Posts

Showing posts from 2020

कोकणी खाद्यकथा- ३

एका भल्या सकाळी संपर्कात असलेल्या एका जरा सुशिक्षित  आणि सामाजिक कार्यात रस असणाऱ्या माणसाचा फोन आला. “तुम्ही इतके दिवस येताय पण आमचे लोक काही साथ देत नाहीत. पण गावात काहीतरी चांगलं व्हायलाच पाहिजे. आज संध्याकाळी याच. गट स्थापनच करून टाकू. जेवायला आमच्याकडेच या.” “जास्त त्रास करून घेऊ नका.” इति मी. “अहो त्रास कसला आलाय त्यात. आम्ही कोकणातली माणसं तुम्हाला देऊन देऊन काय देणार कुळथाचं पिठलं आणि भात.” “येस. व्हेरी मच लूकिंग फॉरवर्ड टू युवर कुळथाचं पिठलं!” सध्या पुस्तकं वाचून मी मनातल्या मनात इंग्रजी बोलण्याचा आटोकाट सराव करत होतो. आणि तसंही मावशींच्या खानावळीतलं तथाकथित घरगुती फुळकवणी खाऊन आता कायमस्वरूपी कंटाळा आला होता. त्यांच्या घरीच संध्याकाळी मीटींग सुरू झाली. इकडच्या तिकडच्या गप्पा, गावातले लोक जमा होईपर्यंत बराच वेळ गेला होता. रात्रीचे आठ वाजले होते. मीटींग शेवटी सुरू झाली. लोकांना उत्साह चढला होता. बाकीचे लोक कसे साथ देत नाहीत. राजकारण विकासाच्या कसं आड येतं वगैरे गोष्टींना ऊत आला होता. मी त्यांच्या स्वयंपाकघराच्या खिडकीबाहेरच बसलो होतो आणि मला कूकरची शिट्टी ऐकू आली. एकाबाजू...

कोकणी खाद्यकथा- २

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेतोरे नावाचे एक गाव आहे. तिथल्या एका मंगल कार्यालयात जेवणाची पंगत बसली होती. मालकांच्या नातेवाईकांचा एक मुलगा सुट्टीत त्यांच्याकडे आला होता. जेवणात त्या भागात प्रचंड लोकप्रिय असलेली वाटाण्याची रस्सेदार उसळ होती. पंगतीमधले सर्वजण भात आणि उसळ परत परत मागून घेत होते. हा मुलगा उत्साहाने आपल्या काकांच्या मदतीला गेला आणि उसळ वाढायला लागला. “ए! माका वाईच रस्सो दी.” एकाने त्याला जोरात हाक मारून बोलावले. चविष्ट रस्सा आणि वाफाळता भात मस्त लागतोय ह्याचा त्याला साक्षात्कार झाला होता. त्याचं बघून शेजाऱ्याने तसेच केले. समोरचे रस्सा ओरपत आहेत हे बघून विरुध्द रांगेतले लोकही त्याला बोलवू लागले. प्रत्येकाने फक्त रस्साच घेतल्यामुळे शेवटी पातेल्यात वाटाणेच शिल्लक राहिले. तो छोटा मुलगा चिडला आणि जोरात ओरडला, “हो चोथो कोन खातलो?” सगळेजण अवाक झाले. त्याचे काका लगबगीने पंगतीजवळ गेले. “राग मानू नाका हां. ल्हान आसा.” असं सांगून त्यांनी सावरून घेतलं. लोकांना त्याची मजा वाटली. पण त्याचं वाक्य मात्र लक्षात राहिलं. आता जेवताना रस्साच खाल्ला आणि त्यातली डाळ, भाज्या तश्याच राहिल्या किंवा कुठ...

कोकणी खाद्यकथा- १

आमच्या आजीला विस्मरण होत चाललंय. चालणं फिरणं संपलंय. पलंगावर कायम बसून ती त्याच त्याच गोष्टी सांगत राहते कधीही गेलं तरी. त्यामुळे पहिलं वाक्य ऐकलं कि ती पुढे काय सांगणार ते आता माहीत असतं. मे महिन्यात पडवीत फणसाचे गरे तळण्याचा उद्योग चालू असतो. सगळीकडे चुलीच्या धुरामध्ये मिसळलेला गरम खोबरेलाचा, कच्च्या फणसाच्या गऱ्यांचा असा एक संमिश्र वास पसरलेला असतो. आजी सांगायला लागते. “आमच्यावेळी तळलेल्या गऱ्यांचं एवढं फारसं काही (महत्व) नव्हतं. आम्ही कच्च्या फणसाचे गरे वाळवत असू. बरे एकदम असे खडखडीत वाळले की मग जात्यावर दळायचे आणि त्याचं पीठ करून ठेवायचं. श्रावणाचे सगळे उपास मुळी आमचे गऱ्याच्याच पीठावर. मग त्यात हे पीठ जरा तुप घालून भाजून घ्यायचं. गुळ पातळ करून घ्यायचा त्यात हे पीठ घालायचं आणि लाडू वळायचे. फारसं काही नाही. आम्ही त्यात अजुन काही घालत नसू. आधी मुळी काही फारसं नसायचंच त्यात आजच्यासारखे काजू बीजू घालायला. नुसते लाडू नाही हां आम्ही त्याची थालिपीठं पण भाजू. आणि कश्यावर माहितीये?” आजी रंगात आलेली असते. माझ्याकडे हात दाखवत म्हणते, “तुमच्या गोड्या तेलावर नव्हे. रातांबतेलावर. आमच्याकडे मा...

