Posts

Showing posts from March, 2020

एक आर्थिक-मानसिक प्रयोग

शेतकरी आत्महत्या हा मुद्दा सध्या सतत इतका चर्चिला जातो की लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरूवात केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार दरवर्षी साधारण सरासरी १३,५०० शेतकरी आत्महत्या करतात. जर तुलनात्मक विचार करायचा झाला तर आतापर्यंतची २००४ पासूनची सर्वात मोठी आपत्ती म्हणजे उत्तराखंडचे पूर ज्याच्यामध्ये त्यापेक्षा कमी म्हणजे ४००० लोक मरण पावले होते. माझ्या विदर्भामधल्या शेतीविषयक प्रकल्पांमधील कामामुळे शेतकरी आत्महत्या हा विषय जवळून व थेट समजून घेण्याची संधी मिळाली. मानसशास्त्रातील संशोधनानुसार हे सिध्द झाले आहे की आत्महत्येच्या निर्णयाप्रति पोचण्याआधी त्या व्यक्तीमध्ये मानसिक ताणतणाव टोकाला पोचलेले असतात. माझ्या शेतकऱ्यांच्या चर्चांमध्ये हे मुद्दे येत असत. निव्वळ पावसावर आधारीत शेतीवर पूर्ण अवलंबित्व, आणि त्या पिकांमधून वर्षातुन एकदाच मिळणारे घाऊक उत्पन्न ह्याबद्दल ते प्रकर्षाने बोलत असत. अन्य आर्थिक उत्पन्नाचे स्रोत त्यांच्याकडे नसत आणि उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असत. जे उत्पन्न होते ते असुरक्षित आणि अशाश्वत होते. त्यामुळे त्यांच्या जीवनात प्रचंड ताण निर्माण होत होता. काही वर्षांनी मी...

A Psycho-financial Experiment

Farmer suicides in India and particularly in Maharashtra is now a so commonly discussed issue that few people bother about it these days. The official reports of the government show that average of about 13,500 farmers die every year because of suicide in India (out of total 134 million souls). Just to put it in comparative perspective, during the Uttarakhand landslides, the worst disaster since 2004, the death toll was over 4000 people. Due to my work with the non profits engaged in agriculture based livelihoods in Vidarbha region, I could get an opportunity to understand this issue first hand. Many of the times there is a psychological distress prior to the suicidal action. During my discussions with farmers this pattern did come up in fact. Farmers reported being entirely dependent on rain-fed agriculture and their rainy season crops were giving one time lump sum income. There was no other income source for the rest of the year. The expenditures were higher than incomes and th...

The Untold Story of Rice Paddies in Bundelkhand

I used to work with a large sized organisation which funded social causes. I handled some agriculture based poverty reduction projects in Bundelkhand. It is a region in north central part of India and is spread across 10 districts along the boundaries of Uttar Pradesh and Madhya Pradesh. The region does not have any large city, gets frequent droughts, has hunger problems and the resultant abject poverty. Add to it, extreme social inequalities and corrupt governance and it creates an ideal recipe for total hopelessness. One of the activities we supported was erecting bunds in the fields and retaining as much rain water as possible. The intervention had a unique problem. For saving their black gram crop, in the event of excess rainfall, farmers were breaking the bunds, since the crop could not withstand water stagnation. Now all this work had a larger purpose, a technical design, required efforts and money. All of that was in danger. An idea sprung up in my mind. It could save the fi...

बुंदेलखंडमधल्या भात खाचरांची न सांगितलेली गोष्ट

मी एका सामाजिक प्रकल्पांना मदत करणाऱ्या मोठ्या संस्थेत काम करत असे. माझ्याकडे बुंदेलखंड प्रदेशामधले काही शेती आधारीत गरीबी निर्मुलन प्रकल्प होते. बुंदेलखंड हा मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश ह्या दोन राज्यांच्या सीमांवर पसरलेल्या १० जिल्ह्यांचा खुप मोठा प्रदेश आहे. तिथे एकही मोठे शहर नाही, भाग बराच दुष्काळी आहे, तिथे भुकबळीही होत असतात कधीकधी आणि कमालीची गरीबीही आहे. त्यात तिकडची सामाजिक विषमता आणि भ्रष्ट व्यवस्था मिळवली की परिस्थिती किती निराशादायी आहे ह्याचा अंदाज येतो. आमच्या प्रकल्पामधला एक कार्यक्रम होता शेतीचे बांध घालण्याचा. त्याद्वारे शेतामध्ये असणारे पाणी बाहेर जाण्यापासून रोखले जात होते व पाण्याची पिकाला उपलब्धता वाढत होती. पाण्याच्या जमीनीत मुरण्यामुळे भुजल पातळी सुधारणार होती. पण हे काम करताना एक वेगळीच समस्या उद्भवली. अतिपाऊस झाल्यावर शेतात बांधांमुळे पाणी साठत होते आणि शेतात त्यावेळी असणाऱ्या उडीद पिकाला ते नुकसानकारक होते. शेतकरी घातलेले बांध तोडत होते. आमचे प्रकल्प करत असलेल्या कामाला एक मुलभुत उद्देश होता, त्यासाठी लागलेले परिश्रम, तांत्रिक रचना आणि आर्थिक गुंतवणूक हे स...

