Posts

Showing posts from June, 2020

कोकणी खाद्यकथा- ३

एका भल्या सकाळी संपर्कात असलेल्या एका जरा सुशिक्षित  आणि सामाजिक कार्यात रस असणाऱ्या माणसाचा फोन आला. “तुम्ही इतके दिवस येताय पण आमचे लोक काही साथ देत नाहीत. पण गावात काहीतरी चांगलं व्हायलाच पाहिजे. आज संध्याकाळी याच. गट स्थापनच करून टाकू. जेवायला आमच्याकडेच या.” “जास्त त्रास करून घेऊ नका.” इति मी. “अहो त्रास कसला आलाय त्यात. आम्ही कोकणातली माणसं तुम्हाला देऊन देऊन काय देणार कुळथाचं पिठलं आणि भात.” “येस. व्हेरी मच लूकिंग फॉरवर्ड टू युवर कुळथाचं पिठलं!” सध्या पुस्तकं वाचून मी मनातल्या मनात इंग्रजी बोलण्याचा आटोकाट सराव करत होतो. आणि तसंही मावशींच्या खानावळीतलं तथाकथित घरगुती फुळकवणी खाऊन आता कायमस्वरूपी कंटाळा आला होता. त्यांच्या घरीच संध्याकाळी मीटींग सुरू झाली. इकडच्या तिकडच्या गप्पा, गावातले लोक जमा होईपर्यंत बराच वेळ गेला होता. रात्रीचे आठ वाजले होते. मीटींग शेवटी सुरू झाली. लोकांना उत्साह चढला होता. बाकीचे लोक कसे साथ देत नाहीत. राजकारण विकासाच्या कसं आड येतं वगैरे गोष्टींना ऊत आला होता. मी त्यांच्या स्वयंपाकघराच्या खिडकीबाहेरच बसलो होतो आणि मला कूकरची शिट्टी ऐकू आली. एकाबाजू...

कोकणी खाद्यकथा- २

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेतोरे नावाचे एक गाव आहे. तिथल्या एका मंगल कार्यालयात जेवणाची पंगत बसली होती. मालकांच्या नातेवाईकांचा एक मुलगा सुट्टीत त्यांच्याकडे आला होता. जेवणात त्या भागात प्रचंड लोकप्रिय असलेली वाटाण्याची रस्सेदार उसळ होती. पंगतीमधले सर्वजण भात आणि उसळ परत परत मागून घेत होते. हा मुलगा उत्साहाने आपल्या काकांच्या मदतीला गेला आणि उसळ वाढायला लागला. “ए! माका वाईच रस्सो दी.” एकाने त्याला जोरात हाक मारून बोलावले. चविष्ट रस्सा आणि वाफाळता भात मस्त लागतोय ह्याचा त्याला साक्षात्कार झाला होता. त्याचं बघून शेजाऱ्याने तसेच केले. समोरचे रस्सा ओरपत आहेत हे बघून विरुध्द रांगेतले लोकही त्याला बोलवू लागले. प्रत्येकाने फक्त रस्साच घेतल्यामुळे शेवटी पातेल्यात वाटाणेच शिल्लक राहिले. तो छोटा मुलगा चिडला आणि जोरात ओरडला, “हो चोथो कोन खातलो?” सगळेजण अवाक झाले. त्याचे काका लगबगीने पंगतीजवळ गेले. “राग मानू नाका हां. ल्हान आसा.” असं सांगून त्यांनी सावरून घेतलं. लोकांना त्याची मजा वाटली. पण त्याचं वाक्य मात्र लक्षात राहिलं. आता जेवताना रस्साच खाल्ला आणि त्यातली डाळ, भाज्या तश्याच राहिल्या किंवा कुठ...

कोकणी खाद्यकथा- १

आमच्या आजीला विस्मरण होत चाललंय. चालणं फिरणं संपलंय. पलंगावर कायम बसून ती त्याच त्याच गोष्टी सांगत राहते कधीही गेलं तरी. त्यामुळे पहिलं वाक्य ऐकलं कि ती पुढे काय सांगणार ते आता माहीत असतं. मे महिन्यात पडवीत फणसाचे गरे तळण्याचा उद्योग चालू असतो. सगळीकडे चुलीच्या धुरामध्ये मिसळलेला गरम खोबरेलाचा, कच्च्या फणसाच्या गऱ्यांचा असा एक संमिश्र वास पसरलेला असतो. आजी सांगायला लागते. “आमच्यावेळी तळलेल्या गऱ्यांचं एवढं फारसं काही (महत्व) नव्हतं. आम्ही कच्च्या फणसाचे गरे वाळवत असू. बरे एकदम असे खडखडीत वाळले की मग जात्यावर दळायचे आणि त्याचं पीठ करून ठेवायचं. श्रावणाचे सगळे उपास मुळी आमचे गऱ्याच्याच पीठावर. मग त्यात हे पीठ जरा तुप घालून भाजून घ्यायचं. गुळ पातळ करून घ्यायचा त्यात हे पीठ घालायचं आणि लाडू वळायचे. फारसं काही नाही. आम्ही त्यात अजुन काही घालत नसू. आधी मुळी काही फारसं नसायचंच त्यात आजच्यासारखे काजू बीजू घालायला. नुसते लाडू नाही हां आम्ही त्याची थालिपीठं पण भाजू. आणि कश्यावर माहितीये?” आजी रंगात आलेली असते. माझ्याकडे हात दाखवत म्हणते, “तुमच्या गोड्या तेलावर नव्हे. रातांबतेलावर. आमच्याकडे मा...