End of 21 Day Challenge

20 days back, I set a goal to write an article a day and share it with readers. It was with the thought that sharing would also confirm the commitment from my side. It helped. Next day till noon while I had not been able to write a single word, some people pinged saying that they were waiting for the article. It was enough to trigger the process. After completing the write up it occurred to me that I could do more. I could have more goals which I could share and turn it into a larger social experiment. The additional goals were removing excessive sugar intake, doing 100 suryanamaskars at one time and meditation. The response from the readers and people around was beyond all my expectations. The writing was done on mixed subjects. Some of the subjects were based on my own field of work i.e. agriculture and farming, but in this interlinked world, I think these subjects are of concern to everybody. Before doing this as a challenge, most of the subjects were in my head and I had not deal...

२१ दिवसांच्या चॅलेंजच्या शेवटी

२० दिवसांपुर्वी मी एक लक्ष्य निश्चित केले होते की मी दररोज एक लेख लिहीन व वाचकांसोबत शेअर करेन. हे शेअर करण्याचा उद्देश हा होता कि त्यानिमीत्ताने माझा हा संकल्प दृढ होईल. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत मी एकही शब्द लिहिला नव्हता आणि काही लोकांनी मेसेज पाठवले होते की ते माझ्या लेखाची वाट पहात आहेत. त्यामुळे लेख लिहिण्याच्या प्रक्रियेला चालना मिळाली. पहिला लेख लिहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मी अजून काही साध्य करू शकतो, ते लोकांबरोबर शेअर करू शकतो आणि ह्या सर्वांचे एका सामाजिक प्रयोगात रुपांतर करू शकतो. आहारातील साखर कमी करणे, १०० सुर्यनमस्कार घालण्याची क्षमता विकसित करणे आणि मेडिटेशन करणे असे तीन अधिकचे संकल्प निश्चित केले. वाचकांकडून आणि आजुबाजूच्या लोकांकडून मिळालेला प्रतिसाद माझ्या अपेक्षेपेक्षा बराच जास्त होता. माझे बरंचसं लेखन विविध विषयांवर झालं. बरेच लेख माझ्या कामाच्या कृषि, शेतकरी ह्या विषयांवर होते पण ह्या एकमेकांशी जोडलेल्या जगात मला वाटतं ह्या विषयांशी प्रत्येकाचा संबंध दुरान्वये तरी येतोच. हे चॅलेंजच्या स्वरूपात लेखन करण्याआधी काही विषय माझ्या डोक्यात घोळत होते पण त्यावर...

Processes and Results

One advantage of hopping from one job to the other is that it allows you to learn from different organisations and the bosses they have for you. I have worked with one organisation which was more focused on processes. They had a firm belief that you just set up processes and systems and follow them thoroughly, results take care of themselves. The other organisation I worked at believed in achieving results in whatever way possible. There were very few established processes when it came to working towards those results. The employees of both the organisations used to take stress either from processes or from expected results. In the first organisations where focus was on processes there was always a chance to lose the vision of results. Engulfed in working as per the rules, people could do very little when result expectations changed. The organisation offered little flexibility and sometimes one had to work dumbly by following the orders. The other organisation which focused on result...

