Posts

Showing posts from 2022

Consistency Compounded

Typically every person in this world does not listen to each and every thing our parents tell us to do. If people were doing only that then world will not have changed in anyway. But then there are certain things, which these modern day business or fitness gurus wont tell you and not even your friends and colleagues. If your parents have told you the thing which I have now written about, then there is a high chance you might have overlooked or brushed it aside like I did in my youthful times.  While you have been watching or listening to podcasts on YouTube, a lot of advertisements of random self-proclaimed life gurus pop up. All try to sell you their training courses, online seminars on how to become smart, to have passive incomes, to have multiple incomes, to get out of your boring jobs and many more such subjects. Nobody tries to sell you the virtue of consistency. So I thought I would just write about it and share it silently reminding that one important thing our parents were ...

उद्योग पळवण्याचा उद्योग

सध्या महाराष्ट्रातील विविध राजकीय विरोधक राज्यातील उद्योग अन्य राज्यात कसे पळवून नेले जात आहेत त्यावर राळ उठवत आहेत. दोन मिनिटात वीस ब्रेकिंग न्युज आणि स्वघोषित तज्ञांनी काढलेल्या एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या ह्यापलीकडे फारसं काही देऊ न शकणाऱ्या मीडियाला असली भडक वाक्यं घेऊन परत परत दाखवणं खुप सोपं असतं कारण कोणाला फारसे प्रश्न विचारून त्याचा तपशील घेऊन मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करण्याची तसदी घेण्याची गरज नसते. का, काय, कोणी, कुठे, कोणाला, कसे असे सहा प्रश्नार्थक शब्द आपल्या भाषेत आहेत. ते कुठल्याही घटनेच्या बाबतीत जर ते विचारता येत नसतील आणि सध्याची माध्यमे त्याबाबत माहिती पुरवण्यास असमर्थ असतील तर असल्या उपयोगहीन वस्तू व सेवांवर खर्च आणि वेळ कशाला खर्च करायचा हा मोठा प्रश्न आहे. तसंच काहिसं उद्योगांचंही आहे. उद्योग, व्यवसाय म्हणजे लोकांच्या चरितार्थाचं साधन असतं. एखादी मुलं पळवणारी टोळी असते किंवा दरोडे घालून वस्तू चोरून नेता येतात तसे उद्योग पळवता येत नाहीत हे ज्ञान एखादा अल्पशिक्षित अल्पभुधारक शेतकरी किंवा रस्त्यावरचा निरक्षर फुगेवालाही बाळगतो. व्यवसायासाठी निव्वळ कच्च्या मालाची ...

मान्सूनमधला जुगार

सध्याचा जमाना झटपटपणाचा आहे. भूक लागली की दोन मिनिटात तयार होणाऱ्या इन्स्टंट नूडल सध्या गावातली शेतकऱ्यांची लहान मुलेच नव्हे तर त्यांचे आईबापही खात असतात. जात्यावर दळण दळून चुलीवर भाजलेल्या भाकऱ्या कितीही चविष्ट लागत असल्या तरी त्या बहुतांश सोशल मिडियावरील रील मध्येच असतात आणि त्या करणाऱ्या म्हाताऱ्या आज्जीबाईच असतात. नविन पिढी असल्या फंदात पडत नाही. वेळ आणि श्रम वाचवणारी नवीन यंत्रे उपलब्ध असताना तशी अपेक्षा करणे चुकीचेही आहे. परंतु सारासार विचार न करता पैसे देऊन फक्त दुकानामध्ये सहज उपलब्ध आहेत म्हणून कुठल्याही वस्तू घेण्याची लागलेली सवय आपला नकळत घात करत असते.   असंच काहीसं शेतीचंही आहे. साधारण दरवर्षी शेतकरी ज्या जातींचे बियाणे लावतात त्याच्या खरेदीच्यावेळी एक महत्वाचा निकष असतो कि किती कमीतकमी कालावधीमध्ये ते पीक तयार होईल. गेल्या काही वर्षात हा कालावधी कमी कमी होत चालला आहे. साधारणपणे ३० वर्षांपुर्वी रत्नागिरी परिसरात भातपीक सरासरी १२५ दिवसांचे होते ते आता १०० दिवसांवर आलं आहे. पावसाचे प्रमाण कमी जास्त होत असले तरी पावसाळ्याचा एकूण कालावधी काही कमी झालेला नाही. ऑक्टोबरमध...

