एक आर्थिक-मानसिक प्रयोग
शेतकरी आत्महत्या हा मुद्दा सध्या सतत इतका चर्चिला जातो की लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरूवात केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार दरवर्षी साधारण सरासरी १३,५०० शेतकरी आत्महत्या करतात. जर तुलनात्मक विचार करायचा झाला तर आतापर्यंतची २००४ पासूनची सर्वात मोठी आपत्ती म्हणजे उत्तराखंडचे पूर ज्याच्यामध्ये त्यापेक्षा कमी म्हणजे ४००० लोक मरण पावले होते.
माझ्या विदर्भामधल्या शेतीविषयक प्रकल्पांमधील कामामुळे शेतकरी आत्महत्या हा विषय जवळून व थेट समजून घेण्याची संधी मिळाली. मानसशास्त्रातील संशोधनानुसार हे सिध्द झाले आहे की आत्महत्येच्या निर्णयाप्रति पोचण्याआधी त्या व्यक्तीमध्ये मानसिक ताणतणाव टोकाला पोचलेले असतात. माझ्या शेतकऱ्यांच्या चर्चांमध्ये हे मुद्दे येत असत. निव्वळ पावसावर आधारीत शेतीवर पूर्ण अवलंबित्व, आणि त्या पिकांमधून वर्षातुन एकदाच मिळणारे घाऊक उत्पन्न ह्याबद्दल ते प्रकर्षाने बोलत असत. अन्य आर्थिक उत्पन्नाचे स्रोत त्यांच्याकडे नसत आणि उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असत. जे उत्पन्न होते ते असुरक्षित आणि अशाश्वत होते. त्यामुळे त्यांच्या जीवनात प्रचंड ताण निर्माण होत होता.
काही वर्षांनी मी नोकरी सोडून स्वतंत्र व्यवसाय करायला सुरूवात केली तेंव्हा स्वतःला त्याच सदृश परिस्थितीत असलेले बघायला मिळाले. आर्थिक उत्पन्न कमी होते आणि पूर्ण अनियमीत होते. माझी बचत वापरली जात होती आणि कर्जही वाढत चालले होते. दररोज मी होऊ घातलेल्या खर्चासाठी रक्कम कशी उभी करायची ह्याच्या चिंतेत असे. त्याचा मानसिक ताण येत होता आणि त्याचा परीणाम निर्णयक्षमतेवर होत होता. एकदा सकाळी उठल्यावर मला आम्ही पुर्वी गावात लोकांबरोबर वापरत असलेल्या उत्पन्न खर्चाच्या प्रक्रियेची आठवण झाली. त्याचा माझ्या स्वतःच्या परिस्थितीच्या आकलनासाठी वापर करून बघायचं ठरवलं.
पुढच्या प्रत्येक महिन्यात होणाऱ्या प्रत्येक रुपयाच्या खर्चाची नोंद ठेवली. आधीच कमी आणि कधीतरी मिळत असलेले उत्पन्नही नोंदवत गेलो. मग एकदा कॉम्प्युटरमध्ये एक्सेलवर सर्व एंटर केले आणि एक व्यवस्थित कल मिळत गेला. मासिक खर्चाची एक किमान रक्कम काढता आली. त्यानंतर वर्षात होणारे काही एकरकमी खर्च लक्षात आले. कुठे खर्चात कपात करता येईल त्याचे मुद्दे समजून घेता आले. अश्याप्रकारे खर्चाचे एक नियोजन तयार झाले. पुढील काम त्यामुळे सोपे झाले.
आता मी उपलब्ध उत्पन्नातून एक विशिष्ट रक्कम खर्चासाठी बाजुला काढून ठेवतो. महिन्याच्या निश्चित अश्या खर्चाच्या रकमेसाठी प्रत्येक महिन्यात मॅच्युअर होतील आणि परत गुंतवले जाणार नाहीत अश्याप्रकारे मुदत ठेवी करून ठेवतो. जवळ अधिक असलेले पैसे परत बचतीमध्ये जातात. पुढच्या काही महिन्यांची अशी सोय लागल्यामुळे तेवढा मानसिक ताण कमी झालेला असतो आणि निर्णयक्षमताही सुधारलेली असते. त्यामुळे माझ्या अशाश्वत अश्या आर्थिक उत्पन्नाच्या वाढीसाठी काम करण्यावर लक्ष केंद्रीत करू शकतो.
सध्याचे बरेचसे शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी असलेले प्रकल्प त्यांच्या आर्थिक उत्पन्नावर लक्ष केंद्रीत करतात. त्यांचे प्रयत्नही बाह्यस्वरूपाचे असतात. उदा. पिकांची उत्पादकता वाढवणे, बहुपीक पध्दतीचा प्रसार करणे किंवा कर्जाची उपलब्धता सोपी करणे इ. परंतु शेतीआधारीत आर्थिक उत्पन्नाची अनिश्चितता कमी करता येणे कठीण आहे. मला घानामधल्या काही निरक्षर परंतु हुशार महिलांशी झालेले बोलणे आठवते. त्यांच्या भागात कुठल्याच बॅंका नाहीत पण त्यांना माहित असतं की वर्षामधल्या एका विवक्षित महिन्यामध्ये आपला खर्च तर होणार आहे. त्याच्यासाठी लागणारा पैसा त्यावेळेस विक्रीला तयार होतील अश्या कोंबड्यांच्या स्वरूपात त्यांनी ठेवलेला असतो. मला वाटतं सुदुर पसरलेल्या बॅंका आणि ४जी नेटवर्क असलेल्या भारतात आपण शेतकऱ्यांसाठी जास्त काही करू शकतो.
--------------------------

Comments