Posts

Passing through....

I am not feeling well. My legs are hurting and my head is paining. . I am currently at my parent’s place in Vileparle. In the morning I had decided to buy that right blend of tea which is available at a certain tea shop in a busy market area in South Mumbai. Having come all the way from 350 km after a bumpy bus journey, I don’t want to do ride in the hustling and noisy local train to that crowded Masjid Bunder area while I am enjoying the comfort of this place surrounded by trees. I move myself. The task is in my list for today and ticking on it is important. After crossing through series of heavily trafficked roads, my fast walk ends at Vileparle railway station.   I find myself running since the train to take me to the destination is just one minute away from reaching the platform. I hop on the train. It is not the rush hour but still there is no place to sit. I remain standing wiping the sweat off my face. I feel shitty for having to go through this entire journey. I remi...

शाळा

जुन्या कागदपत्रांच्या फायली आवरताना एक फाईल मी हमखास न बघता आतापर्यंत ठेवून देत असे ती म्हणजे शाळेच्या प्रगतीपुस्तकांची. ते पिवळे पडलेले कागद डोळ्यासमोर नको वाटत आणि फाडून फेकूनही देववत नसत. आज ठरवलं की ते एकदा बघायचेच. त्या जुन्या शाळेच्या आठवणींना सामोरे जायचेच. एक एक प्रगतीपुस्तक बघताना त्यातले मार्क तपासून बघताना मला एक मजेशीर आलेख दिसत होता. इयत्ता सहावी पर्यंत साधारण बरे मार्क. चौथीची शिष्यवृत्ती, सहावीला बालवैज्ञानिक परीक्षेत चांगले यश वगैरे. सातवीपासून मार्कांमध्ये भरपूर घसरण. मग मधेच कुठेतरी गणित आणि इंग्रजी सारख्या असंबध्द विषयांमध्ये चांगले गुण. दहावीपर्यंत मार्कांमध्ये सर्व विषयात घसरण चालू असताना दहावीला अचानक राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात निवड आणि संस्कृतमध्ये सर्वोच्च गुण. ह्या सगळ्यामध्ये तसं तार्किक संबंध लावणं कठीण होतं. त्या ६० मुलांच्या वर्गामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देणं कठीणच होतं. त्यातही त्यावेळी आमची पार्ले टिळक विद्यालय ही शाळा दहावीच्या गुणवत्ता यादीमध्ये आपले विद्यार्थी झळकवण्यात प्रसिद्ध होती. त्यामुळे मला वाटतं ...

अनुभव विपश्यनेचा

मी विपश्यना ध्यान शिबीराला जाण्याचा निर्णय तसा सहजच घेतला नव्हता. सात आठ वर्षापुर्वी माझ्या एका मित्राने त्याबद्दल सांगितले होते तेंव्हापासून तेथे एकदा तरी जाऊन बघावे असा विचार मनाच्या खोल कप्प्यात कुठेतरी दडून राहिला होता. माझ्यासाठी अजून एक महत्वाची गोष्ट ही होती की विपश्यना ध्यान भारतात आणणारे गुरूजी श्री. सत्यनारायण गोएंका यांनी त्यांचे अर्धशिशीचे दुखणे विपश्यनेद्वारे बरे केले होते. आणि मी फक्त अर्धशिशीच नव्हे तर इतर अनेक छोट्या आजार दुखण्यांनी सतत त्रस्त असतो तेंव्हा विपश्यना शिबीर करून काही फायदा झाला तर पहावा असा विचार करत होतो. त्याबद्दल इंटरनेटवर माहितीही मिळवली पण सलग १० दिवस बाह्यजगाशी कुठल्याही संपर्काशिवाय रहायचे म्हटल्यावर त्याचा विचार रहीत केला. एका सकाळी परत एकदा विपश्यनेचा विचार मनात बळावला आणि ठरवले काही झालं तरी हे शिबीर एकदा तरी करायचंच आणि आताच काही दिवसात करायचं. बरेच शोधल्यावर ठाणे जिल्ह्यतील टिटवाळा येथील धम्म वाहिनी केंद्रामध्ये वेटींगवर जागा उपलब्ध दिसल्या. बऱ्याचश्या निराश अवस्थेत मी तिथे अर्ज केला आणि दुसऱ्याच दिवशी प्रवेश निश्चित झाल्याचा इमेल इनबॉक्समध...

बदललेल्या पार्ल्याच्या निमित्ताने

मी मुंबईकर आहे पण पक्का नाही. मी मुंबईत वाढलो परंतु माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी हे शहर सोडले आणि तरीही मुंबईचे माझे आकर्षण आणि प्रेम तसेच आहे. ह्या शहराचा आत्यंतिक अभिमान मला कधी वाटला नाही तरीही मला येथे परत परत यावेसे वाटते. कदाचित त्याच ओढीने मी हा लेख लिहितोय. माझ्या आजोबा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गावाकडून आंबे, आंबापोळी, फणसपोळी, तळलेले गरे इ वस्तू ते आणत असत. त्याच्या पार्ल्यातल्या डिलिव्हरीचे काम आम्हा नातवंडांकडे लागलेले असायचे. ते करता करता पार्ल्याच्या रस्त्यांवरून वाट मिळेल तसे भटकणे हा माझा छंदच झाला. माझे मित्रही असेच पायी भटकणारे मिळाले असावेत त्यामुळे बहुदा. पार्ल्यात आलो की मी एकदा तरी भटकून येतोच. तीस वर्षापुर्वी रस्त्यावरून चालताना झाडांवरची जांभळे खाता येत होती. दारावर फेरीवाले, दिवाळीला उटणं विकणारे काका अगदी सहज येत होते. मी ज्या पुर्व पार्ल्यात वाढलो तो बहुतांशी सुशिक्षित मध्यमवर्गीय मराठी भाग होता. शासकीय नोकऱ्या करत आपल्या शांतताप्रियतेच्या कोशात जगत राहणारी कुटंबे येथे स्थिरावली होती. आमच्यावर संस्कार करण्याचे ध्येय असणाऱ्या शाळा आणि व्यायामशाळा होत...