गोष्टी माती संरक्षणाच्या

तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यामध्ये नेखुंडी नावाचं एक गाव आहे. हा तामिळनाडूचा साधारण कमी पावसाचा दुष्काळग्रस्त मानला जाणारा भाग आहे. बराचसा डोंगराळ भाग असल्यामुळे पडणारा पाऊस जमिनीमध्ये थांबत नाही तर पुढे वाहत निघून जातो. साधारण ८०० मिमी पाऊस पडत असला तरी हलक्या मातीच्या जमिनी, उघडे बोडके डोंगर अश्या सर्व परिस्थितीमुळे विहिरींमध्येही पाणी फारसे नसते. जिथे प्यायच्या पाण्याचीच टंचाई असते तिथे सिंचनासाठी कुठून पाणी येणार.   ह्या नेखुंडी गावामध्ये पियुष मानुश नावाच्या एका उद्योजकाने साधारण दिड एकर उताराची, शेतीसाठी निकृष्ट समजली जाणारी जमीन विकत घेतली. हा माणूस जवळच्या सेलम शहरात राहत होता आणि त्याचा फर्निचरचा व्यवसाय होता. व्यवसायाला उपयोगी होईल म्हणून त्याने ह्या जमिनीत काही फर्निचरला योग्य लाकूड देणाऱ्या वृक्षांची लागवड केली. एक वर्षानंतर अतिशय खडतर वातावरणात कमी पाण्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात बांबूची रोपे तग धरून राहिल्याचे लक्षात आले.   त्याचा हा प्रयोग पाहून त्याच्या काही मित्रांनीही ह्या परिसरात त्याच्या शेजारीच काही जमिनीचे तुकडे विकत घेऊन एक गुंतवणूक म्हणून बांबूच...

कोकणची माती – २

आमच्या लहानपणी आम्ही जेंव्हा आजोळी जात असू, तेंव्हा आमचे आजोबा, माझ्या आईचे वडील, आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगत. ह्यात त्यांच्या काळचे लोक, झाडे, डोंगर आणि भुतंखेतं ह्यांचाही समावेश असे. त्यामध्ये अनेकवेळा ते तरूणपणी त्यांच्या बैलगाडीतून बंदरावरच्या प्रवाश्यांना कसे त्यांच्या घरापर्यंत नेत असत त्याचे अनेक अनुभव असत. त्यामध्ये मग त्यांचा व्यवसाय कसा बंद पडला प्रवासी बोटी बंद पडल्यामुळे ते सांगत असत. ह्या दुरवर जाणाऱ्या प्रवासी बोटींची सेवा हे सांगताना खाड्या गाळाने कश्या भरल्या आणि बोट बंदरापर्यंत यायला प्रतिबंध कसा होऊ लागला त्याबद्दल सांगत असत.   फक्त प्रवासी बोटी नव्हे तर अनेक मालवाहू नौका कोकणात येत असत आणि येथील व्यापारी, ग्राहक, शेतकरी त्यांच्या वाटेकडे कसे डोळे लावून बसलेले असत ह्याचीही रसभरीत वर्णने आपल्याला जुन्या माणसांकडून ऐकायला मिळू शकतात. परंतु जसजशी हि पिढी काळाच्या पडद्याआड गेली तश्या आता त्यांच्या कथाही विस्मृतीत जात आहेत. पुर्वीच्या काळी येथे असलेल्या अनेक छोटया छोट्या बंदरांमधून खुप मोठा व्यापार चालत असे हे सांगितलं तर नवीन पिढीला पटकन विश्वास बसत नाही.  ...

