Posts

Non Categories

 (Reading time: Approximately 5 minutes) I deviate today from my usual choice of Marathi language for writing my thoughts, observations and stories, and write in English instead. This is the primary language which I have to use for my work in the field called “development sector,” where people professionally do ‘not for profit work’. (This second sentence is just for many of my friends who wonder how on this earth my clients are not earning money for themselves and I still get paid J ) So a few days back I returned from Lalitpur in Uttar Pradesh where I visited some typical villages of Bundelkhand region. Mostly drought affected drylands where people struggle to make ends meet on day to day basis and wrong societal norms are still a formidable hindrance to the just and equitable socioeconomic development in this very year 2021. This is the place where you have to keep aside your expertise on million dollar start ups and trillion dollar economies at least for a while and give a ...

रोझी

Image
  घरात कुत्रा पाळायचा की नाही ह्याविषयी दुमत होतं. प्राणी पाळायचा म्हटला तर त्याची जबाबदारी आली. मुंबईसारख्या शहरात बराच काळ ब्लॉकमध्ये राहिल्यामुळे आणि पायाला चक्र लावून फिरायची सवय असल्यामुळे मला ती अजिबात नको होती. मुंबईत असताना मला एकदा एक भटका कुत्रा चावल्यापासून प्राण्यांविषयीच काय प्राणीप्रेमी लोकांविषयीही मला फारसं प्रेम नव्हतंच पण भटक्या कुत्र्यांना पार्ले जी ची बिस्कीटं आणि कावळ्यांना शेव चिवडा घालत गावभर फिरणाऱ्या लोकांबद्दल तर माझ्या मनात तीव्र तिटकारा होता. आधीचा मांजरं पाळण्याचा अनुभव घेतल्यानंतर आता प्राण्यांची कौतुकं बस झाली असं माझं स्पष्ट मत होतं. आमच्या घरात कुत्रा पाळायचा अशी विचारधारा असलेल्या पक्षाकडे दोन आणि नाही मत असलेल्या पक्षाकडे तीन असे बलाबल होते त्यामुळे आमचेच सरकार स्थिर आहे असं समजून मी स्वस्थ होतो. आणि ऑगस्ट २०१६ मध्ये ती सरळ घरात आली म्हणजे विरुध्द पक्षाने आमच्या मताला सरळ सरळ ठोकरून तिला आणली. हीच ती रोझी. दोन महिन्यांच्या ह्या पिल्लाचं बारसं त्याच्या जन्मघरातच झालेलं होतं. जिथे कुत्राच नको होता तिथे ही कुत्री घरात आली. म्हणजे आता तिला जेंव्हा प...

पोषणाचा फॉर्म्युला

शाळेत, कॉलेजात पोषणाचे पिरॅमिड त्रिकोण शिकवले जातात. कार्बोहायड्रेट, प्रोटीन इ. चे प्रमाण कसं असावं ते घोकून घेतलं जातं. इंटरनेट, टिव्ही वरून दोन वेळा जेवा की चार वेळा खा ह्याबद्दल सल्ले, चर्चा, वाद झडत असतात. कुठल्या पदार्थांमध्ये कुठले व्हिटॅमीन, मिनरल, अँटी ऑक्सिडंट असतात वगैरे विषयावरून त्यांच्या भरभरून जाहिराती केल्या जात असतात. आणि तरीही ह्या सर्व गदारोळात एका बाजुला सुखवस्तू समाजात लोकांचे कमरेचे घेर वाढत चालले आहेत तर गरीब वर्गात कुपोषणाचं प्रमाण वाढत चाललं आहे. योग्य पोषणाचा काही एखादा सरधोपट फॉर्म्युला कुठे असेल कि ज्यासाठी दररोज किती खाल्लं त्याचं वजन, कॅलरी ह्यांचा ताण न घेता आयुष्य जगता येईल हा प्रश्न मला बरेच दिवस पडतोय.   खरं तर शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात स्वच्छ हवा, पाणी, वनराई वगैरे असल्यामुळे लोकांचं आरोग्य एकदम चांगलं असलं पाहिजे अशी लोकांची अपेक्षा असते परंतु मी जेंव्हा रत्नागिरी जिल्ह्यात आजुबाजूला बघतो तेंव्हा बहुतांश लोक विविध आरोग्याच्या समस्यांनी गांजलेले असतात. इथल्या बऱ्याच स्त्रिया व काही पुरूषही रक्तक्षयाने ग्रासलेले असतात. काम करायची शक्ती आणि ...