उत्सव की स्ट्रीट पार्टी

मला काही वर्षांपुर्वी टिव्हीवर पाहिलेला एक प्रवासविषयक कार्यक्रम कायमचा लक्षात राहीला आहे. तो कार्यक्रम एका परदेशी वाहिनीने भारतासंबंधी त्यांच्या देशात दाखवण्यासाठी तयार केला असल्यामुळे त्यातील काम करणारा सूत्रधार त्यांच्या पध्दतीने त्याची भारताबद्दलची निरीक्षणे मांडत होता. कार्यक्रमाचा शेवट त्याने मुंबईच्या गणेशोत्सवाने केला. त्यातली गर्दी, प्रचंड मोठ्या मूर्ती यांच्या विहंगम दृश्यांबरोबरच तिथल्या वातावरणातील कोलाहल त्यांच्या कॅमेरामननी अतिशय व्यवस्थित टिपला होता. " वाव! मी पाहिलेली ही सर्वात भव्य स्ट्रीट पार्टी आहे." तो सूत्रधार उद्गारला. त्याच्या चेहऱ्यावरचे भारून गेल्याचे भाव स्पष्ट दिसत होते आणि त्या उद्गारांपाठीमागचा त्याचा एक प्रामाणिकपणाही. आपला मराठी भाषिक हिंदूंचा अभिमानबिंदू असलेल्या गणेशोत्सवाला तो स्ट्रीट पार्टी कसं काय म्हणू शकतो? मी मनातून त्याच्यावर फार चिडलो होतो. पण मला जाणवलं तो माझ्यासारखा मराठी नाही आणि हिंदूही नाही. त्याला तसं ह्या उत्सवाशी, देवतेशी फार देणंघेणं नाही. त्याला जे दिसत होते त्यावरून त्याने तो निष्कर्ष काढला त्यात त्याचे काहीच चुकले...

कोकणातील जमीनींचे वाद आणि आर्थिक सामाजिक विकास

नुकतीच एका जमिनीच्या वादामुळे घडलेल्या एका छोट्या गुन्ह्यामुळे मला माझ्या वडिलांसोबत पोलिस स्टेशनमध्ये जाण्याची वेळ आली. आमची तक्रार व्यवस्थित समजुन घेतल्यावर पोलिस निरीक्षक सहज म्हणाले, "हे सर्व आम्हाला आता रोजचंच झालंय. आमच्याकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये आठवड्याला किमान दहा या कुठल्या तरी प्रकारे जमिनीशी संबंधित असतात. बाकी गुन्ह्यांचे प्रमाण इकडे कोकणात तसं फार कमी आहे." ह्या विषयाचं गांभीर्य मात्र यातून सहजच समजतं. साधारण १५ गावांचं कार्यक्षेत्र आणि अंदाजे ६००० राहती कुटंबे जरी पकडली तरी साधे गणित मांडल्यास वर्षाला १०% लोकांना एका वर्षात जमिन वादामुळे पोलिस स्टेशनची पायरी चढायला लागण्यापर्यंत वेळ येते असा अंदाज मांडता येतो. असे असेल तर एकंदरीतच ह्या ग्रामीण परिसरातील सामाजिक तणाव हा प्रचंड मोठाच म्हटला पाहिजे. कोकण म्हटलं म्हणजे बऱ्याचश्या बाहेर राहणाऱ्या शहरातील लोकांच्या डोळ्यांसमोर निसर्गसौंदर्य, चित्रपटात दाखवलेली साधीभोळी माणसे वगैरे वगैरे येत असतं. परंतु असे तीव्र स्वरूपाचे सामाजिक तणाव असू शकतील याची मात्र फारशी कल्पना नसते. मला स्वतःला गावाला स्थायिक होण्यापु...

शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा आणि काही विचार

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा मुद्दा तसा नवीन नाही. नव्वदच्या दशकात हा मुद्दा प्रकाशात आला आणि त्यानंतर माध्यमांच्या व राजकारण्यांच्या अजेंड्यावर राहिला आहे. तरीही तो सुटलेला आहे असे दिसत नाही. असे का? ह्या प्रश्नावर मला काम करण्याची संधी माझ्या सामाजिक क्षेत्रातील कामामुळे मला मिळाली. त्यामुळे मला ह्या विषयाबद्दल विचारही करता आला. हे विचार लिखीत स्वरूपात मांडणे व इतरांबरोबर शेअर करणे महत्वाचे वाटले म्हणून हा ब्लॉग प्रपंच. सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यायला लागेल की सर्वसाधारण शेतकरी हा काही सर्व मानवी भाव भावना व विचारांचे कल्लोळ ह्यांना नियंत्रणामध्ये ठेवू शकणारा स्थितप्रज्ञ योगी नाही. तो ही मर्त्य मानव आहे. आत्महत्या करणारी माणसे अती ताणतणावांखाली जगत असतात आणि ते सहन करण्याची क्षमता जेंव्हा संपते तेंव्हा हे जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे ही मानसिक प्रक्रीया शेतकऱ्यामध्ये आणि शहरी माणसामध्ये काही वेगळी नसते. मग ग्रामीण शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शहरी लोकांच्या आत्महत्या ह्यामध्ये फरक जो आहे तो फक्त सांस्कृतिक आणि भौगोलिक ठरतो जो त्यांच्या जीव...