कोकणची माती – १

कोकणच्या जमिनी ह्या जांभा ह्या खडकाने बनल्या आहेत. ह्या खडकापासून तयार झालेली मातीही लाल रंगाची आहे. ह्यातील विशिष्ट खनिजामुळे ही माती एकदा कपड्यावर लागली कि त्याचा लाल रंग कपड्याला दिल्याशिवाय निघत नाही. त्यामुळेच गंमतीने कोकणची माती एकदा माणसाला चिकटली कि ती जाऊ शकत नाही असं म्हटलं जातं. अर्थात दक्षिण कोकण विभागाचा म्हणजेच रायगडचा काही भाग, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांच्या परिस्थितीचा विचार केला तर येथील पर्यावरणाचा माती हा खरंतर अतिशय संकटात असलेला घटक आहे. परंतु येथील लोक, स्वयंसेवी संस्था आणि शासन स्तरावर त्याचा तितक्या निकडीने विचार केला जात नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागते. कोकणाच्या डोंगरांच्या माथ्यावर असलेल्या विस्तीर्ण पसरलेल्या भागाला सडा असे म्हणतात. हा सडा म्हणजे बऱ्याचवेळा सात बारावर बहुतांश पड किंवा पोटखराबा अशी नोंद केलेला असतो परंतु इथल्या पर्यावरण आणि स्थानिक लोकांच्या जीवनात हे सडे खुप मोठी भुमिका बजावत असतात. डोंगरमाथ्यावर असल्याने येथे एकुणच मातीची खोली कमी असते आणि मातीविरहीत उघडा खडकाळ परिसरच अधिक असतो. डोंगर उताराला तसेही पाणी साठून राहत नाही परंतु...

मातीतील सेंद्रिय कर्ब

आपल्याला विविध माध्यमांद्वारे हवामान बदलाबद्दल बऱ्याच वेळा जागृत केले जात असते. हवामान बदलाचे वाईट परीणाम आपल्याला विविध प्रकारे सहन करायला लागत आहेत. काही तज्ज्ञ लोक सध्या होत असलेल्या करोना विषाणूच्या वाढत्या साथीचा संबंधही हवामान बदलाशी जोडत आहेत. सगळ्यात जाणवणारा आणि आपल्या दैनिक जीवनाशी निगडीत असलेला हवामान बदलाचा एक घटक म्हणजे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण. हवेतल्या वाढत्या धुरामुळे व अन्य प्रदुषणजन्य घटकांमुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहेच. अजुन एका हवामान बदल घडवणाऱ्या घटकाकडे मात्र आपले फारसे लक्ष गेलेले नाही तो म्हणजे मातीतील सेंद्रीय कर्ब.   एका शास्त्रज्ञांच्या गटाने केलेल्या अंदाजानुसार आपल्या जगातल्या मातीमध्ये २७०० गिगाटन एवढा कार्बन साठवलेला असतो जो की हवेतल्या कर्बाच्या ३ पट आहे. हवेमधल्या कार्बनचे एक चक्र सतत चालू असते. वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेद्वारे हवेतला कार्बन डायऑक्साईड वापरून त्यांचे अन्न बनवत असतात. जेंव्हा मातीतल्या सेंद्रीय पदार्थांचे विघटन होते तेंव्हा हा कार्बन डायऑक्साईड परत हवेत जात असतो. असा हा मातीतला कार्बन जो सेंद्रीय ...

माती आणि पाणी

  मराठी भाषेत पाणलोट हा शब्द आता सर्वांनाच माहितीचा आहे. डोंगरमाथ्यावर पडणारे पावसाचे पाणी हे छोट्या ओघळींमधून नाल्यांमध्ये आणि त्यातून नद्यांमध्ये वाहत येते आणि सरतेशेवटी समुद्राला मिळते. ह्या सर्व पाण्याच्या प्रवासाला पाणलोट असं म्हणतात. ज्या क्षेत्रातुन हे पाणी वाहत जाते ते पाणलोट क्षेत्र. ह्या क्षेत्राच्या व्यवस्थापनाचं एक लोकप्रिय सुत्र आहे ते म्हणजे धावत्या पाण्याला चालायला शिकवायचं आणि चालत्या पाण्याला थांबायला शिकवायचं. परंतु अनेक ठिकाणी पाणलोट क्षेत्राचे प्रयत्न आपल्याला अयशस्वी झालेले दिसतात. अनेक प्रकारचे बंधारे बांधून, तळी बांधूनही पाण्याचे दुर्भिक्ष संपलेले दिसत नाही. काही ठिकाणी सुरुवातीच्या वर्षांमध्ये पाण्याची उपलब्धता वाढते आणि काळ पुढे सरकतो तसे हे बंधारे आणि तलाव गाळाने भरून जातात आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहात ते तुटून तरी जातात किंवा त्यामध्ये पाण्याची जागा प्रवाहासोबत येणाऱ्या गाळानी घेतल्यामुळे त्याची पाणी साठवण्याची क्षमता कमी होऊन जातो.   पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचं दुसरं महत्वाचं सुत्र म्हणजे माथा ते पायथा हया क्रमाने काम करणे. पाणलोट क्षेत्रात...

