लोकसंख्या कमी होताना
आपण आपल्या देशातल्या सर्व समस्या वाढलेल्या लोकसंख्येशी जोडत असतो. परंतु असाही एक मोठा वर्ग आहे ज्याची लोकसंख्या कमी होत आहे. त्यांच्याबाबतीत पुढे काय होणार आहे त्याची जाणीव आताच ठेवणे महत्वाचे आहे. अर्थात आपल्या देशातल्या शिक्षित वर्गामध्ये लोकसंख्या कमी होण्याचे परिणाम आताच जाणवायला लागले आहेत. माझ्या स्वतःच्या कुटूंबाच्या इतिहासाकडे पाहिले तरी पुरेशी संख्यात्मक माहिती मिळते. माझ्या पणजोबांच्या काळामध्ये एका जोडप्याला साधारण ८ तरी मुले होत होती. माझ्या आजोबांना ४ मुले झाली. त्या मुलांना पुढे प्रत्येकी प्रत्येकी सरासरी १.५ मुलेच झाली. माझ्या पिढीत ही संख्या ०.६६ वर आली आहे. जसजशी शैक्षणिक पातळी वाढत चालली आहे तसे कमी मुले असण्याचे आर्थिक फायदे लोकांना लक्षात आले आहेत आणि लोक कमी मुलांना जन्माला घालत आहेत.
भारत सरकार आपल्या जनतेला ’हम दो हमारे दो’ चे आवाहन करत होते तेंव्हा चीन सक्तीने एक जोडपे एक मुल धोरण राबवत होता. सध्या चीनमध्ये त्या धोरणाशी संबंधित समस्या जाणवायला सुरूवात झाली आहे. आपल्या सुशिक्षित उच्च आणि मध्यमवर्गाने स्वेच्छेने एक मुल धोरण अवलंबले आहे आणि त्यांच्या समस्याही साधारण चीनसारख्या आहेत. आपल्या एकत्र कुटंब पध्दतीची वीण आतापर्यंत घट्ट असल्यामुळे ह्या समस्या आपल्याला जाणवल्या नाहीत. पण बदलती सामाजिक परिस्थिती पाहता येणाऱ्या काळातले घटत्या लोकसंख्येमुळे तयार होणारे प्रश्न काय असतील व ते आपल्या पातळीवर कसे प्रतीत होतील ते आताच समजून घेणे महत्वाचे आहे.
• आपल्या मुलांना फक्त त्यांच्या पालकांचीच नव्हे तर त्यापेक्षा अधिक लोकांची काळजी घेण्यासाठी जबाबदार रहावे लागणार आहे. एकंदरीत कौटुंबिक पध्दतीत आणि वैयक्तिक दृष्टिकोनामध्ये होणारे बदला पाहता हि मुले आणि त्यांचे जोडीदार त्यांच्या स्वतःच्या पालकांची काळजी तरी किती घेतील हाही प्रश्न विचारात घेतला पाहिजे. विकसित देशांसारखी प्रगत सरकारी मदत व्यवस्था आपल्याकडे अजिबात नसल्यामुळे हा मुद्दा अति महत्वाचा ठरतो.
• आपल्या मुलांना त्यांच्या स्वतःच्या विकासासाठी आपल्याला मिळाली त्यापेक्षा अधिक संसाधने मिळतील. त्याचप्रमाणे त्यांना मिळणारे वारसा हक्काचे लाभही अधिक असतील. अश्या परिस्थितीत ते आळशी बनण्याचा किंवा अल्पसंतुष्ट राहू शकण्याची शक्यता आहे का?
• पुर्वी आपल्या जुन्या एकत्र कुटूंबांमध्ये आपले नातेवाईक कसे आपल्याकडे दुर्लक्ष करतात ह्याच्या कथा ऐकायला लागत असत. फार कमी लोक आपली काळजी घेण्यासाठी राहिलेले असल्यामुळे तश्या कथा आपल्याला दुसऱ्यांना ऐकवता येणार नाहीत. निरोगी राहण्यासाठी स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे हा नियमा अधिक प्रकर्षाने आपल्या पिढीला लागू होणार आहे.
• जुन्या टिकून असलेल्या कौटुंबिक व्यवस्था जश्या ढासळतील तसे आपले स्वतःचे मानसिक आरोग्यही टिकवून ठेवण्याची जबाबदारी स्वतःवरच असेल.
• पुर्वी जसे आपले वडील लोक आपल्या कामांमधून पुर्ण निवृत्त होत असंत तसे आपल्याला कदाचित करता येणार नाही कारण आपल्या काळात आयुर्मान वाढलेले आहे आणि कुटंबावरचे अवलंबित्व कमी झाले आहे.
दुसरा एक महत्वाचा आपल्या तथाकथित सुशिक्षित समाजामधला विचार करण्याचा मुद्दा म्हणजे बिघडलेले लिंग गुणोत्तर. आपल्या संस्कृतीत आपल्याला नेहमी किमान एक तरी मुलगा हवा, वंशाला दिवा हवा ह्याबद्दल ऐकवले गेले आहे. आपल्या पिढीने हे ऐकत असतानाच आपल्या कुटंबाचा आकारही कमी केला आहे. परिणामतः लिंग गुणोत्तराचा समतोल पूर्ण ढासळला आहे. देशाच्या बऱ्याच भागात असलेले स्त्री गर्भ काढून टाकण्याचे प्रकार आमच्या इकडे कोकणात झाले नसले तरी फक्त पहिल्या मुलग्यानंतर बरीच जोडपी पुढच्या मुलाला जन्म न देण्याचा निर्णय घेत आहेत आणि त्यामुळे भविष्यात खुप मोठ्या दुष्परिणामाला सामोरे जायला लागणार आहे.
ह्या विधानाला काही संख्यात्मक आधार आहे का तपासून पाहण्यासाठी मी माझ्या माहितीतल्या व तालुक्यातल्या ४६ जोडप्यांची माहिती घेतली. सर्व जोडपी त्यांच्या तिशी किंवा चाळीशीत असलेली, किमान एक जोडीदार दहावीच्या पुढे काहीतरी शिक्षण घेतलेला आणि त्यांना किमान एक तरी मुल आहे अशी होती. ह्या ४६ जोडप्यांना एकूण ६८ मुले होती व त्यामध्ये ३० मुली आणि ३८ मुलगे होते. ह्यातल्या १६ जोडप्यांना प्रत्येकी एक मुलगाच होता. आता ही मुले जेंव्हा लग्नाच्या वयाची होतील तेंव्हा त्यातील २५% मुलग्यांना स्थानिक परिसरात मुलीच मिळणार नाहीत आणि अन्य परिसरातील माहिती आपल्याकडे नाही. आपल्या स्वतःला सुशिक्षित आणि सुस्थित समजणाऱ्या समाजाची ही अवस्था आहे.
---------------------------------

Comments