नित्यनेम २१ दिवसांसाठी
परवा आपल्या पंतप्रधानांनी पुढचे २१ दिवस संपूर्ण देश लॉक डाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला. काही निवडक लोक वगळता बहुसंख्य जनता आपल्या घरात बसणार आहे. तुम्ही जर त्या निवडक लोकांमधले नसाल तर मी जे काही लिहीणार आहे ते आजच्या दिवशी तुमच्या परिस्थितीशी संबंधित आहे.
व्हॉट्सअॅिपवरून आलेल्या विनोदांवर आज कदाचित तुम्ही हसला असाल. आज जे काही किराणा दुकानातून तुम्ही आणू शकला आहात ते आपल्या शेजाऱ्याला कसं कळणार नाही ह्याचा प्रयत्न तुम्ही कदाचित केला असेल. कदाचित टाईमपाससाठी नेटफ्लिक्स, युट्युब कडे तुमची बोटं सहज वळायला सुरूवात झाली असेल. वाईटात वाईट म्हणजे कदाचित तुमच्या कुटूंबियांचा सहवास अतिप्रमाणात होऊन आता भांडणांना सुरूवात झाली असेल. आपण भारतीय लॉकडाऊनच्या बाबतीत अन्य जगाच्या काही काळ मागे आहोत. लॉकडाऊन नंतर ज्या प्रकारच्या बातम्या इतर देशातून येत आहेत त्या वाचल्या तर मी ज्या काही शक्यता वरती लिहिल्यात त्या हिमनगाचे टोक आहे असे वाटू लागेल. बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊनमधले लोक तीव्र निराशेने ग्रासले जात आहेत, सततच्या भीतीपुर्ण वातावरणामुळे असहाय्य मनःस्थितीत जात आहेत, घरगुती हिंसाचारामध्ये वाढ होत आहे आणि असं बरंच काही.
जर आपल्या जीवनात काही उपयुक्त आणि सर्जक कृती नसेल तर नकारात्मकता आपल्याला घेरून टाकते. आमच्या रत्नागिरीचे लोक येता जाता म्हणत असतात, ’येकदा नायरी लागली कि जात नाय.’ माझ्या कामानिमीत्त फिरत असताना देशाच्या बऱ्याच ग्रामीण भागामध्ये हा अनुभव येतो की शेतातील पिकं कापून झाली की लोकांना पाण्याअभावी काही रोजगार नसतो आणि गावांच्या नाक्यानाक्यांवर अश्या लोकांचे घोळके सकाळच्या वेळीच जमा होऊन नकारात्मक गोष्टींचे चर्विचरण करत राहतात. शेतकरी आत्महत्या, व्यसनाधीनता असं सगळे प्रश्न ह्याभागातच दिसून येत आहेत. काही चांगल्या सकारात्मक गोष्टींसह तुम्ही त्यांना भेटलात तर तुम्हीच नाउमेद होऊन परत येता. इथे काही बदल घडणं शक्य नाही आणि ह्या जगाचा अंत झाला तरच ह्यातून सगळ्यांची सुटका होईल असं तुम्हाला वाटून जातं.
मी साधारण नऊ वर्षांपासून स्वतःचे विचार स्पष्ट व्हावेत आणि इतरांपर्यंत ते पोचवता यावेत म्हणून लिखाण करत आहे. पण बरेचसे लिखाण मूड किंवा तात्कालिक कारणे ह्यामुळे झाले आहे. २०१०-११ मध्ये घानामध्ये असताना मी नियमीत लिखाण करत होतो. उद्देश होता अर्थातच माझे हे विशेष परदेशी अनुभव नोंदवून ठेवता यावेत आणि ह्या खास गोष्टी भारतातल्या आप्त, मित्रांना पोचवता याव्यात. आताचे कारणही तसेच तात्कालिक आहे. लिखाण म्हणजे एक सर्जक कृती आहे. त्यासाठी विचार करणे, योग्य शब्द निवडणे आणि ते कागदावर उतरवणे ह्या सगळ्याचेच कौशल्य लागते. आजपासून येणारे २१ दिवस ह्या कौशल्याचा वापर करायचे ठरवले आहे आणि त्याद्वारे सकारात्मकता तयार करण्याचा माझा वाटा उचलायचे ठरवले आहे.
माझे नियोजित लिखाण बहुविध विषयांवर असेल. दररोज एक लेख प्रत्येकी मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहीण्याचा संकल्प केला आहे. मराठीचे वाचक बरेचसे मराठी भाषिक असतील आणि इंग्रजीचे बहुसांस्कृतिक असतील हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे बदल असू शकेल. मित्रांनो, येत्या दिवसात एकूण ४२ लेख माझ्याकडून लिहीले जातील आणि ह्या माहितीजालावर पसरतील. प्रत्येक लेख ६०० पेक्षा अधिक शब्दांचा नसेल आणि ५ पेक्षा कमी मिनीटांमध्ये वाचून होईल. योग्य वाटले तर जरूर पुढे शेअर करा. तुमच्या कॉमेंट मला नक्की पाठवा. काय वाचायला आवडेल तेही कळवा. मी प्रत्येकाला उत्तर देईनच असे नाही पण वाचेन मात्र नक्की.
शुभेच्छा!

Comments