Posts

ग्रामीण भागातील कचरा समस्या- ३

साधारण कुठल्याही दररोजच्या घरगुती कचऱ्यामध्ये एकुण वजनाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त भार हा सेंद्रीय कचरा असतो. हा कचरा जर इतस्ततः टाकला किंवा उघड्यावर जमा केला तर त्यामुळे बऱ्याच समस्या तयार होतात. अश्या कचऱ्यामुळे माश्या, डास, उंदीर, भटकी जनावरे ह्यांचा उपद्रव तर वाढतोच परंतु दुर्गंधीचीही समस्या तयार होते. ह्या कचऱ्याकडे टाकाऊ म्हणून न पाहता त्याच्याकडे एक चांगला स्रोत म्हणून बघता येते परंतु बहुसंख्य लोकांना त्याबद्दल जाणीव किंवा योग्य माहिती नसल्यामुळे हा आपल्या रोजच्या जीवनातला एक चांगला घटक फक्त वायाच जात नसतो तर आपल्या जीवनात विविध समस्या निर्माण करत असतो. ह्या कचऱ्याचे काही उपयोग आपण आता समजून घेऊ.  त्याचा सगळ्यात सोपा व सहज करता येण्यासारखा उपयोग म्हणजे त्याचे खत बनवणे. घरगुती कचऱ्यापासून केलेले खत हे विविध शेतीपोषक घटकांनी समृध्द असते. त्यामुळे शेतीच्या उत्पादकतेत त्याच्या वापराने प्रचंड वाढ घडवून आणता येते. जर एखाद्या कुटंबाची स्वतःची शेती नसेल तर असे खत बनवून ते अन्य शेतकऱ्यांना देऊन त्याच्या बदल्यात विषमुक्त अन्नधान्य, फळे, भाजीपाला मिळवू शकतात.  खत बनवताना ते विविध...

ग्रामीण भागातील कचरा समस्या- २

ग्रामीण भागातील कचरा समस्या- २ सर्वसाधारण पणे घरगुती कचऱ्यामध्ये काय असते? स्वयंपाकघरातील फळे भाजीपाल्यांची साले, देठे असे पदार्थ, जेवणातील उष्टे, विविध पॅकिंगला वापरलेले प्लास्टिक, कागद, पुठ्ठे, लाकूड आणि थोड्या प्रमाणात धातूचा कचरा. बऱ्याचश्या घरांमध्ये कचरा कोपऱ्यात ठेवलेल्या एखाद्या बालदीमध्ये साचवला जातो आणि बालदी भरली की मग वस्तीच्या बाहेर हा कचरा फेकला जातो. जेंव्हा असा ओला व सुका कचरा एकत्र ठेवला जातो तेंव्हा कालांतराने जसजसे त्या कचऱ्यामधल्या सेंद्रीय द्रव्याचे विघटन चालू होते तेंव्हा त्याला अतिशय घाणेरडा वास सुटतो आणि बुळबुळीतपणा तयार होतो. अश्या कचऱ्याकडे भटके प्राणी, उंदीर, घुशी आकर्षित होतात तसेच हा कचरा माणसाने हाताळणे त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असते.  शहरांमध्ये बऱ्याच अंशी असा कचरा घरोघरी जाऊन जमा करण्यासाठी कंत्राटी कामगार ठेवले जातात. हा कामगार वर्ग बहुतांश समाजाच्या शोषित घटकांमधून येत असतो आणि आजही त्यांना अतिशय कमी पगारावर काम करावे लागते. गावांमध्ये असे काम करणारेही नसतात त्यामुळे हा कचरा बहुतांशवेळा रात्री अंधार झाला की वस्तीच्या बाहेर टाकून दिला ...

ग्रामीण भागातील कचरा समस्या- १

उंच सह्यकडा आणि अरबी समुद्र ह्यांच्या मधला हिरवाईने नटलेला लाल मातीचा डोंगराळ असा आपला कोकण प्रदेश फार पुर्वीपासून मराठी साहित्यिकांचा फार आवडता विषय आहे. पण हे पुर्वीचं आपलं कोकण आता कधीच बदललंय. पुर्वी बोटींमधून, खाडीतल्या वल्ह्याच्या होड्यांमधून, बैलगाड्यांमधून लांबचे खडतर प्रवास करणारे आपले आजोबा, पणजोबा ंच्या सगळ्या गोष्टी, अनुभव आता इतिहासजमा झाल्या आहेत. नारळ पोफळीच्या बागा, भाताची खाचरे, समुद्राच्या लाटा, पाण्याचे झरे, गावातली निरव शांतता हे मात्र काही प्रमाणात अजुनही टिकून आहेत. ह्या सर्व गोष्टींचं आकर्षण शहरात स्थायिक झालेल्या चाकरमान्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांनाच नव्हे तर देशभरातल्या अनेक पर्यटकांनाही खेचून आणत असतं. आता इथला प्रवासही नवीन महामार्गांमुळे आणि रेल्वेमुळे सुकर झालाय. बरीचशी गावं आता मोबाईलच्या जाळ्याने जोडली गेली आहेत त्यामुळे संपर्क साधणंही खुप सोपं झालंय. आता मुंबईहुन सहजपणे जवळच फिरून यावं तसं वीकएण्डला, जोडून सुट्ट्या आल्या की किंवा असंच मनात आलं तरीही रत्नागिरीला जाऊन येता येतं. बऱ्याच शहरी लोकांनी गावागावात जमिनी विकत घेऊनही सेकंड होम बांधली आह...