कोकणातल्या फणसाचं काय करायचं?

Image
  कोकणात फणसाची लागवड दोन प्रकारची आहे. एक म्हणजे नवीन होत असलेली कलमांपासून होत असलेली लागवड. ह्यामध्ये स्थानिक तसेच विविध एक्झॉटीक प्रकारतील मुख्यत्वे कापा प्रकारातल्या फणसाची छोटी तसेच मोठी लागवड होत आहे. लागवड करणारे शेतकरी काही हौशी आहेत तर काही लोकांची व्यावसायिक पातळीवरही आहे. त्यामागे काही व्यावसायिक गणिते नक्की असतील आणि त्याचा विचार लागवड करणाऱ्याने केला असेल असे आपण गृहीत धरू शकतो. जी दुसरी लागवड आहे ज्याचा फारसा व्यावसायिक विचार सध्या होताना दिसत नाही ती म्हणजे आपली जुनी झाडे. त्यांचे पर्यावरणीय आणि व्यावसायिक असे दोन्ही प्रकारचे मूल्य आहे ते समजून घेतले तर त्याचा खुप चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना उपयोग होऊ शकेल आणि नवीन लागवडीचा खर्च न करता, आहे त्या झाडांपासून अधिक उत्पन्न मिळवणे शक्य होईल.   कोकणातली सर्वच जुनी लागवड हि बियांपासून केल्यामुळे त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात वैविध्य आहे आणि एखाद्या मोठ्या मार्केटला जसे एकसारखे उत्पादन लागते तसे त्यापासून मिळू शकत नाही ही एक जुन्या लागवडीच्या फणसाबाबत समस्या आहे. अश्या परिस्थितीतही एखाद्या शेतकऱ्याकडे समजा ५ झाडे आहेत...

फणसाचं काय करायचं?

Image
प्रथम थोडासा स्वानुभव लिहितो. आमच्याकडे फणसाची तीनच लागती झाडं आहेत. जेंव्हा सात वर्षापुर्वी मुंबई सोडून आम्ही आमच्या गावाला कायमचे रहायला आलो तेंव्हा दोन झाडे लावून नुकतीच दोन वर्षे झाली होती आणि एका जुन्या मोठ्या झाडाच्या फळांमध्ये भरपुर चीक होता आणि गरे इतके लहान होते की ते काढायचाही आम्ही कंटाळा करत असू. भाजीसाठीही तो फणस इतका चांगला नव्हता. त्यामुळे एकंदरीत फणसाच्या झाडांकडे आमचे दुर्लक्ष होते. एकदा लक्षात आलं की त्या जुन्या झाडाच्या खोडाला किडा लागलेला आहे आणि त्यामुळे ते झाड अजुन खराब होऊ शकतं. मग ती किड काढून टाकून त्या झाडाच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्याही कापल्या कारण त्याची सावली बाजूच्या आंब्याच्या कलमांवर पडत होती. त्याच्या दुसऱ्या वर्षी हे झाड फळांनी भरपुर लगडले. ह्यावर्षी त्याची फळे खुप सुधारली होती आणि चवीष्टही होती. नवीन लावलेल्या दोन्ही झाडांनाही बरेच फणस धरले.   गावातल्या सर्वसाधारण शेतकऱ्यांना पडतो तो पहिला प्रश्न आम्हालाही पडला तो म्हणजे ह्या इतक्या साऱ्या फणसाच्या फळांचं करायचं काय? आम्हाला जसा काहीच अंदाज नव्हता तसाच दुर्दैवाने तो आजुबाजूच्या शेतकरी लोकांन...

