीन तंत्रज्ञान समजुन घेण्यासाठी करत आहेत. काही ग्रामीण युवकांनी त्यांची शेतीसंबंधी स्वतःची युट्युब चॅनल सुरुवात केली आहेत आणि त्याद्वारे ते नवीन तंत्रज्ञान आणि कृषि उद्योजकता इतरांना समजवत आहेत.
अर्थात ह्या सर्व युवकांना दोन वेगळयाच सामाजिक समस्या भेडसावताना दिसल्या. आपल्या एकत्र कुटूंबपध्दतीमध्ये शेती हा सुद्धा कौटुंबिक व्यवसाय असतो. परंतु नवीन तंत्रज्ञान वापरणे व त्यासाठी लागणारा व्यावसायिक धोका पत्करणे ह्या दोन गोष्टींसाठी लागणारे निर्णय स्वातंत्र्य ह्या युवकांना कुटंबप्रमुखांकडून दिले जात नाही. दुसरी समस्या आपल्या पालकांनी विवाह ठरवण्याच्या पध्दतीमध्ये आणि बदललेल्या लिंग गुणोत्तरामध्ये आहे. बऱ्याच इच्छुक वधुंना व त्यांच्या पालकांना शहरातील नियमीत आर्थिक उत्पन्न देणारे वर उपलब्ध असतात त्यामुळे ते ग्रामीण युवकांना कमी पसंती देतात जरी ग्रामीण शेतकरी युवकांचे आर्थिक उत्पन्न अधिक असले तरी. आणि तसेही शेतकऱ्यांचे शेणामातीत घातलेले हात आणि मळके कपडे सेक्सी दिसत नाहीतच.
दिवसेंदिवस आपल्या आधुनिक भारतात शेतीवर असलेले उपजीविकेवरचे अवलंबित्व कमी होत चालले आहे. सध्याची राजकीय व्यवस्था नागरीकरणाला जोरदार प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे भारतातील शेतीचे जे काही भविष्य आहे ते ह्या युवकांच्या खांद्यावर असणार आहे. भारतामधील शेतकऱ्याचे सरासरी वय सध्यां ५३ वर्षे आहे. जेंव्हा हे शेतकरी निवृत्त होतील तेंव्हा जे काही उरले असेल ते ह्या सध्याच्या युवा मनुष्यबळावर अवलंबून असेल. प्रश्न असा आहे की आपल्याला त्यांच्याविषयी काही काळजी आहे का?
---------------------------------

Comments