मातीचे महत्व

आपल्या मराठी भाषेत माती खाल्ली हा वाक्प्रचार लोकप्रिय आहे. एखादी व्यक्ती अतिशय चांगल्या पध्दतीने पुढे जात असेल आणि त्यानी अशी काही घोडचूक केली आणि त्याच्या होत असणाऱ्या प्रगतीला खीळ बसली तर त्या परिस्थितीत हा वाक्प्रचार वापरला जात असतो. म्हणजे नेहमीचे चांगले जेवण जेवायच्याऐवजी माती खाल्ली असं त्यामध्ये अभिप्रेत असतं. परंतु आपण जे जेवण जेवतो ते खऱ्या अर्थाने पाहिलं तर खऱ्याखुऱ्या मातीतुनच उत्पन्न होत असतं हे आपण त्यावेळी विसरलेलो असतो. ह्या वाक्प्रचाराच्यामध्ये असलेला तात्कालिक उपहास सोडला तर खरंच आपण आपल्या मातीला विसरत आहोत का हा प्रश्न सध्याच्या काळात प्रत्येकाने स्वतःला विचारणं आता आवश्यक झालं आहे.   आपण दररोज जे जेवतो ते अन्नधान्य, भाजीपाला, दुधदुभतं इतकंच नव्हे तर सर्व मांसाहारी पदार्थांचं मुळ मातीमध्येच आहे. त्यामुळेच आपल्या साहित्यात, कथा, कविता आणि लोकगीतांमध्ये आपण ह्या मातीला आई म्हणून संबोधतो. अशी घट्ट भावनिक वीण ज्या मातीशी आपली बांधली गेली आहे ती माती बनण्याची प्रक्रीया आपल्या पृथ्वीवर गेली काही लाख वर्षे चालू आहे. वारा, ऊन, पाणी ह्या विविध घटकांच्या प्रभावामुळे दग...

ग्रामीण भागातील कचरा समस्या- ६

  मावलिन्नॉंग हे मेघालय राज्यातील एक साधारण ५०० लोकवस्ती असलेलं गाव आहे. डोंगराळ भाग आणि सुपारीच्या बागा असं कोकणासारखंच वातावरण असलेल्या ह्या गावात ३० वर्षांपुर्वी काविळीची साथ आली आणि काही गावकऱ्यांचा त्यात मृत्यूही झाला. ह्या घटनेनंतर गावकऱ्यांनी गाव पुर्णतः स्वच्छ करण्याचा वसा घेतला तो कायमचा. गावकऱ्यांनी त्यांच्या सवयी कायमच्या बदलून टाकल्या आहेत. गावात कुठेही उघड्यावर सार्वजनिक जागी कचरा टाकण्यास बंदी आहे. प्लास्टिकचा कोरडा कचरा रस्त्यावर विवक्षित ठिकाणी ठेवलेल्या बांबूच्या कुंड्यांमध्ये जमा केला जातो. घरांच्या आसपासचा पन्नास मीटरपर्यंतचा परिसर गावकरी नियमीत स्वेच्छेने साफ करतात व प्रत्येक घराच्या समोर एक सुंदर बाग केलेली असते. आज हे गाव आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळखले जाते आणि अनेक पर्यटक फार दुरून येथे येतात. बऱ्याच घरांमध्ये होमस्टे व घरगुती खानावळी सुरू झाल्या आहेत. पर्यटकांकडूनही गाव स्वच्छ राखले जाईल ह्याची काळजी गावकरी घेतात. आज ह्या स्वच्छतेचा फायदा चांगल्या आरोग्याबरोबर पर्यटनाद्वारे स्थानिक रोजगारनिर्मितीमध्ये झाला आहे.   अजुन एक विशेष उदाहरण क...

