३ संकल्प – भाग १
माझ्या कामाच्या निमीत्ताने मला बराच प्रवास करावा लागत असतो. कधी बाहेर पडायचं, कधी परत यायचं ह्याचे निर्णय मला एकट्याला घेता येत नाहीत. मी बऱ्याच चांगल्या सवयींना सुरुवात करतो आणि प्रवासाला बाहेर पडलं की त्या सवयींची नियमीतता तुटते. प्रवासामुळे माझं वेळेचं चक्र कायम बिघडलेलं असतं. कुठे काही गोष्टी पुर्ववत करायला जावं तर पुढच्या प्रवासाचं नियोजन चालू झालेलं असतं आणि नाहीतरी आता त्या चांगल्या सवयींमध्ये खंड पडणारच असणार असतो तर कशाला त्या बद्दल चिंता करा असे विचार मनात येतात आणि ती चांगल्या सवयींची साखळी तुटलेली असते.
येते २१ दिवस मी कुठेही प्रवास करणार नाही हे नक्की. त्यामुळे मी त्यांच्याकडे चांगल्या सवयी अंगी बाणवण्याची सुसंधी म्हणून बघतो आहे. ह्या चांगल्या सवयी आरोग्याशी निगडीत आहेत. पहिली सवय म्हणजे नियमीत व्यायाम, दुसरी मेडीटेशन (त्याला चपखल मराठी शब्द कोणाला माहीत असेल तर सुचवा.) आणि तिसरी सवय आहारातून अति प्रमाणात असलेली साखर हटवणे. ह्या सर्व सवयींवर काम करायला मी करोनाचे संकट येण्याआधीच सुरूवात केली आहे पण आता मी त्याला आता संकल्पाचे स्वरूप देऊ शकतो आणि योग्य न्याय देऊ शकेन असं वाटतं. ह्या सर्व सवयींचा आपल्या रोगप्रतिकारक्षमतेशी संबंध आहेच. करोनावर सध्या तरी काही औषध नाही त्यामुळे तुमच्याकडे जी काही रोगप्रतिकारक्षमता असेल तिचाच तुम्हाला आधार असणार आहे.
ह्या पोस्ट मध्ये व्यायामाबद्दल लिहीतोय. जे कोणी मराठी माध्यमाच्या महाराष्ट्र एसएस्सी बोर्डाच्या शाळेत शिकले आहेत त्यांना शाळेत सक्तीने सुर्यनमस्कार घालायला लागले असतील. आता तुम्ही शाळेत नाही त्यामुळे सक्ती करायला कोण येणार नाही. जर हे तुमच्या स्वेच्छेने घातले तर व्यायामासाठी दुसरं काही करायची गरज लागणार नाही. संसर्गाच्या शक्यतेमुळे मैदाने, जिम, योगवर्ग, झुंबा डान्सक्लब, हास्यक्लब सगळे बंद आहेत. सुर्यनमस्कार मात्र तुम्हाला घरच्या घरी घालता येतील.
सुर्यनमस्कारांमध्ये तुमच्या स्नायुंची हालचाल होते त्यामुळे तुमच्या शरीरात स्नायुंमध्ये साठलेली चरबी बाहेर निघायला मदत होते. सुर्यनमस्कारामधली प्रत्येक स्थिती हे एक योगासन आहे त्यामूळे योगामध्ये असलेला मन एकाग्र होण्याचा आणि तदनुषंगिक मानसिक आरोग्य सुधारण्याचाही फायदा होतो. जर तुम्ही माझ्यासारखे लकी असाल आणि थोडी मोकळी सुर्यप्रकाश मिळेल अशी जागा असेल उदा. आवार किंवा गच्ची तर खुल्या हवेतील ऑक्सिजन तुमच्या शरीरात आपसूकच खेचला जाईल. नाहीतरी सध्या शहरांमध्ये वाहतुक संपल्यामुळे, कारखाने चालत नसल्यामुळे प्रदुषणाचे प्रमाण जवळजवळ शुन्यावर आले आहे. त्याचा फायदा जास्तीत जास्त उठवता येईल. हे सुर्यनमस्कार सकाळी सुर्योदयानंतर सकाळी ८ च्या आधी जर घालता आले तर शरीर ड जीवनसत्वही स्वतःच तयार करेल. त्यासाठी गोळ्या घ्यायची गरज पडणार नाही.
आणि हो तुम्ही जिममध्ये जाणारी बॉडीबिल्डर टाईपची व्यक्ती असाल तरीही त्याचा उपयोग होऊ शकतो कारण सुर्यनमस्कारांमध्ये तुमच्या शरीराच्या वस्तुमानाएवढ्या वजनाची तुम्हाला हालचाल करायची आहे त्यामुळे तुमच्या स्नायुंचा पीळ जाणार नाही एवढं निश्चित पणे सांगू शकतो. मी दररोज सरासरी २० सुर्यनमस्कार घालतोय गेला महिनाभर आणि माझे बायसेप जे पुर्वी सहज दिसत नव्हते ते आता दिसत आहेत त्यामुळे काळजी नसावी. :-D.
मी सध्या एकावेळेस ६० सुर्यनमस्कार घालू शकतो. लॉकडाऊनचे जाहीर केलेले २१ दिवस संपतील तेंव्हा १०० सुर्यनमस्कारांपर्यंत पोचण्याचा मानस आहे. २१ व्या दिवशी काय परिस्थिती आहे ते कळवेनच.
आपण करोना विषाणुच्या संसर्गाची साखळी घरात बसून तोडणार आहोत तेंव्हा ह्या चांगल्या सवयींची साखळी निर्माणही करू शकतो. तुम्ही काय ठरवलंय? जरुर कळवा.

Comments