३ संकल्प – भाग ३: भयकारक साखर
मला माझ्या पणजोबांच्या, आजीच्या वडलांच्या, दोन गोष्टी आठवतात. ते जेंव्हा आमच्याकडे मुंबईला यायचे तेंव्हा त्यांच्या कडक शिस्तीच्या स्वभावामुळे आम्ही पंतवंडे त्यांच्या फार जवळ राहायचो नाही. पण तरीही ते यायचे तेंव्हा त्यांच्याभोवती जमा होत असू कारण त्यांनी सोबत प्रत्येकासाठी श्रीखंडाच्या गोळ्यांची पाकिटे आणलेली असायची. ती नंतर अर्थात आजीच्या ताब्यात जायची आणि मग प्रत्येकाला दिवसाला दोन गोळ्या हातावर मिळायच्या. तेवढ्या गोळ्यांवर आम्ही बऱ्यापैकी खुश असायचो. सणाच्या दिवशी, रविवारी घरात बनणाऱ्या गोड पदार्थांची तेंव्हा आतुरतेने वाट पहात असू. लाडू, शंकरपाळे इ पदार्थ दिवाळीला वर्षातून एकदाच बनत होते. साखरेचं प्रमाण आहारात एकंदरीत खुपच कमी होतं कितीही गोड आवडत असलं, आणि ते खाण्याची सतत इच्छा होत असली तरी.
मी शिक्षण संपवून मग वेगवेगळी गावं फिरून परत मुंबईत आलो. तिथल्या ऑफीसमध्ये काम करायला लागल्यावर माझ्या गोड खाण्याच्या आवडीला सर्वतोपरी पोषक वातावरण मिळालं. पुर्वी अप्रुप असलेले गोळ्या, लाडू, शंकरपाळे इ पदार्थ हे सहजपणे घराजवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध होत होते त्यामुळे महिन्यातुन कधी कधी आणले जात होते. ऑफिसमध्ये चहा, कॉफी पाहिजे तेवढं उपलब्ध होत होते. ऑफिसमधले मीनुभाई सर्वांना प्रेमाने आग्रहाने ते पीऊ घालत असत त्यामुळे त्याचे सेवन अंमळ जास्त होत होते. मेंदूला बराच ताण द्यावा लागत असल्याने त्याची एक तलफ तयार झाली. पुर्वी सहज उपलब्ध नसलेले केक, डोनट, ब्राउनी कोणी ना कोणी तरी लंच टेबलवर सगळ्य़ांसाठी म्हणून आणून ठेवत असत. माझा सहकारी आणि मित्र किरण माझ्यासारखाच गोड आवडणारा होता. मग आमची जोडी ऑफिसजवळच्या एका जिलबीवाल्याची नियमीत गिऱ्हाईक बनली. किरण नियमीत व्यायाम, विपश्यना ध्यान करत होता आणि मी मात्र करत नव्हतो.
असं काही वर्षे चालत राहीलं. माझ्या आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या मेव्हणीने एकदा माझ्या हाताची नाडी तपासली. तुला कधीही मधुमेह होऊ शकतो तुला आतापासून काळजी घ्यायला हवी असं सांगितलं. माझ्या दुसऱ्या एका डॉक्टरनेही सहज सांगितले की बघ साखर कमी करता येते का?. मी इतकं काही ते गांभीर्याने घेतलं नव्हतं. एकेदिवशी HbA1C तपासलं तर ते वाढलेलं मिळालं तेंव्हा मग काहीतरी करायला पाहिजे असं ठरवलं. साखर दोन दिवस अजिबात खाल्ली जाणार नाही असं बघितलं. आणि काही परिणाम लगेचच मिळाले. सतत मूड बदलणे थांबले, त्वचेशी संबंधित समस्या कमी झाल्या, अधुन मधुन होणारी डोकेदुखी थांबली. पण हे बदल अल्पकाळ टिकले कारण साखरेचं ये रे माझ्या मागल्या परत सुरू झालं होतं
साखरेचे आरोग्यावर होणारे दुष्परीणाम सर्व प्रकारच्या संशोधनातून सिध्द झालेले आहेत. गरजेपेक्षा अधिक साखर तुमची रोगप्रतिकारक्षमताही कमी करू शकते असे संशोधनही उपलब्ध आहे. पण जेवढी जनजागृती आहारातल्या मेदाबद्दल केली जाते तेवढी साखरेबाबत कोणी करत नसतं. त्याला साखरेचे जागतिक अर्थकारण आणि त्यांची मजबुत लॉबी कारणीभुत आहे. जर साखरेचे वाईट परीणाम आपल्याला जाणवले असतील तर आपले आपणच त्यावर उपाय करायला लागतील. तुमची स्वतःची मानसिक स्थिती आणि आजुबाजुचे वातावरण तुम्हाला तसे करू देत नाहीत. तुमची एखाद्या पदार्थाविषयी आसक्ती, विविध जाहिरातींचा मारा, लोकांचा आग्रह, दुकानांमधले आकर्षक डिस्प्ले, कधी उरलेले पदार्थ वाया घालवायचे नाही म्हणून ते पोटात ढकलले जाणे आणि असे अनेकविध घटक तुम्ही काय खाता हे ठरवत असतात. हे घटक म्हणजे एक प्रकारचे अडथळेच असतात. आपण आपल्या शरीराच्या खऱ्या गरजेकडे बऱ्याच वेळा लक्षच देत नसतो.
हे लक्षात घेऊन माझा पुर्वी केलेला आहारातून साखर कमी करण्याचा प्रयोग पुढे काही दिवस सलग करणार आहे. घरात राहिल्यामुळे सामाजिक अडथळे तरी नसणार आहेत. सकाळचा पहिला चहा कदाचित सोडता येणार नाही (मानसिक अडथळा :-D ) पण बाकी दिवसभर कुठल्याही प्रकारे साखर शरीरात जाणार नाही हे पाहणार आहे.
बघु काय फरक पडतो ते!

Comments