प्रक्रिया कि परिणाम

नोकऱ्या बदलण्याचा एक फायदा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या संस्थांमधून आणि तिथे असलेल्या बॉसकडून शिकायला मिळतं. मी नोकरी केलेल्या एका संस्थेमध्ये प्रक्रीयांवर भर दिला जायचा. त्यांचा असा ठाम विश्वास होता की जर प्रक्रीया आणि व्यवस्था निर्माण केल्या आणि त्यांचे काटेकोरपणे पालन केले तर परिणाम मिळतातच. मी काम करत असलेल्या दुसऱ्या एका संस्थेमध्ये कुठल्याही मार्गाने परिणाम मिळवण्यावर भर असायचा. असे परिणाम प्राप्त करण्यासाठी व्यवस्था मात्र विकसित केल्या नव्हत्या. दोन्ही संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांवर ह्या व्यवस्थांचा किंवा अपेक्षित परिणामांचा ताण येत होता. पहिल्या संस्थेमध्ये जिथे प्रक्रीयांवर भर होता तिथे परिणाम दृष्टीपथात न राहण्याचा संभव असे. नियमबध्द पध्दतीने वागताना, जर आवश्यक अपेक्षित परिणाम बदलले तर त्यांना साध्य करण्यासाठी लोकांकडे फार कमी पर्याय असत. संस्थात्मक पातळीवर खुप कमी लवचिकता होती आणि बऱ्याचवेळा मठ्ठ पध्दतीने आदेश पाळण्यापलिकडे लोक काही करू शकत नसत. दुसऱ्या संस्थेमध्ये जिथे परिणाम महत्वाचे होते तिथे बऱ्याचवेळा असे लक्ष्य निश्चित केले जात असे कि ते साध्य करताना संस्थेमधल्या प्रक्रीय...

Embracing Agricultural Diversity

While remaining at home in the current time, the families who have enough financial security are busy cooking. The WhatApp statuses are recently full with food photos. Kids are learning to make Chapatis. Mothers are baking cakes to cheer up everyone in the family. People have been complaining about lack of stocks of bread, biscuits, noodles and pasta in the grocery shops. Imagine while doing all that you come across an article on the internet saying that if agriculture in this world stops, the food stocks are going to last only 57 days. You get panicked. You will think of preparing for the doomsday because you have been dependent on one single grain called wheat. In fact there is one study and the article is actually there on the internet. After reading it I did not panic since my stomach was full with jackfruit. The article deals with how lands are being diverted to grow crops for making bio-fuels, meat etc. which cannot be denied but while calculating these numbers they have must h...

कृषिविविधतेचा स्वीकार

सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात ज्या कुटंबांकडे साधारण आर्थिक सुरक्षितता आहे ते पाकसिध्दीमध्ये मग्न आहेत. व्हॉट्सअॅ्पची स्टेटस सध्या खाद्यपदार्थांच्या फोटोंनी भरलेली आहेत. मुलं पोळ्या लाटायला शिकत आहेत. त्यांच्या आया घरातल्या सगळ्यांचा मूड छान रहावा म्हणून केक बनवत आहेत. लोकांना सध्या दुकानातली संपत जाणारी बिस्किटे, नुडल, पास्ता अश्या पदार्थांच्या स्टॉकची चिंता आहे. हे सगळं करत असताना कल्पना करा की असा लेख तुमच्या वाचनात आला की जगातली शेती नष्ट झाली आहे आणि मानवजातीला फक्त ५७ दिवस पुरेल इतकेच अन्न उपलब्ध आहे. तुमची भीतीग्रस्तता वाढेल आणि कदाचित मानवी जगाच्या अंताची तयारी करू लागाल कारण तुम्ही फक्त एका धान्यावर अवलंबून आहात ते म्हणजे गहू.  आधी सांगितलेला लेख खरोखर इंटरनेटवर आहे आणि काल तो वाचताना मला काही भीतीग्रस्तता आली नाही कारण मी पोटभर फणसाचे गरे खाल्ले होते. त्या लेखामध्ये मांसउत्पादन, जैव इंधने, हवामानबदलाचे शेतीवर होणारे वाईट परिणाम ह्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हे सर्व प्रश्न नाकारता येत नाहीत पण त्या खाद्यसुरक्षेच्या शेवटच्या दिवसांचे मापन करताना त्यांनी ज्या सांख्यिकी मा...

English or Marathi

This is a loud thinking. Amar’s mother tongue is Kannada. He is very well versed English, Marathi, Hindi, and his ancestral language called Chitpavani. That means he can not only speak in those five languages but can also read and to some extent write in them. In the age where people from different states of India have created a rift over the languages, he is a good example how languages can be a bridge for conversations. It was interesting to learn from him how he chooses which language to use and where. He says that the choice differs from one context to the other. As part of the 21 Day Challenge, I have been writing same article in two languages. It is basically a translation but with some fine tuning so the writing suits cultural context the readers are having. English of course has a wider cultural context than Marathi. Until now I have been writing in both the languages separately and had two different broadcast lists for sharing them. Between English and Marathi readers ther...