हौ ना भौ!

हल्लीच मी अकोला जिल्ह्यातील काही गावात गेलो होतो. कामाच्या पलीकडे झालेल्या अनेक गप्पा बऱ्याच वेळा आपल्या देशाच्या दशेबद्दल बरंच काही सांगून जात असतात. आताच्या लेखातील सगळे प्रसंग मागासवर्गीय जातीच्या लोकांसोबत फिरताना अनुभवले आहेत. त्या वस्तीतील बहुतांश लोक मोलमजूरी करणारे आणि उर्वरीत गावापेक्षा अधिक गरीब असणारे. बचत गटाच्या महिलांसोबत माझा कामाचे विषय झाल्यानंतर एक तरूण मुलगी मला विचारू लागली, “सर, माझी डिग्री पुर्ण झाली आहे. मला ह्या बाकीच्या बायांसारखं शिवणकाम, शेती वगैरे काही करायचं नाही. मला माझ्या लायकीचं काम गावात राहून करता येईल का?” घरच्यांनी तिला आपल्या कोरडवाहू शेतीच्या जोरावर, मोलमजुरीच्या आधारावर शिकवले होते. पोरगी सुक्ष्मजीवशास्त्र घेऊन बीएस्सी झाली होती. मी तिला विदर्भात ग्रामीण भागातील शेती आधारीत असलेल्या मोठ्या अर्थव्यवस्थेत सध्याच्या परिस्थितीत विविध बॅक्टेरियल कल्चर, बायोकंट्रोल चा उद्योग एखाद्या छोट्याश्या गावात अगदी कमी जागेत, शहरापासून दुर ठिकाणीसुद्धा कसं करता येईल ह्याबद्दल सांगितलं. तीला त्या विषयाच्या डिग्रीमुळे हे सगळं आधीच माहित होते. माझं म्हणणं काही पटल...

लगे रहो!

गेल्या दिड महिन्यात कामाच्या निमित्ताने फिरताना काही चर्चा गप्पा झाल्या. त्यांचा एकमेकांशी काही तसा संबंध नाही पण त्यातले बिंदू जोडत गेलो तेंव्हा एक समान धागा मिळाला. प्रसंग- १ छत्तीसगड राज्यातील एक बऱ्यापैकी अंतर्भागातील गाव. मायनिंगमुळे विस्थापित झालेल्या बहुतांश बैगा आदिवासींची वस्ती. अगदी वीस वर्षांपर्यंत बाहेरच्या जगाशी अगदी थोडका गरजेपुरता संपर्क ठेवत, आपला तीर कमठा घेऊन जंगलात शिकार करणारे, कमीत कमी कपड्यात राहणारे हे लोक विस्थापित झाले आणि त्यांचा स्वतःला विकसित मानणाऱ्या लोकांशी अगदी जवळून संपर्क येऊ लागला. लोक सांगत होते, “पुर्वी आमच्याकडे लग्नं चार पाच हजार रुपयात होत होती. हुंड्याची पध्दत आम्ही अजुनही पाळत नाही पण आता आम्हाला पाहुण्यांसाठी विदेशी दारूचे खंबे, मटणाची महागडी जेवणं, डिजे पार्ट्या, गाड्या ह्या गोष्टींवर खर्च करावा लागतो. लाखभर रुपयेही पुरत नाहीत. पुर्वी रोख पैसा फारसा हाताशी नव्हता पण त्याबद्दल कधी दुःख वाटले नाही. आता गरीबीची लाज वाटायला लागली.” प्रसंग- २ आकाराने झपाट्याने वाढणाऱ्या बंगलोर महानगराच्या छायेत असणाऱ्या कोलार जिल्ह्यात गेलो होतो. तिथे कसा ...

Indo Ghanaian Cuisine

No, there is no such thing called Indo Ghanaian cuisine. But it is an opportunity which some of us have lost and some of the people who are currently living there can tap.   The story starts at about month of March in 2010 when it got confirmed that I shall be going to Ghana as a VSO volunteer. The first bit of information I started to search for was about food. Most of the reports about food in Ghana were written by western travellers and volunteers. The reports were pretty frustrating as to tell you how difficult it is to adjust with it and how the food is poor in nutrition. At the same time having academic background in Agriculture the second thing that I searched for was about crops cultivated in the Upper East Region of Ghana where I was to be based. Surprisingly the set of crops which they were growing was very similar to what we commonly cultivate in south central parts of India. There was no chance for somebody to not have nutritious food on plate as per my reading on the i...

Non Categories

 (Reading time: Approximately 5 minutes) I deviate today from my usual choice of Marathi language for writing my thoughts, observations and stories, and write in English instead. This is the primary language which I have to use for my work in the field called “development sector,” where people professionally do ‘not for profit work’. (This second sentence is just for many of my friends who wonder how on this earth my clients are not earning money for themselves and I still get paid J ) So a few days back I returned from Lalitpur in Uttar Pradesh where I visited some typical villages of Bundelkhand region. Mostly drought affected drylands where people struggle to make ends meet on day to day basis and wrong societal norms are still a formidable hindrance to the just and equitable socioeconomic development in this very year 2021. This is the place where you have to keep aside your expertise on million dollar start ups and trillion dollar economies at least for a while and give a ...