Posts

रत्नागिरी जिल्ह्यातील आत्महत्या

  21-12-2023 साधारण दोन वर्षांपुर्वी सलग दोन तीन महिन्यात आजुबाजुच्या परिसरातुन आत्महत्यांच्या घटना एकामागोमाग ऐकिवात आल्या आणि एक विषय मनात चाळवला गेला. मी पुर्वी टाटा ट्रस्ट मध्ये नोकरी करत असताना विदर्भातील शेतकरी आत्महत्या ह्या विषयाशी संबंध आला होता आणि आपला परिसरही एखाद्या मानसिक महामारीच्या कडेलोटावर तर नाही ना अशी शंका मनाला चाटून गेली होती. साधारण विदर्भातील बऱ्याचश्या केसेस मध्यमवयीन पुरूष शेतकऱ्यांच्या होत्या. ज्यामध्ये शेतीचे कोसळलेले आर्थिक गणित आणि कुटूंबातील वाढते खर्च ह्यांचा ताळमेळ बसत नसल्याने होत असलेल्या ओढाताणीचे पर्यवसान आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यात होत होते. परंतु रत्नागिरीच्या परिसरातील ज्या केस ऐकल्या होत्या त्या सर्व तरूणांच्या होत्या. नेमके काय होत आहे ह्याची अधिक जाण व्हावी ह्यासाठी आमच्याकडील एका स्थानिक वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्या गेले पन्नास दिवस पाहत गेलो आणि काही निश्चित कल म्हणता येतील असे लक्षात आले. गेल्या पन्नास दिवसात रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत घडलेल्या १३ आत्महत्यांची नोंद मिळाली. त्यामध्ये १८-३० ह्या वयोगटामध्ये ५ होत्या तर ३१-६०...

ग. म.

Image
  कोकणातील ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृती भारताच्या इतर ग्रामीण भागातील लोकांप्रमाणेच साधी सोपी सरळ आहे. बहुतांश कोकणातल्या बाहेरच्या लोकांचा समज असतो तसा इथला ब्राह्मण समाज पांढरपेशा नाही तर शेती बागायतीची श्रमाची कामे करणारा आहे. प्रत्येक जातीची जशी स्वतःची खाद्य परंपरा ( cuisine ) विकसित झालेली आहे तशी इकडच्या ब्राह्मण समाजाचीही आहे. तिखट, मसाले, कांदा, लसूण, तेल ह्या घटकांचा कमीत कमी वापर ही त्याची पहिली ओळख आहे. तांदुळ, खोबरे ह्या दोन स्थानिक घटकांचा वापर जेवणात अपरिहार्यपणे असणे ही अर्थात त्याची दुसरी ओळख आहे. अर्थात मग त्यात पोटओळखी ही असतात विविध तालुके, जिल्हे, पोटजातींच्या अनुसार पण इथे सांगितलेले दोन मुद्दे किमान समान प्रकारचे असतात. ब्राह्मणी भोजन ह्या नावाखाली बऱ्याचवेळा पेशवाईतला थाट, लग्नातल्या पंगती वगैरे गोष्टींची चर्चा घडत असते पण गावात उपजीविकेसाठी चार पाच आघाड्यांवर धावणाऱ्या, संयुक्त मोठ्या कुटूंबांमध्ये राहणाऱ्या समाजाला ही दहा बारा किचकट पदार्थांची गुंतागुंत रांधणे आणि खाणे परवडत नाही. हि पदार्थांची गुंतागुंत सण, उत्सव, लग्न, मुंज अश्या क्वचित प्रसंगीच असते....

अट्टहास टोमॅटोचा

साधारण असाच जुन किंवा जुलै महिना होता २०१२ सालचा. मराठवाड्याचा अजुन एक भीषण दुष्काळ पाहून झाला होता. अश्या कठीण परिस्थितीत पाण्याशी संबंधित नाविन्यपुर्ण पध्दतीने काम करणाऱ्या श्री. मधुकर धस ह्यांच्यासोबत मी त्यांनी काम केलेल्या जालना जिल्ह्यातील काही गावात फिरत होतो. एक पाणीदार माणूस म्हणून मधुकर भाउंची ओळख होती च पण त्यांची एक नवीनच बाजू मला फिरताना समजून आली. नुकत्याच दुष्काळाने तापून निघालेल्या माळरानावर नव्याने पडलेल्या पावसाने फक्त गवतच नव्हे आणि अनेकविध वनस्पती उगवून आल्या होत्या आणि मधुकरभाऊ मला अनेक वनस्पतींची माहिती आणि उपयोग सांगत होते. त्यातल्या जवळजवळ १०-१२ वनस्पती अश्या होत्या कि ज्यांचा भाजी म्हणून आहारात सहज उपयोग करता येण्यासारखा होता. मेंढपाळ कुटूबात जन्मलेल्या आणि रानामध्ये मेंढ्या चारण्यात बालपण गेले ल्या मधुकरभाऊंसारखं अनुभवसिध्द ज्ञान ज्यांच्याकडे आहे आणि जे त्याचा जीवनात उपयोग करू शकतात त्यांना टोमॅटोची किंमत १०० रुपये किलोपेक्षा जास्त झाली तरी काही फरक पडणार नाही. ज्यांना फरक पडतो ते सर्व लोक आज चिंतेमध्ये आहेत. ह्या किंमती खाली उतराव्या जेणेकरून लोक रस्त्यावर...