3 Commitments – Part III: Scary Sugar

I remember my great grandfather, my grandmother’s father, who used to visit us sometime when we were kids. He was a very strict person and we were always scared of him though he did not talk with us much. But we always used to like his visits as after entering, he used to call each of us and give a small packet of candies. The candies afterwards went in the custody of our grandmother and she used to give 2 candies every day till the stocks lasted and we used to remain contented. In our joint family, all the sweets were prepared only on the festive occasions and some few Sundays. Sugar consumption was very low in spite of the fact that I used to like it a lot. After finishing education and doing several job stints in other small sized places, I returned back to Mumbai. The culture developed there was very conducive to satisfy my sugar cravings. In our office, the ever enthusiastic assistant named Minubhai provided us with tea and coffee ad libitum and reminded us to take some if we we...

३ संकल्प – भाग ३: भयकारक साखर

मला माझ्या पणजोबांच्या, आजीच्या वडलांच्या, दोन गोष्टी आठवतात. ते जेंव्हा आमच्याकडे मुंबईला यायचे तेंव्हा त्यांच्या कडक शिस्तीच्या स्वभावामुळे आम्ही पंतवंडे त्यांच्या फार जवळ राहायचो नाही. पण तरीही ते यायचे तेंव्हा त्यांच्याभोवती जमा होत असू कारण त्यांनी सोबत प्रत्येकासाठी श्रीखंडाच्या गोळ्यांची पाकिटे आणलेली असायची. ती नंतर अर्थात आजीच्या ताब्यात जायची आणि मग प्रत्येकाला दिवसाला दोन गोळ्या हातावर मिळायच्या. तेवढ्या गोळ्यांवर आम्ही बऱ्यापैकी खुश असायचो. सणाच्या दिवशी, रविवारी घरात बनणाऱ्या गोड पदार्थांची तेंव्हा आतुरतेने वाट पहात असू. लाडू, शंकरपाळे इ पदार्थ दिवाळीला वर्षातून एकदाच बनत होते. साखरेचं प्रमाण आहारात एकंदरीत खुपच कमी होतं कितीही गोड आवडत असलं, आणि ते खाण्याची सतत इच्छा होत असली तरी. मी शिक्षण संपवून मग वेगवेगळी गावं फिरून परत मुंबईत आलो. तिथल्या ऑफीसमध्ये काम करायला लागल्यावर माझ्या गोड खाण्याच्या आवडीला सर्वतोपरी पोषक वातावरण मिळालं. पुर्वी अप्रुप असलेले गोळ्या, लाडू, शंकरपाळे इ पदार्थ हे सहजपणे घराजवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध होत होते त्यामुळे महिन्यातुन कधी कधी आणले जात...