इंग्रजी कि मराठी

अमरची मातृभाषा कानडी आहे. त्याला त्याशिवाय इंग्रजी, मराठी, हिंदी आणि त्याच्या पुर्वजांची चित्पावनी भाषाही येते. ह्या भाषा तो फक्त बोलूच नव्हे तर वाचू आणि काही प्रमाणात लिहूही शकतो. भारतातले विविध राज्यांमधले लोक भाषिक मुद्द्यांवरून भांडत असताना, अमर म्हणजे अशी एक व्यक्ती आहे जी आपल्याला भाषा ह्या संवादाचे पूल कसे असतात ते दाखवू शकते. त्याच्याकडून तो विविध भाषा कश्या आणि कधी वापरतो ते जाणून घेणे बरेच शिकवून गेले. कुठल्या व्यक्ती असतात, संभाषणाचे संदर्भ कसे असतात त्यावर भाषेची निवड ठरते असे तो सांगतो. सध्या चालू असलेल्या २१ दिवसांच्या चॅलेंजचा भाग म्हणून एकच लेख दोन भाषांमध्ये लिहितोय. हा बराचसा अनुवाद आहे परंतु तो करताना वाचकांचा सांस्कृतिक संदर्भ लक्षात ठेवून तो करतोय. इंग्रजीच्या वाचकांचे सांस्कृतिक संदर्भ बरेच विस्तीर्ण असतात. पुर्वीही मी दोन्ही भाषांमध्ये परंतु वेगवेगळे लिखाण करत होतो. त्याच्या वाचकांच्या मराठी आणि इंग्रजीच्या दोन स्वतंत्र याद्या होत्या ज्यांना त्याप्रमाणे लिखाण शेअर करत होतो. ह्या दोन याद्यांमध्ये काही वाचक समान आहेत ज्यांना सध्याचे दोन्ही भाषांमधील लेख जात आहेत....

Alphonso Mangoes of Konkan

Yields of Alphonso mangoes in Ratnagiri have been exceptionally low this year. For us it is only 10% of the average of the last few years. The mango based economy in the region is in its worst time as the farmers and traders are facing difficulty in marketing that meager production in the face of current lockdown situation. Not just farmers but uncertainty looms over the lives of labourers, pesticide dealers and transporters. With very little income received in hand, it is not sure whether there will be any money left with the farmers to meet the costs for the next year. Alphonso or Hapus mangoes from Konkan coast have enjoyed a privilege at the level of consumers for some last 60 plus years due to its unique flavor, smell and the taste. It is just different from all the other mangoes grown in India. This uniqueness can largely be attributed to its location. The red lateritic soils, even temperatures, heavy monsoonal rainfall and most importantly the humid salty air makes what is kno...

कोकणातले हापूस आंबे

ह्या वर्षी हापूस आंब्यांचे रत्नागिरीमधले उत्पादन आतापर्यंतचे सर्वात कमी आहे. आमच्याकडे आतापर्यंत असलेल्या सरासरीच्या फक्त १०% उत्पादन आहे. आंब्यावर आधारीत अर्थव्यवस्था सर्वात वाईट अवस्थेत आहे. असलेल्या थोड्याफार उत्पादनाची सध्या लॉकडाऊनमुळे विक्री करणेही कठीण होऊन बसले आहे. फक्त शेतकरीच नव्हे तर मजूर, कृषि सेवाकेंद्र चालक आणि वाहतुक व्यावसायिक अश्या सर्वांवरच अनिश्चिततेचे सावट आहे. जे काय थोडेसे पैसे हातात मिळतील ते पुढच्या वर्षीचा खर्च भागवण्यासाठी पुरेसे नसतील. गेले ६० पेक्षा जास्त वर्ष कोकणातला हापूस आंबा ग्राहकांच्या गळ्यातला ताईत झाल्यासारखा आहे कारण त्याचा असलेला एकमेवाद्वितीय असा स्वाद, चव आणि सुवास. भारतातल्या कुठल्याही आंब्यापेक्षा हा आंबा विशेष वेगळा आहे. त्याच्या स्थानाशी हे वेगळेपण जोडले गेले आहे. लाल जांभ्या दगडाच्या जमिनी, सम हवामान, भरपूर मान्सूनचा पाऊस आणि सर्वात महत्वाचे म्हणजे समुद्रावरची दमट खारी हवा ह्या सर्वांचा कोकणातला म्हणून जो काही आहे हापूस तो बनवण्यात खास वाटा असतो. हे फक्त एक साधे आंब्याचे फळ नाही तर खवैय्यांसाठी असलेला तो आनंददायी अनुभव आहे. पण तरीही शेतक...

Virtual Networks and Likes

First it started with a social network called Orkut. He used his creative 20% of his time in Google to develop this social network and it was launched in 2004. They were increasing the popularity of it through real world contacts of the people as they started allowing people to join the network through invites sent by the people who had earlier joined it. It was around year 2007-8 and people like me with new access to computers were super excited to find their old times buddies and in some cases sweethearts as well. Just a year after joining Orkut, a friend, who had settled in US, suggested everybody in her network on Orkut to connect with her on facebook. I refrained from joining facebook since it was going to be too much of effort to handle two social networks since mobile phone in my hand was still dumb then and I was accessing internet from office and the cyber cafes. In 2010 I went to Ghana for a year. After seeing my new colleagues, mostly from UK, US and Netherlands, actively ...