Consistency Compounded

Typically every person in this world does not listen to each and every thing our parents tell us to do. If people were doing only that then world will not have changed in anyway. But then there are certain things, which these modern day business or fitness gurus wont tell you and not even your friends and colleagues. If your parents have told you the thing which I have now written about, then there is a high chance you might have overlooked or brushed it aside like I did in my youthful times.  While you have been watching or listening to podcasts on YouTube, a lot of advertisements of random self-proclaimed life gurus pop up. All try to sell you their training courses, online seminars on how to become smart, to have passive incomes, to have multiple incomes, to get out of your boring jobs and many more such subjects. Nobody tries to sell you the virtue of consistency. So I thought I would just write about it and share it silently reminding that one important thing our parents were ...

उद्योग पळवण्याचा उद्योग

सध्या महाराष्ट्रातील विविध राजकीय विरोधक राज्यातील उद्योग अन्य राज्यात कसे पळवून नेले जात आहेत त्यावर राळ उठवत आहेत. दोन मिनिटात वीस ब्रेकिंग न्युज आणि स्वघोषित तज्ञांनी काढलेल्या एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या ह्यापलीकडे फारसं काही देऊ न शकणाऱ्या मीडियाला असली भडक वाक्यं घेऊन परत परत दाखवणं खुप सोपं असतं कारण कोणाला फारसे प्रश्न विचारून त्याचा तपशील घेऊन मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करण्याची तसदी घेण्याची गरज नसते. का, काय, कोणी, कुठे, कोणाला, कसे असे सहा प्रश्नार्थक शब्द आपल्या भाषेत आहेत. ते कुठल्याही घटनेच्या बाबतीत जर ते विचारता येत नसतील आणि सध्याची माध्यमे त्याबाबत माहिती पुरवण्यास असमर्थ असतील तर असल्या उपयोगहीन वस्तू व सेवांवर खर्च आणि वेळ कशाला खर्च करायचा हा मोठा प्रश्न आहे. तसंच काहिसं उद्योगांचंही आहे. उद्योग, व्यवसाय म्हणजे लोकांच्या चरितार्थाचं साधन असतं. एखादी मुलं पळवणारी टोळी असते किंवा दरोडे घालून वस्तू चोरून नेता येतात तसे उद्योग पळवता येत नाहीत हे ज्ञान एखादा अल्पशिक्षित अल्पभुधारक शेतकरी किंवा रस्त्यावरचा निरक्षर फुगेवालाही बाळगतो. व्यवसायासाठी निव्वळ कच्च्या मालाची ...

मान्सूनमधला जुगार

सध्याचा जमाना झटपटपणाचा आहे. भूक लागली की दोन मिनिटात तयार होणाऱ्या इन्स्टंट नूडल सध्या गावातली शेतकऱ्यांची लहान मुलेच नव्हे तर त्यांचे आईबापही खात असतात. जात्यावर दळण दळून चुलीवर भाजलेल्या भाकऱ्या कितीही चविष्ट लागत असल्या तरी त्या बहुतांश सोशल मिडियावरील रील मध्येच असतात आणि त्या करणाऱ्या म्हाताऱ्या आज्जीबाईच असतात. नविन पिढी असल्या फंदात पडत नाही. वेळ आणि श्रम वाचवणारी नवीन यंत्रे उपलब्ध असताना तशी अपेक्षा करणे चुकीचेही आहे. परंतु सारासार विचार न करता पैसे देऊन फक्त दुकानामध्ये सहज उपलब्ध आहेत म्हणून कुठल्याही वस्तू घेण्याची लागलेली सवय आपला नकळत घात करत असते.   असंच काहीसं शेतीचंही आहे. साधारण दरवर्षी शेतकरी ज्या जातींचे बियाणे लावतात त्याच्या खरेदीच्यावेळी एक महत्वाचा निकष असतो कि किती कमीतकमी कालावधीमध्ये ते पीक तयार होईल. गेल्या काही वर्षात हा कालावधी कमी कमी होत चालला आहे. साधारणपणे ३० वर्षांपुर्वी रत्नागिरी परिसरात भातपीक सरासरी १२५ दिवसांचे होते ते आता १०० दिवसांवर आलं आहे. पावसाचे प्रमाण कमी जास्त होत असले तरी पावसाळ्याचा एकूण कालावधी काही कमी झालेला नाही. ऑक्टोबरमध...

गोष्टी माती संरक्षणाच्या

तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यामध्ये नेखुंडी नावाचं एक गाव आहे. हा तामिळनाडूचा साधारण कमी पावसाचा दुष्काळग्रस्त मानला जाणारा भाग आहे. बराचसा डोंगराळ भाग असल्यामुळे पडणारा पाऊस जमिनीमध्ये थांबत नाही तर पुढे वाहत निघून जातो. साधारण ८०० मिमी पाऊस पडत असला तरी हलक्या मातीच्या जमिनी, उघडे बोडके डोंगर अश्या सर्व परिस्थितीमुळे विहिरींमध्येही पाणी फारसे नसते. जिथे प्यायच्या पाण्याचीच टंचाई असते तिथे सिंचनासाठी कुठून पाणी येणार.   ह्या नेखुंडी गावामध्ये पियुष मानुश नावाच्या एका उद्योजकाने साधारण दिड एकर उताराची, शेतीसाठी निकृष्ट समजली जाणारी जमीन विकत घेतली. हा माणूस जवळच्या सेलम शहरात राहत होता आणि त्याचा फर्निचरचा व्यवसाय होता. व्यवसायाला उपयोगी होईल म्हणून त्याने ह्या जमिनीत काही फर्निचरला योग्य लाकूड देणाऱ्या वृक्षांची लागवड केली. एक वर्षानंतर अतिशय खडतर वातावरणात कमी पाण्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात बांबूची रोपे तग धरून राहिल्याचे लक्षात आले.   त्याचा हा प्रयोग पाहून त्याच्या काही मित्रांनीही ह्या परिसरात त्याच्या शेजारीच काही जमिनीचे तुकडे विकत घेऊन एक गुंतवणूक म्हणून बांबूच...