Posts

Showing posts from October, 2021

रोझी

Image
  घरात कुत्रा पाळायचा की नाही ह्याविषयी दुमत होतं. प्राणी पाळायचा म्हटला तर त्याची जबाबदारी आली. मुंबईसारख्या शहरात बराच काळ ब्लॉकमध्ये राहिल्यामुळे आणि पायाला चक्र लावून फिरायची सवय असल्यामुळे मला ती अजिबात नको होती. मुंबईत असताना मला एकदा एक भटका कुत्रा चावल्यापासून प्राण्यांविषयीच काय प्राणीप्रेमी लोकांविषयीही मला फारसं प्रेम नव्हतंच पण भटक्या कुत्र्यांना पार्ले जी ची बिस्कीटं आणि कावळ्यांना शेव चिवडा घालत गावभर फिरणाऱ्या लोकांबद्दल तर माझ्या मनात तीव्र तिटकारा होता. आधीचा मांजरं पाळण्याचा अनुभव घेतल्यानंतर आता प्राण्यांची कौतुकं बस झाली असं माझं स्पष्ट मत होतं. आमच्या घरात कुत्रा पाळायचा अशी विचारधारा असलेल्या पक्षाकडे दोन आणि नाही मत असलेल्या पक्षाकडे तीन असे बलाबल होते त्यामुळे आमचेच सरकार स्थिर आहे असं समजून मी स्वस्थ होतो. आणि ऑगस्ट २०१६ मध्ये ती सरळ घरात आली म्हणजे विरुध्द पक्षाने आमच्या मताला सरळ सरळ ठोकरून तिला आणली. हीच ती रोझी. दोन महिन्यांच्या ह्या पिल्लाचं बारसं त्याच्या जन्मघरातच झालेलं होतं. जिथे कुत्राच नको होता तिथे ही कुत्री घरात आली. म्हणजे आता तिला जेंव्हा प...

पोषणाचा फॉर्म्युला

शाळेत, कॉलेजात पोषणाचे पिरॅमिड त्रिकोण शिकवले जातात. कार्बोहायड्रेट, प्रोटीन इ. चे प्रमाण कसं असावं ते घोकून घेतलं जातं. इंटरनेट, टिव्ही वरून दोन वेळा जेवा की चार वेळा खा ह्याबद्दल सल्ले, चर्चा, वाद झडत असतात. कुठल्या पदार्थांमध्ये कुठले व्हिटॅमीन, मिनरल, अँटी ऑक्सिडंट असतात वगैरे विषयावरून त्यांच्या भरभरून जाहिराती केल्या जात असतात. आणि तरीही ह्या सर्व गदारोळात एका बाजुला सुखवस्तू समाजात लोकांचे कमरेचे घेर वाढत चालले आहेत तर गरीब वर्गात कुपोषणाचं प्रमाण वाढत चाललं आहे. योग्य पोषणाचा काही एखादा सरधोपट फॉर्म्युला कुठे असेल कि ज्यासाठी दररोज किती खाल्लं त्याचं वजन, कॅलरी ह्यांचा ताण न घेता आयुष्य जगता येईल हा प्रश्न मला बरेच दिवस पडतोय.   खरं तर शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात स्वच्छ हवा, पाणी, वनराई वगैरे असल्यामुळे लोकांचं आरोग्य एकदम चांगलं असलं पाहिजे अशी लोकांची अपेक्षा असते परंतु मी जेंव्हा रत्नागिरी जिल्ह्यात आजुबाजूला बघतो तेंव्हा बहुतांश लोक विविध आरोग्याच्या समस्यांनी गांजलेले असतात. इथल्या बऱ्याच स्त्रिया व काही पुरूषही रक्तक्षयाने ग्रासलेले असतात. काम करायची शक्ती आणि ...