३ संकल्प – भाग २: मेडिटेशन
मेडिटेशनला बरेच जण ध्यानधारणा असा मराठी प्रतिशब्द वापरतात. पण ध्यानधारणा ही योगशास्त्रातील संकल्पना आहे आणि मेडिटेशन ह्या इंग्रजी शब्दाचा बराचसा अर्थ हा लक्षपुर्वक चित्त एकाग्र करणे असा होतो जो कि त्यापेक्षा वेगळा आहे. मला त्यासाठी नेमका प्रतिशब्द मिळत नसल्यामुळे मी इंग्रजी शब्द जसाच्या तसा वापरणार आहे.
गेली १४ वर्षे मला अर्धशिशीचा त्रास होतोय आणि कधीकधी तीव्र प्रमाणात असतो. मला आठवतंय की मी २०१० मध्ये घानाला जाण्यासाठी विमानात पाऊल ठेवलं तेंव्हा मनाला बजावलं होतं की मला हा त्रास पुढचे एक वर्ष कधीच होणार नाही. मला आल्यानंतर ८ महिन्यात हा त्रास अजिबात झाला नव्हता आणि मी त्याच्या आनंदात होतो. जेंव्हा फेब्रुवारी महिना सुरू झाला तेंव्हा तापमानात एकदम १०० से. वाढ झाली. एक दिवस मी एका कार्यशाळेत असताना गटचर्चा चालू असताना मला अचानक अर्धशिशीचा त्रास सुरू झाला. असलेलं काम मी माझ्या मित्राकडे जोशुआकडे सोपवलं आणि माझ्या सुदैवाने तिकडे असलेल्या एका गेस्टरुममध्ये पडून राहिलो. त्याक्षणाला मी फक्त डोक्याच्या अर्ध्या भागात सुरू असलेले वेदनांचे आवेग, पोटातली मळमळ आणि त्यामुळे आलेली हतबलता एवढ्या गोष्टींकडे लक्ष देउन पडून राहिलो होतो. तेवढंच माझ्या हातात होतं. मेडिटेशनमध्ये तुम्ही नेमकं तेवढंच करत असता. ते सोपं नसतं आणि त्यातही एक कौशल्य आहे.
भारतात परतल्यावर मी योग, माईंडफुलनेस (ह्यालाही मराठी प्रतिशब्द माहीत नाही) ह्याबद्दल शिकून घेतले आणि दहा दिवसांचे अतिशय कठीण असे विपश्यनेचे शिबीरही पूर्ण केले. त्याचा फायदा झाला पण त्याचा नियमीत सराव मात्र कधी केला नाही. हे सगळे विषय गहन, तात्विक आणि अध्यात्मिक आहेत. त्याच्याबद्दल वाचावे, चर्चा विवाद करावेत तितके कमी आहेत. मी ते ही थोडंफार केलं पण त्याचा सराव मात्र जास्त केला नाही. त्याची सवय कधी लागली नाही.
पुढचे २० दिवस मी हे नियमीत करायचं ठरवलंय. हा सराव इतका व्यवस्थित होईल की तो माझ्या दिनक्रमाचा भाग होईल कायमचा अशी आशा बाळगुन आहे. दररोज पहाटे अर्धा तास त्यासाठी वेगळा वेळ देणार आहे. मेडिटेशनमध्ये एक समजण्यास सोपे तंत्र म्हणजे आपल्या श्वासाकडे लक्ष देणे. दुसरा सराव म्हणजे दिवसातुन काही वेळ तुमच्या शरीरात तयार होणाऱ्या संवेदनांकडे लक्ष देणे. हे वाचायला सोपे आहे पण प्रत्यक्षात तसे करताना तुमचे मन इतके विचार बाहेर फेकत राहते की श्वासाप्रती एकाग्रता निर्माण होण्यास फार कठीण असते.
भारतामध्ये मेडिटेशनच्या बाबतीत दोन वेगवेगळे मतप्रवाह आहे. एक योगशास्त्रावर आधारीत आहे तर दुसरा विपश्यनेवर. मी योगामध्ये प्रशिक्षण घेतलेले असले तरी मला स्वतःला विपश्यना तंत्र अधिक जवळचे वाटते. गेली कित्येक वर्षे मेडीटेशन हा वैज्ञानिक संशोधनाचा विषय राहिलेला आहे. ताणतणाव, भीतीग्रस्तता, नैराश्य अश्या अनेक व्याधींवर त्यामुळे होणारा फायदा सिध्द झालेला आहेच पण नवीन संशोधनानुसार आपल्या शरीराची रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यास मेडिटेशनचा फायदा होतो असे आढळून आलेले आहे. त्यापलिकडे हे नक्की सांगता येईल की आपल्या स्वतःच्या पलिकडे एक वैश्विक सत्य आहे आणि आपले अस्तित्व हे त्याचा भाग आहे ह्याची जाणीव थोडी जरी निर्माण झाली तरी त्यामुळे रोजच्या व्यावहारीक आयुष्यात बदल घडतो.
तुम्ही मेडिटेशन करण्यास तयार आहात का? तुमचा त्याबद्दल काही अनुभव आहे का? जर नव्याने सुरूवात करणार असाल तर कोणी चांगल्या तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन जरूर घ्या. २० दिवसांनंतर काय बदल होतील त्याबद्दल एकमेकांना सांगूच.
शुभेच्छा!

Comments