Posts

Showing posts from May, 2021

कोकणचं गुणी कार्टं - फणस (भाग १)

Image
आपल्याकडे एक जुनी म्हण आहे. “आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं”. सध्याच्या आधुनिकतेच्या जमान्यात ती म्हण आपल्या अश्या अनेक जुन्या चांगल्या गोष्टींच्या बाबतीत आपण विरूध्द करून वापरत असतो. कोकणातला फणस हे असंच एक स्वतःचं गुणी पण सवतीच्या मुलाप्रमाणे वागवलं जाणारं कार्टं.   कोकणात, प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही फणसाचे वृक्ष लोकांनी तोडले नाहीत म्हणून खुप मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहेत. ह्यातल्या बऱ्याचश्या न तोडण्यामागे पुर्वजांची आठवण हा खुप मोठा भाग असतो. ज्यांच्या आठवणीसाठी हे वृक्ष तोडलेले नाहीत ते सध्याच्या कोकणवासीयांचे पुर्वज अश्याप्रकारे फणसाची लागवड उगीच करत नव्हते आणि मोठाले प्रचंड वृक्ष जीवापाड उगीच जपतही नव्हते. गावातल्या जुन्या जाणत्या लोकांना बोलतं केलं किंवा किमान त्यांच्या जुन्या जमान्याचं कौतुक सांगणाऱ्या, वरकरणी बोअरिंग वाटणाऱ्या गोष्टी नीट लक्ष देऊन ऐकल्या तरी फणस ह्या झाडाचे अनेक अनोखे पैलू समोर येत जातात.   हल्ली आपण अन्नसुरक्षा सरकारी रेशनशी जोडत असतो पण पुर्वीच्या जमान्यात ह्या लोकांनी फणसाचे अन्न सुरक्षेसाठी असलेले महत्...

वेड्या भुलीचे रान

त्याच्या इमेलच्या अवजड अटॅचमेंटचा शेवटचा एमबी अपलोड होऊन अखेर इमेलही सेंड झाला तेंव्हा त्याने सुटकेचा एक दीर्घ सुस्कारा सोडला. रात्रीचे साडेअकरा वाजले होते. तो झोपडीच्या बाहेर आला आणि आपल्या मोटरसायकलवर टांग टाकली. घाईने कीक मारली आणि तो घराकडे निघाला. थोडंसं अंतर पुढे गेल्यानंतर सपाटीवरचा सरळ रस्ता सुरू झाला आणि त्याच्या मोटरसायकलने एकसमान गती पकडली. गेल्या थोडक्या दिवसात अतिशय वेगाने घडत गेलेल्या घटनांचा आलेख त्याच्या मनात आकार घेऊ लागला.   दुसरा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मुंबईत तीन खोल्यांमधल्या आयुष्याला कंटाळलेल्या सुमीतने आणि त्याच्या बायकोने त्यांच्या मुलीसह काही दिवस गावच्या घरात राहण्याचा निर्णय घेतला. कित्येक दिवस बंद असलेले घर उघडून स्थिरस्थावर होईपर्यंत दोन दिवस पूर्ण होत होते तोच त्याच्या भावाचा फोन आला. करोना पॉझिटीव्ह झालेले त्यांचे बाबा अचानक ऑक्सिजन पातळी खाली येऊन निर्वतले होते. नवीन निर्बंधामुळे अंत्यविधीसाठी परत जाण्याचा प्रश्नच नव्हता.   त्यानंतर दोन दिवसांनी अर्जुन नावाचा एक साधारण उंच काटक माणूस त्यांच्या दरवाज्याबाहेर हजर झाला. “तुमचे वडील गेल्य...