३ संकल्प – भाग २: मेडिटेशन

मेडिटेशनला बरेच जण ध्यानधारणा असा मराठी प्रतिशब्द वापरतात. पण ध्यानधारणा ही योगशास्त्रातील संकल्पना आहे आणि मेडिटेशन ह्या इंग्रजी शब्दाचा बराचसा अर्थ हा लक्षपुर्वक चित्त एकाग्र करणे असा होतो जो कि त्यापेक्षा वेगळा आहे. मला त्यासाठी नेमका प्रतिशब्द मिळत नसल्यामुळे मी इंग्रजी शब्द जसाच्या तसा वापरणार आहे. गेली १४ वर्षे मला अर्धशिशीचा त्रास होतोय आणि कधीकधी तीव्र प्रमाणात असतो. मला आठवतंय की मी २०१० मध्ये घानाला जाण्यासाठी विमानात पाऊल ठेवलं तेंव्हा मनाला बजावलं होतं की मला हा त्रास पुढचे एक वर्ष कधीच होणार नाही. मला आल्यानंतर ८ महिन्यात हा त्रास अजिबात झाला नव्हता आणि मी त्याच्या आनंदात होतो. जेंव्हा फेब्रुवारी महिना सुरू झाला तेंव्हा तापमानात एकदम १०० से. वाढ झाली. एक दिवस मी एका कार्यशाळेत असताना गटचर्चा चालू असताना मला अचानक अर्धशिशीचा त्रास सुरू झाला. असलेलं काम मी माझ्या मित्राकडे जोशुआकडे सोपवलं आणि माझ्या सुदैवाने तिकडे असलेल्या एका गेस्टरुममध्ये पडून राहिलो.  त्याक्षणाला मी फक्त डोक्याच्या अर्ध्या भागात सुरू असलेले वेदनांचे आवेग, पोटातली मळमळ आणि त्यामुळे आलेली हतबलता एवढ्य...

3 Commitments – Part II: Meditation

As far as I remember for last 14 years I have been getting migraine attacks. This health issue has had its various bad consequences. I remember one time when I was in Ghana. Before setting foot on the aeroplane to Ghana, I had mentally tried to give a diktat to myself that I won’t get any migraine attack for that entire year I was going to be there. The eight months went very well and the season changed in February with sudden rise in the temperatures by about 100Celcius. While I was basking about my success of not getting any migraine, at an odd moment when I was typing something on a computer amidst a workshop, it just came. It was like a tremendous burst in the brain. After hurriedly handing over everything I was working on to my friend Joshua, I found myself lying on a bed in the guest room; fortunately there was a one there. The only thing at that moment I could do was to just pay attention to the extreme pain sensations in the head, the nausea and helplessness. Meditation is main...

3 Commitments- Part I

Yes, these are commitments and not commandments so I choose to make them to myself. My work requires me to travel frequently. For quite some years I have been struggling to inculcate some few good habits in myself. I travel for work and that means I don’t completely decide when I would be going away from home and when I am going to come back. I start with some good habits and there they get broken once my travel dates get fixed and I start thinking that anyway these habits are going to get a break then why to care so seriously about them. That’s when these habits go away and I start facing the same troubles again. The 21 day period of lock down is an opportunity to re-look at your troubling problems and get habituated to the good habits that you always wished for. I am going to remain stable at one place for next few days and I have made 3 commitments which relate to the health improvement. The first one is to do exercise regularly, second is to do meditation regularly and third one ...

३ संकल्प – भाग १

माझ्या कामाच्या निमीत्ताने मला बराच प्रवास करावा लागत असतो. कधी बाहेर पडायचं, कधी परत यायचं ह्याचे निर्णय मला एकट्याला घेता येत नाहीत. मी बऱ्याच चांगल्या सवयींना सुरुवात करतो आणि प्रवासाला बाहेर पडलं की त्या सवयींची नियमीतता तुटते. प्रवासामुळे माझं वेळेचं चक्र कायम बिघडलेलं असतं. कुठे काही गोष्टी पुर्ववत करायला जावं तर पुढच्या प्रवासाचं नियोजन चालू झालेलं असतं आणि नाहीतरी आता त्या चांगल्या सवयींमध्ये खंड पडणारच असणार असतो तर कशाला त्या बद्दल चिंता करा असे विचार मनात येतात आणि ती चांगल्या सवयींची साखळी तुटलेली असते. येते २१ दिवस मी कुठेही प्रवास करणार नाही हे नक्की. त्यामुळे मी त्यांच्याकडे चांगल्या सवयी अंगी बाणवण्याची सुसंधी म्हणून बघतो आहे. ह्या चांगल्या सवयी आरोग्याशी निगडीत आहेत. पहिली सवय म्हणजे नियमीत व्यायाम, दुसरी मेडीटेशन (त्याला चपखल मराठी शब्द कोणाला माहीत असेल तर सुचवा.) आणि तिसरी सवय आहारातून अति प्रमाणात असलेली साखर हटवणे. ह्या सर्व सवयींवर काम करायला मी करोनाचे संकट येण्याआधीच सुरूवात केली आहे पण आता मी त्याला आता संकल्पाचे स्वरूप देऊ शकतो आणि योग्य न्याय देऊ शकेन असं ...