आर्थिक गोष्टी फणसाच्या

Image
ह्या गोष्टी आपल्याकडे फारश्या माहित नाहीत. पण त्या वाचून आपल्याकडे कोकणात आपण केवढ्या मोठ्या सहजपणे उपलब्ध अश्या आर्थिक स्रोतावर फारसं काहीही न करता बसलो आहोत ह्याची जाणीव नक्की होईल. • मुंबईमध्ये बऱ्याच जणांनी मोठमोठे कापे फणस त्यांचे गरे काढून रस्त्यावर विकले जात असताना पाहिले असतील. बरेचसे कोकणी लोक हे पाहतात तेंव्हा “एवढे महाग गरे कोण खाणार. गावाला जाऊ तेंव्हा पोटभर मिळतील ते सुध्दा फुकट!” असा विचार करून सरळ पुढे जात असतात. हे मोठ्या आकाराचे फणस एका छोट्याश्या परिसरातून येतात हे बऱ्याच लोकांना माहित नसते. पनरूती हे तामिळनाडूच्या कडलोर जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव. ह्या परिसरात साधारण १००० हेक्टरमध्ये फणसाची लागवड आहे आणि हेक्टरी सरासरी ४० टन उत्पादन ह्या शेतकऱ्यांना मिळते. शेतकऱ्यांना फणस फळाला अंदाजे १० रु प्रति किलो प्रमाणे दर मिळतो म्हणजे साधारण ४०० कोटी रुपयांची ह्या परिसरात निव्वळ फणसाच्या माध्यमातून उलाढाल होते. ह्यामधील पनरुती मार्केटमध्ये जो फणस येतो त्यातील २५% टक्के फणस एकट्या मुंबई शहरात पाठवला जातो असे येथील व्यापारी सांगतात म्हणजेच मुंबई शहर पनरुती परिसराला किमान १०...

कोकणचं गुणी कार्टं - फणस (भाग १)

Image
आपल्याकडे एक जुनी म्हण आहे. “आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं”. सध्याच्या आधुनिकतेच्या जमान्यात ती म्हण आपल्या अश्या अनेक जुन्या चांगल्या गोष्टींच्या बाबतीत आपण विरूध्द करून वापरत असतो. कोकणातला फणस हे असंच एक स्वतःचं गुणी पण सवतीच्या मुलाप्रमाणे वागवलं जाणारं कार्टं.   कोकणात, प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही फणसाचे वृक्ष लोकांनी तोडले नाहीत म्हणून खुप मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहेत. ह्यातल्या बऱ्याचश्या न तोडण्यामागे पुर्वजांची आठवण हा खुप मोठा भाग असतो. ज्यांच्या आठवणीसाठी हे वृक्ष तोडलेले नाहीत ते सध्याच्या कोकणवासीयांचे पुर्वज अश्याप्रकारे फणसाची लागवड उगीच करत नव्हते आणि मोठाले प्रचंड वृक्ष जीवापाड उगीच जपतही नव्हते. गावातल्या जुन्या जाणत्या लोकांना बोलतं केलं किंवा किमान त्यांच्या जुन्या जमान्याचं कौतुक सांगणाऱ्या, वरकरणी बोअरिंग वाटणाऱ्या गोष्टी नीट लक्ष देऊन ऐकल्या तरी फणस ह्या झाडाचे अनेक अनोखे पैलू समोर येत जातात.   हल्ली आपण अन्नसुरक्षा सरकारी रेशनशी जोडत असतो पण पुर्वीच्या जमान्यात ह्या लोकांनी फणसाचे अन्न सुरक्षेसाठी असलेले महत्...