आभासी माध्यमे

ऑर्कूट बुयुक्कोकटेन हा २००४ साली गूगलमध्ये काम करत होता आणि त्याला दिलेल्या स्वतःच्या प्रोजेक्टवर काम करण्याच्या २०% वेळेमध्ये त्याने एक समाजमाध्यम तयार केले ज्याचे नाव त्याच्या बॉसने ऑर्कूट असेच ठेवले. हे माध्यम वाढावे म्हणून त्यांनी जोडल्या गेलेल्या सदस्यांना त्यांच्या संपर्कांना जोडण्यासाठी खास निमंत्रणाद्वारे जोडता येत होते. साधारण २००७-८ च्या दरम्यानची माझ्यासारखे अनेक लोक नव्याने मिळत असलेल्या इंटरनेटच्या सुविधेमुळे त्यांचे संपर्क जुने तुटलेले मित्रमैत्रीणी, प्रियजन परत जोडण्याबद्दल खुप उत्साहात होते. मी ऑर्कूटमध्ये सहभागी झाल्यानंतर साधारण एकाच वर्षानी एका अमेरीकेत स्थायिक झालेल्या मैत्रीणीने तिच्या संपर्कातल्या सगळ्यांना मेसेज पाठवला की ती आता फेसबूक जॉइन करते आहे आणि तिथेच आता कनेक्ट होऊया. मी काही फेसबूकवर जाण्यात फारसा उत्साही नव्हतो. एक तर त्यावेळेला असलेले फोन अजुनही स्मार्ट नव्हते आणि इंटरनेट फक्त ऑफीस आणि सायबर कॅफेमध्ये उपलब्ध हो्ते. २०१० मध्ये आफ्रीकेत काम करत असताना बरोबरचे अनेक सहकारी ब्रिटन, अमेरीका, हॉलंड अश्या प्रगत देशामधले होते आणि ते सर्व फेसबूक भरपूर वापर...

Why do farmers grow rice?

This question could have been why farmers continue to farm in the first place but the issue is complex enough and I have restricted to the humble crop of rice. Rice is a major crop in India and grown in almost all the states in the country. As far as my observations and studies go, most of the crop of rice, is theoretically at a loss when value of family labour is taken into consideration and it is highly labour intensive. This situation has not changed at least for last 25 years. While proportion of population dependent on farming in general and grain farming in particular has reduced considerably there is huge number of farmers who are still continuing with the crop. Then why do people compulsorily cultivate rice? Here is a rural reality check. Rice has been proactively purchased by the government with a minimum support price (MSP). Farmers in Punjab and Haryana with their large landholdings can grow rice in a mechanised way with a reduced cost. They also get huge government sub...

शेतकरी भाताची शेती का करतात?

हा प्रश्न कदाचित शेतकरी मुळात शेतीच का करतात असा असू शकला असता पण तो मुद्दा इतका गुंतागुंतीचा आहे की मी फक्त साध्याश्या भातपीकाविषयी हा लेख मर्यादीत ठेवला आहे. भात हे भारतातले महत्वाचे पीक आहे आणि भारताच्या सर्व राज्यामध्ये घेतले जाते. माझे बरेचसे निरीक्षण आणि अभ्यास जेवढा आहे त्यावर आधारीत असे म्हणता येईल की भाताचे पीक अतिशय कष्टदायी आहे आणि कुटंब सदस्यांची मजूरीची किंमत लक्षात घेतली तर ते तोट्यात असते. हि परिस्थिती गेली २५ वर्षे बहुतांशी तशीच आहे. भारतातल्या शेतीवर अवलंबून असलेल्या आणि त्यातही धान्य पिकांच्या शेतीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण कमी होत चालले असताना शेतकरी भातासारख्या पिकाची लागवड अजूनही करत असतात आणि बऱ्याचवेळ दुसरा पर्याय नाही म्हणून करत असतात. असे का? एक ग्रामीण परिस्थितीचा घेतलेला हा एक छोटासा शोध. भाताची खरेदी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर केली जाते व त्यासाठी किमान आधारभुत किंमत दिली जाते. हि किमत पर्याप्त नसली तरी पंजाब, हरियाणासारख्या राज्यात मोठी जमीनधारणा असलेले शेतकरी यांत्रिक पध्दतीने भात शेती करतात. तसेच त्यांना तिथल्या शासनाकडून मोठ्या अनुदानावर वी...

The declining population

While we attribute all sorts of problems in India to the huge population the country has, it is also important to consider what will be happening with the people for whom population is declining. The effects of the decline are already visible in the educated class and I think it is high time one remains aware of them. Looking at my own family history gives enough micro-level data. At my great grandfather’s time, an average couple was producing about 8 children. My grandfather had 4 children. These children had an average 1.5 children per couple. For my generation this number has come to 0.66. As education levels are going up and comparative economic advantages of having few children are realised, couples are giving birth to fewer children.   China has forcefully implemented One Child Policy while Indian government was just doing advertisements appealing people to restricting to only two children per family. The population burden in China has come down and at the same time they ha...