21 Day Challenge

Day before yesterday our dear Prime Minister of India announced a 21 Day lockdown of the country. Everybody is at home except some chosen few. If you are not one of these chosen few, I am sure what I am writing will be more relevant to you on this day. Today you might have laughed on jokes that are being circulated on WhatsApp. You might have tried your best to make sure that your neighbour is not able to see the type of grocery items you were able to bring home. You might have started passing your time with binge watching videos on Netflix etc. At its worst, you are now fed up of constant existence of the family members around you and quarrels have started. We in India are still some days behind the world when it comes to the imposed stay at home conditions. The negative things which I mentioned are just the tip of the iceberg when it comes to the worst condition of the people who have to live behind the closed door for prolonged periods. Currently there are reports from other ...

नित्यनेम २१ दिवसांसाठी

परवा आपल्या पंतप्रधानांनी पुढचे २१ दिवस संपूर्ण देश लॉक डाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला. काही निवडक लोक वगळता बहुसंख्य जनता आपल्या घरात बसणार आहे. तुम्ही जर त्या निवडक लोकांमधले नसाल तर मी जे काही लिहीणार आहे ते आजच्या दिवशी तुमच्या परिस्थितीशी संबंधित आहे. व्हॉट्सअॅिपवरून आलेल्या विनोदांवर आज कदाचित तुम्ही हसला असाल. आज जे काही किराणा दुकानातून तुम्ही आणू शकला आहात ते आपल्या शेजाऱ्याला कसं कळणार नाही ह्याचा प्रयत्न तुम्ही कदाचित केला असेल. कदाचित टाईमपाससाठी नेटफ्लिक्स, युट्युब कडे तुमची बोटं सहज वळायला सुरूवात झाली असेल. वाईटात वाईट म्हणजे कदाचित तुमच्या कुटूंबियांचा सहवास अतिप्रमाणात होऊन आता भांडणांना सुरूवात झाली असेल. आपण भारतीय लॉकडाऊनच्या बाबतीत अन्य जगाच्या काही काळ मागे आहोत. लॉकडाऊन नंतर ज्या प्रकारच्या बातम्या इतर देशातून येत आहेत त्या वाचल्या तर मी ज्या काही शक्यता वरती लिहिल्यात त्या हिमनगाचे टोक आहे असे वाटू लागेल. बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊनमधले लोक तीव्र निराशेने ग्रासले जात आहेत, सततच्या भीतीपुर्ण वातावरणामुळे असहाय्य मनःस्थितीत जात आहेत, घरगुती हिंसाचारामध्ये वाढ होत...

ध्वनीक्षेपकांचा उन्माद

मला एक आजपासून साधारण १५ वर्षांपुर्वीचा प्रसंग आठवतो. मी मेळघाटाच्या अंतर्भागातील एका बाह्यजगाशी गाडी रस्त्याचा थेट संपर्क नसलेल्या गावात गेलो होतो. जवळच्या जंगलात तिथल्या एका सहकाऱ्यासोबत फिरत असताना एक तरूण गुराखी गुरांसह फिरताना दिसला. आपला पावा वाजवण्यात दंग होता. पाव्याचे मंद सूर, गुरांच्या गळ्यातील वाजणाऱ्या घंटा आणि पार्श्वभुमीला होती जंगलाची स्वतःची निःशब्द शांतता. स्तब्ध होऊन तो प्रसंग जेवढा मनात साठवून घेता येईल तितका कमीच होता. साधारण ८ वर्षांनी मी मेळघाटात पुन्हा गेलो तेंव्हा काही गुराखी दिसले पण हातात पावा नव्हता. त्याची जागा मोबाईलने घेतली होती, मोबाईल टॉवर नसले तरीही. कुठली तरी ढींच्यॅक गाणी मोठ्या आवाजात ऐकत बसले होते. जंगलाची शांतता कुठेच जाणवली नाही. बाह्य जगाशी जसा तले बदल स्वीकारताना त्यांनी हे ही स्विकारले होते. पाच वर्षापुर्वी मी जेंव्हा गावात येऊन स्थायिक झालो तेंव्हा एक नवीन ट्रेंड अनुभवायला मिळाला. आमच्या गावात हल्ली बारश्याच्या समारंभासाठी दिवसभर लाउडस्पीकरवर रेकॉर्डेड गाणी लावली जातात. बाळाचे कान जणू काही पाळण्यामध्येच ध्वनी प्रदुषणासाठी सज्ज केले जातात ह्य...