ग्रामीण भागातील कचरा समस्या- ५

दापोली शहरात श्री प्रशांत परांजपे हे कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात बरेच वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या निवेदिता प्रतिष्ठान ह्या संस्थेतर्फे कचऱ्याच्या समस्येवर अनेक नावीन्यपूर्ण उपाय प्रचलित केले आहेत. त्यांच्याशी चर्चा करताना अनेक नविन कार्यपध्दतीविषयी समजते. कोकणाच्या परिस्थितीत काय केले पाहिजे त्याच्याबद्दल ते उपायही सुचवतात.   त्यांनी असे अनुभवले आहे की दापोली सारख्या शहरात जर ५० लोकांनी सलग ३० मिनिटे फक्त ५०० मीटरच्या परिघातील इतस्ततः पसरलेला कचरा जमा केला तर १५ पोती प्लास्टिक जमा होते. त्यांचे असे गणित आहे की एखाद्या गावाने ठरवले व सर्व लोकांनी सहभाग दिला तर ते गाव फक्त तीन महिन्यात पूर्ण स्वच्छ होऊ शकते. कोकणाच्या विखुरलेल्या वस्तीच्या परिस्थितीत एखादी वाडी वस्तीही स्वतःसाठी हे चॅलेंज घेऊ शकते. एखाद्या वस्तीने श्रमदानाने परिसर स्वच्छ करायचा ठरवला तर इतक्या कमी वेळात स्वच्छता करणे शक्य आहे. आफ्रिकेतील रवांडा ह्या एकेकाळी वांशिक युध्दाने ग्रासलेल्या देशात आज प्रत्येक नागरीकाला दर रविवारी दोन तास देशाच्या स्वच्छतेसाठी काम करणे सक्तीचे असते. एकदा ह्या सक्तीचे चांगले ...

ग्रामीण भागातील कचरा समस्या- ४

काही वर्षांपुर्वी दिल्ली विमानतळावर मी बसलो होतो. माझ्यासमोर आई, वडील व त्यांची तरूण मुलगी असे एक जपानी कुटूंब बसले होते. जवळच काही अंतरावर कचऱ्यासाठी एक मोठा स्टिलचा डबा ठेवला होता. तिथे काही लोक येता जाता हातातला कचरा टाकत होते. त्या जपानी कुटूंबाचे डिस्पोझेबल डिशमधून जेवण चालू होते ते संपल्यावर एकेक जण उठून कचऱ्याच्या डब्याजवळ जाऊन टाकून येत होता पण त्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ लागत असल्याचे माझ्या निरीक्षणात आले म्हणून मी जवळ जाऊन त्यांचे नेमके काय चालू आहे ते बघितले. ते लोक डिशमधील सर्व उष्टे व्यवस्थित एकत्र करून ओल्या कचऱ्याच्या भागात टाकत होते आणि बरोबरच्या खाद्यपदार्थांचे रॅपर, पाऊचच्या आतमध्ये चिकटलेले कणही वेगळे करून टाकत होते. त्यांचे झाल्यानंतर मी कचऱ्याच्या डब्यात बघितले तर प्रत्यक्षात तिथे ओल्या व सुक्या कचऱ्याचे जरी दोन भाग असले तरी दोन्ही भागात मिश्र कचराच दिसत होता. मी न राहवून त्या जपानी माणसाला विचारलं कि त्या डब्यात बाकीच्या लोकांनी कचरा वेगळा न करता तसाच टाकला आहे तर तुम्ही तो स्वतंत्र करून का टाकलात. त्याने मला उत्तर दिलं की एक तर आमच्या देशात आम्ही हे नियम कड...