लोकसंख्या कमी होताना

आपण आपल्या देशातल्या सर्व समस्या वाढलेल्या लोकसंख्येशी जोडत असतो. परंतु असाही एक मोठा वर्ग आहे ज्याची लोकसंख्या कमी होत आहे. त्यांच्याबाबतीत पुढे काय होणार आहे त्याची जाणीव आताच ठेवणे महत्वाचे आहे. अर्थात आपल्या देशातल्या शिक्षित वर्गामध्ये लोकसंख्या कमी होण्याचे परिणाम आताच जाणवायला लागले आहेत. माझ्या स्वतःच्या कुटूंबाच्या इतिहासाकडे पाहिले तरी पुरेशी संख्यात्मक माहिती मिळते. माझ्या पणजोबांच्या काळामध्ये एका जोडप्याला साधारण ८ तरी मुले होत होती. माझ्या आजोबांना ४ मुले झाली. त्या मुलांना पुढे प्रत्येकी प्रत्येकी सरासरी १.५ मुलेच झाली. माझ्या पिढीत ही संख्या ०.६६ वर आली आहे. जसजशी शैक्षणिक पातळी वाढत चालली आहे तसे कमी मुले असण्याचे आर्थिक फायदे लोकांना लक्षात आले आहेत आणि लोक कमी मुलांना जन्माला घालत आहेत. भारत सरकार आपल्या जनतेला ’हम दो हमारे दो’ चे आवाहन करत होते तेंव्हा चीन सक्तीने एक जोडपे एक मुल धोरण राबवत होता. सध्या चीनमध्ये त्या धोरणाशी संबंधित समस्या जाणवायला सुरूवात झाली आहे. आपल्या सुशिक्षित उच्च आणि मध्यमवर्गाने स्वेच्छेने एक मुल धोरण अवलंबले आहे आणि त्यांच्या समस्याही साध...

Adopting Innovations

Innovation is a creative new idea in the form of a device or method that can serve as a better solution for a need. In our market economy we have been flooded with lots of innovations so much so that we are not even able to make out whether a particular innovation is relevant to us or not. Majority of mobile phone companies are bringing newer versions and models almost every few months. As customers we are confused what we really want to get out of the phones we are buying. I actually don’t know much about how these companies strategise their innovations and marketing but I can relate this spread of innovations to some of my observations in my own field of agriculture and social development. I was working on a project promoting a new technique of rice cultivation called System of Rice Intensification, which required farmers to change the way rice was planted. As a result of its adoption, they would have reduced the inputs required for cultivating rice and they would have got very hig...

प्रसार इनोव्हेशनचा

इनोव्हेशन म्हणजे एखाद्या पध्दतीच्या किंवा साधनाच्या स्वरूपात असलेली एक नवीन सर्जक कल्पना जी एखादी गरज पूर्ण करण्यासाठीचा उपाय असते. आपल्या बाजारआधारीत अर्थव्यवस्थेमध्ये आपल्यावर सतत विविध प्रकारच्या इनोव्हेशनचा जणू वर्षावच होत असतो. त्यामुळे कधी कधी उपलब्ध इनोव्हेशन आपल्याला महत्वाचे आहे किंवा नाही हे सुध्दा आपल्याला समजणे कठीण होत असते. बऱ्याचश्या मोबाईल फोन कंपन्या दर काही महिन्यांनी नवनवीन मॉडेल बाजारात आणत असतात. एक ग्राहक म्हणून आपण कोणत्या मॉडेलचा कोणत्या कंपनीचा मोबाईल फोन घ्यावा आणि त्याचा आपल्याला कसा उपयोग होणार आहे ह्याबाबतीत आपण गोंधळलेले असतो. मला ह्या मोबाईल कंपन्या आपल्या इनोव्हेशन किंवा मार्केटींगचे धोरण कसे आखतात ह्याबद्दल फारशी माहिती नाही पण मी काम करतो त्या शेती आणि सामाजिक प्रकल्पांच्या क्षेत्रात ह्या इनोव्हेशनचा प्रसार कसा होतो त्याबद्दल माझी काही निरीक्षणे मात्र आहेत. मी एका प्रकल्पावर काम करत होतो ज्यामध्ये भातलागवडीचे श्री नावाच्या तंत्राचा शेतकऱ्यांमध्ये प्रसार करण्यात येत होता. ह्या श्री तंत्रामध्ये शेतकऱ्यांना आपली लागवडीची पध्दत बदलणे आवश्यक होते ज्यामुळे...

