प्रसार इनोव्हेशनचा
इनोव्हेशन म्हणजे एखाद्या पध्दतीच्या किंवा साधनाच्या स्वरूपात असलेली एक नवीन सर्जक कल्पना जी एखादी गरज पूर्ण करण्यासाठीचा उपाय असते. आपल्या बाजारआधारीत अर्थव्यवस्थेमध्ये आपल्यावर सतत विविध प्रकारच्या इनोव्हेशनचा जणू वर्षावच होत असतो. त्यामुळे कधी कधी उपलब्ध इनोव्हेशन आपल्याला महत्वाचे आहे किंवा नाही हे सुध्दा आपल्याला समजणे कठीण होत असते. बऱ्याचश्या मोबाईल फोन कंपन्या दर काही महिन्यांनी नवनवीन मॉडेल बाजारात आणत असतात. एक ग्राहक म्हणून आपण कोणत्या मॉडेलचा कोणत्या कंपनीचा मोबाईल फोन घ्यावा आणि त्याचा आपल्याला कसा उपयोग होणार आहे ह्याबाबतीत आपण गोंधळलेले असतो. मला ह्या मोबाईल कंपन्या आपल्या इनोव्हेशन किंवा मार्केटींगचे धोरण कसे आखतात ह्याबद्दल फारशी माहिती नाही पण मी काम करतो त्या शेती आणि सामाजिक प्रकल्पांच्या क्षेत्रात ह्या इनोव्हेशनचा प्रसार कसा होतो त्याबद्दल माझी काही निरीक्षणे मात्र आहेत.
मी एका प्रकल्पावर काम करत होतो ज्यामध्ये भातलागवडीचे श्री नावाच्या तंत्राचा शेतकऱ्यांमध्ये प्रसार करण्यात येत होता. ह्या श्री तंत्रामध्ये शेतकऱ्यांना आपली लागवडीची पध्दत बदलणे आवश्यक होते ज्यामुळे त्यांच्या खर्चात बचत होऊन उत्पादकतेमध्येही वाढ होणार होती. एका सुनियोजित प्रकल्पाचा भाग म्हणून त्यामध्ये किती शेतकऱ्यांपर्यंत पोचायचे, किती कालावधीत पोचायचे आणि किती क्षेत्रावर कार्यक्रम राबवायचा ह्याचे लक्ष्यांक निश्चित होते. आमच्या टिम गावागावांमध्ये जागृती करत होत्या. ह्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी आपली लागवड पध्दती बदलायची होती आणि त्यांना त्यासाठी प्रशिक्षण आणि त्यानंतरचे तांत्रिक मार्गदर्शन देण्यात येणार होते परंतु खते, बियाणे असल्या साहित्याचे मोफत वाटप मात्र फारसे नव्हते. जेंव्हा बरेचसे शेतकरी त्यांच्या ह्या वर्तन बदलाच्या बदल्यात मोफत खते, बियाणे आमच्याकडे मागायला लागले तेंव्हा एक समजून चुकले की आम्ही ज्याचा प्रसार करत होतो आणि गावांमधल्या बहुसंख्य शेतकऱ्यांचे वर्तन ह्यामध्ये मोठा अंतर्विरोध होता.
एक विशेष गोष्ट मात्र लक्षात आली ती म्हणजे काही थोडे शेतकरी मात्र हे सर्वथा नवीन तंत्र स्वीकारण्यासाठी लगेच तयार झाले होते. हे शेतकरी असे होते की जे नेहमीच आपल्या परिस्थितीला अनुरुप असतील अश्या नवनवीन गोष्टी आपल्या शेतीमध्ये अमलात आणण्यासाठी अग्रेसर असत. ह्या शेतकऱ्यांसाठी उत्पन्नामधील अपेक्षित वाढ जास्त महत्वाची होती. त्यामुळे आमच्यासाठी ह्या शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे होते. आम्हाला अपेक्षित असलेले सर्वोत्तम परिणाम ह्या शेतकऱ्यांच्या माध्यमातूनच मिळाले. जर आम्हाला हे इनोव्हेशनचे औचित्य आणि वर्तन ह्यामध्ये असलेले फरक आधीच लक्षात आले असते तर आम्ही प्रकल्पाची धोरणे वेगळ्याप्रकारे ठरवली असती आणि सर्वप्रथम ज्यांना ह्या इनोव्हेशनमुळे खऱ्या अर्थाने लगेच फरक पडला असता त्यांच्यावरच लक्ष केंद्रीत केले असते. त्यामुळे आम्हाला प्रकल्पामध्ये निष्फळ प्रयत्न कमी करता आले असते आणि अर्थात खर्चही.
आता ह्या सर्व प्रसंगाकडे एक शेतकऱ्याच्या दृष्टीकोनातून मला पाहता येते कारण मी स्वतः एक शेतकरी बनलो आहे. विविध लोक त्यांच्या नवीन उत्पादनांच्या आणि तंत्राचा प्रसार व्हावा म्हणून मला संपर्क करत असतात. मी जर एक शेतकरी किंवा ग्राहक म्हणून त्याकडे बघत असेन तर मला सतत नवीन माहीती सजगतेने जमा करायला लागेल आणि व्यवस्थित समजुन घ्यायला लागेल. असे नवीन बदल कदाचित मी सध्या करत असलेल्या प्रक्रीयांमध्ये सवयी मोडणारे ठरू शकतील. हे सर्व लक्षात घेता मला एक ग्राहक म्हणून इनोव्हेटिव असायला लागेल. मला गांभीर्याने विचार करावा लागेल की मी ह्याक्षणी इनोव्हेटीव राहण्यास तयार आहे की नाही? असे बदल करणे सुरक्षित असेल की बाहेरच्या जगात बदल होण्याची वाट पाहणे हुशारीचे ठरेल? कधीकधी घोळक्यांबरोबर राहणे जास्त सोयीचे असते कारण नावीन्यामुळे येणारी संदिग्धता आणि संभ्रम हाताळणे कठीण असते. कदाचित मी हे इनोव्हेशनचा विचारही न करणे पसंत करू शकतो कारण मला त्यावेळेला ध्यानस्थ बसायचे असते किंवा झोप येत असते.
अश्या सगळ्या वर्तनांचा समाजशास्त्रज्ञांनी बराच सखोल अभ्यास केला आहे आणि जुना एक समाजशास्त्रातील नियम आहे ज्याला ’इन्व्हेशनच्या प्रसाराचा नियम (Law of Diffusion of Innovation)’ असं म्हणतात. अधिक माहितीसाठी गूगलचा आधार आहेच.
---------------------------------

Comments