Youth in Agriculture

Recently I was engaged in the study of Agriculture in one block of Nashik and one small question in our study was related to how youth are engaged in agriculture? Do they want to continue with the farming or do they want to choose non farming occupations. I talked mostly to men given the patriarchal nature of our society. Women, doing anything in agriculture independently, were exceptions and proved the rule. The discussions gave many interesting insights. In the areas where agriculture was more advanced and people had been gaining good incomes, farmers were able to give good education to their children and most of them were able to get secure well paying jobs in the cities. Those who were not faring well in farming were not able to support their children with higher education and these youths were opting to remain in agriculture instead of going to the cities. The reason these youths gave was highly interesting. They said it made more sense to remain in the village and be your own b...

शेतीतील युवापिढी

काही दिवसांपुर्वी मी एक नाशिक जिल्ह्याच्या एका तालुक्यातील शेतीच्या अभ्यासामध्ये सहभागी झालो होतो. त्या अभ्यासामधला एक छोटा प्रश्न होता की तरूण शेतीमध्ये कसे सहभागी होत आहेत? त्यांना शेतीमध्ये रहायचे आहे की अन्य व्यवसायांचा पर्याय त्यांना अधिक चांगला वाटतो. आपली समाजव्यवस्था बरीचशी पुरुषप्रधान असल्यामुळे युवतींनी शेतीमध्ये काहीही केलं तरी ते असलेल्या समाजनियमांना अपवाद असल्याने साधारण समाजातील कल समजून घेण्यासाठी बऱ्याचश्या पुरुष युवकांसोबत ही चर्चा झाली. ह्या चर्चांमधुन बरेच लक्षवेधी मुद्दे निदर्शनास आले. जिथे शेतीचा खुप चांगला विकास झाला होता, तिथे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली होती आणि शेतकऱ्यांना आपल्या मुलांना चांगले शिक्षण देता आले होते आणि ही मुले शहरांमध्ये बऱ्याच प्रमाणात चांगल्या सुरक्षित नोकऱ्या मिळवू शकली होती. ज्या शेतकऱ्यांना आपल्या उत्पन्नात वाढ करता आली नव्हती त्यांना आपल्या मुलांना उच्चशिक्षण देता आले नव्हते. असे जे युवक होते ते आपल्या शेतीमध्येच राहण्यास इच्छुक होते. ह्या त्यांच्या निर्णयामागील कारणे विचारली तेंव्हा बऱ्याच जणांनी सांगितले की शहरात जाऊन ज्...

परसबाग न करण्याची सहा कारणे

सर्वप्रथम परसबाग म्हणजे काय हे समजून घेउया. परसबाग म्हणजे तुमच्या घराजवळची किंवा तुमच्या शेतातील छोटी जागा जेथे स्वतःच्या गरजेपुरती प्रामुख्याने फळे व भाजीपाल्याची शेती केली जाते. काही ठिकाणी जेथे मुख्य निवास हा शेतजमीनीतच असतो तेथे व्यावसायिक पिके आणि परसबाग एकाच क्षेत्रात असतात. मला स्वतःला परसबाग ह्या विषयात काम करण्याची संधी दोन वेळा मिळाली आहे. एक म्हणजे आमच्या स्वतःच्या परसबागेत काम करताना आणि दुसरी म्हणजे काही सामाजिक प्रकल्पांमध्ये परसबाग हा विषय हाताळताना. जर तुमच्याकडे आवश्यक अशी इच्छा असेल आणि शारिरीक क्षमता असेल तर तुम्ही स्वतःची परसबाग तयार करू शकता. तीन अत्यावश्यक घटक मात्र असे आहेत की ज्यांचा जर अभाव असेल तर परसबाग तयार करण्यामध्ये बाधा येऊ शकते. पहिला घटक म्हणजे जागा. फक्त शहरातच नव्हे तर भारतातील ग्रामीण भागांमध्ये सघन वस्ती असल्यामुळे परसबागेला आवश्यक अशी जागा नसते. दुसरा घटक म्हणजे पाणी. देशाच्या बऱ्याच भागात पेयजलाचेही दुर्भिक्ष असते तेथे झाडांसाठी पाणी मिळणे कठीण होऊन बसते. वेळ हा तिसरा घटक आहे. बऱ्याच जणांना अन्य कामांमुळे किंवा सतत घरापासून दूर रहावे लागत अस...

Six Excuses for Not Having Kitchen Gardens

First let’s understand what a kitchen garden is. Kitchen garden is a small area around your house or in your farm to cultivate especially fruits and vegetables that you need for your own consumption. Sometimes like the large homesteads there is not strict separation of spaces but crops for home consumption and the commercial agriculture share the same resources. Personally I have dabbled with these kitchen gardens in two ways, first while working on our own kitchen garden and second while promoting kitchen gardens through social projects. You can develop your own kitchen gardens if you have enough interest and physical capacity in growing your own food. There are three critical things, lack of which can stop you from developing a kitchen garden. First is space. In a country like India, where one does not have space sometimes even in rural habitations, it becomes difficult. Second is water. There are many parts of the country where even drinking water gets scarce for some months, p...

मातीतले सेंद्रीय कर्ब

आपल्याला विविध माध्यमांद्वारे हवामान बदलाबद्दल बऱ्याच वेळा जागृत केले जात असते. हवामान बदलाचे वाईट परीणाम आपल्याला विविध प्रकारे सहन करायला लागत आहेत. काही तज्ज्ञ लोक सध्या होत असलेल्या करोना विषाणूच्या वाढत्या साथीचा संबंधही हवामान बदलाशी जोडत आहेत. सगळ्यात जाणवणारा आणि आपल्या दैनिक जीवनाशी निगडीत असलेला हवामान बदलाचा एक घटक म्हणजे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण. हवेतल्या वाढत्या धुरामुळे व अन्य प्रदुषणजन्य घटकांमुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहेच. अजुन एका हवामान बदल घडवणाऱ्या घटकाकडे मात्र आपले फारसे लक्ष गेलेले नाही तो म्हणजे मातीतील सेंद्रीय कर्ब. एका शास्त्रज्ञांच्या गटाने केलेल्या अंदाजानुसार आपल्या जगातल्या मातीमध्ये २७०० गिगाटन एवढा कार्बन साठवलेला असतो जो की हवेतल्या कर्बाच्या ३ पट आहे. हवेमधल्या कार्बनचे एक चक्र सतत चालू असते. वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेद्वारे हवेतला कार्बन डायऑक्साईड वापरून त्यांचे अन्न बनवत असतात. जेंव्हा मातीतल्या सेंद्रीय पदार्थांचे विघटन होते तेंव्हा हा कार्बन डायऑक्साईड परत हवेत जात असतो. असा हा मातीतला कार्बन जो सेंद्रीय स्वरूपात...

Soil Organic Carbon

Time and again, we are being made aware about the climate change through media. The adverse effects of climate change are being faced by us in different ways. The Corona epidemic which we are currently facing is also being linked to the climate change by some experts. The most prominent factor that affects our daily lives and we commonly attribute to climate change is increasing Carbon Di-oxide levels and depleting oxygen levels in the air. It is true that increased levels of smoke and pollutants in the air have made our lives miserable and causing health problems. However another major contributor to the increased level of Carbon di-oxide is destruction of soil organic carbon. As per the estimates done by one group of scientists, there is 2700 Giga tons of carbon stored in the soil and it is 3 times the carbon that is present in the atmosphere. There is a cyclical movement of carbon in the environment. Plants do photosynthesis and utilise atmospheric carbon to make their food. As th...

खाद्यपदार्थ आठवणीतले देशांच्या अंतर्भागातले

माझ्या कामामुळे मला विविध अंतर्भागांमध्ये जावे लागत असे. मी मग खायचे जेवायचे काय करतो हा प्रश्न मला बऱ्याच वेळा विचारला जातो. बऱ्याचश्या ठिकाणी चांगली हॉटेलं नसतात आणि स्वच्छतेचाही अभाव असतो अश्या परिस्थितीत जेवणखाण सांभाळणे हे खरंच कठीण असते. चांगले चविष्ट पदार्थ खायची आवड असली तरी मी त्याबाबतीत चोखंदळ नाही त्यामुळे समोर येणारे अन्न मी चाखूनतरी पाहतच असतो. ह्या सवयीमुळे मला काही मोठ्या शहरांमध्ये माहीत नसलेले पण ह्या अंतर्भागातील लोकांनी कित्येक पिढ्यांपासून खास जपलेले परिपूर्ण चवीचे पदार्थ खायला मिळाले आहेत. ह्या लेखात मला सर्वात आवडलेल्या अश्या पाच खाद्यपदार्थांची माहिती देत आहे. १. मणिपुरी थाळी- मणिपुरमधल्या काकचिंग नावाच्या एका गावात मी एका महिलांनी चालवलेल्या खानावळीमध्ये गेलो होतो. तिथल्या थाळीमध्ये विविध पदार्थ पुर्वी कधीही न खाल्लेले असे होते. थाळीमध्ये छोट्या दाण्यांचा चिकट भात होता. त्याची चव अप्रतिम होती. वरण, दोन भाज्या आणि चिकन होतं. सर्व गोष्टी स्थानिक प्रकारच्या होत्या आणि त्यात चाईव्हची पात, रानमोहरीचा पाला अश्या फक्त मणिपुरच्या परसबागांमध्ये पिकवल्या जाणाऱ्या गोष्ट...