Posts

Caring To Create Impressions

I like to observe how people dress and keep themselves. Though it is one of the basic necessities of human life to protect body, wearing clothes and other accessories have become an elaborate art over the centuries. It is an integral part of the human beauty. For women as well as men, when, what and how much do you show and or do not show of your body can give different messages. While this is true in general there are people who don’t care about their dressing in general or at a particular occasion or moment in their life. I always like how people create their impressions through their dressing and body upkeep. I look at those political leaders. They wear those perfectly white kurtas and pyjamas but keep them not so perfectly ironed. If one is from a pro Hindu party, a red tilak on the forehead is found but worn with sharpness not blurred like the one that gets while performing rituals. Does it give the impression for us common folks that they are there with us but almost always a...

देवधर्म आणि घाण, कचरा

काही गोष्टींबद्दल जरा बिचकत, हळू आवाजात, कोणाला ऐकू येईल न येईलसे बोललेले चांगले असते. लिखाणातसुध्दा स्पष्टपणे रोखठोक न लिहीता आपला मुद्दा जरा आडूनच मांडलेला बरा असतो. अश्याच विचाराने चालण्याचे दिवस आहेत. सर्वमान्य आणि लोकप्रिय ते लिहा, वाचा आणि बोला अश्या टायपाचे वडिलकीचे सल्ले सहज फुकट मिळू शकतात आणि त्यासाठी घरातच कोणी मोठे असण्याची गरज नाही. पण जे जाता येता सहज दिसतं त्याच्या बद्दल खूल्या पध्दतीने लिहीले तर वाचायला कोणाचीच ना नसावी. पार्ल्याच्या पुर्व भागात एक पिंपळेश्वर महादेव नावाचं देऊळ आहे. देवळाच्या जवळच दोन पिंपळाचे वृक्ष आहेत. त्यातल्या एका वृक्षाच्या बुंध्याशी अनेक देवाच्या जून्यापान्या तसबीरींची भाऊगर्दी आहे. गणपती, लक्ष्मी, सरस्वती, मारूती असे सर्व देवदेवता सुखेनैव एकमेकांच्या बाजूला बसलेले दिसतात. पण सर्व तसबिरींवर प्रचंड धूळ बसलेली आहे. त्या तसबिरींमध्येच अनेक प्लास्टीक पिशव्यांमध्ये निर्माल्यासारखे दिसणारे बरेच काही भरून ठेवून दिलेले आहे. जुहू्च्या समूद्र किना-याजवळ एक निर्माल्य टाकण्यासाठी सार्वजनिक शौचालयाच्या जवळच एक मंगल कलश ठेवेलेला आहे. ते प्रचंड मोठे प्लास्टीक...

The Moment

--------------------------------------------------------- This is the first ever English story written by me. One might find it too bold by the Indian standards. --------------------------------------------------------- Sameer and Ajit were best friends. When they were attending college they came close to each other due to their common interest in nature. They started to make long walks on the streets of the city identifying plants and birds. They started to visit parks and forest reserves. Their friendship had grown from their common interests to such a point where they had started to share their joys and sorrows. It was relationship of deep understanding and trust. Their class always used to talk about them that these guys see themselves as special as they were always together and never mixed in the group. They finished college; started hunting jobs and eventually entered into them. Their lives changed. With the stress and pressures at the work front, they started to lose on their...

स्वान्त

त्याच्या आयुष्यात रोजच दिवस उगवत होते आणि मावळत होते . परिस्थितीने हतबल झालेल्या त्याने एकदा अखेर तो निर्णय घेतला . दोलायमान मनस्थितीमध्ये दररोज जगणे त्याला असह्य झाले होते . त्याने आपला निर्णय पक्का केला होता . " बस्स संपवायचं सगळं ! दुस - याकडे मदतीसाठी हात पसरत याचकासारखं जगणं मला केवळ अमान्य .” एक ओझे उतरवून भार हलका झाल्यासारखे त्याला वाटले . पण हेही सूख क्षणभंगूर ठरले होते . निर्णय घेतल्यानंतर त्याची जबाबदारीही आली होती . कसे , कुठे , केंव्हा आणि तत्सम प्रश्न सहजासहजी त्याची पाठ सोडणार नव्हते . " बस्स शेवटचंच ! आता नाही चिंता करावी लागणार सारखी , अजून एकदाच आणि मग सगळं संपेलच .” त्याला हसू आले आपल्याच विचारांचे . “ साली इथेही तीच , जगण्याची इच्छा लावणारी आशा , आपल्याला धरून ठेवतेय .” तो पट्टीचा पोहणारा होता . समुद्राने त्याला एकेकाळी वेड लावले होते . तरूणाईत पदार्पण झाल्यानंतर समुद्र त्याला नेहमीच आकृष्ट करत असे . चहूबाजूने बंदीस्त असलेल्या तळ्यापेक्षा त्या असीम समुद्रात दूरवर जाण्यासाठी कित्येकजणांचे डोळे चूकवत जाणे त्याला आवडत असे . त्याने ठरवले , “ आपला शेवट त्याच...

टप्पा

आमच्या आयुष्यात टप्पा कधी आलाच नाही वाट नेमून दिली होती आधीच कोणीतरी त्यावर चालत गेलो जमेल तसे कसेतरी आमच्याकडेही हवे म्हणुन आम्ही शीतकपाट घेतले त्यात ठेवता येते म्हणुन अन्न जास्त शिजवत गेलो ज ास्त झालेल उरले म्हणुन परत त्यात ढकलू लागलो मोकळे बघवत नाहीत म्हणुन भरून काढले कपाटांनी कोपरे खन मोकळे सोडू नयेत म्हणुन सामानान्नी भरली कपाटे आता अशा कपाटान्शी आम्ही रोज थबकतो काय खावे काय घालावे ह्याचा विचार करत बसतो साठवत जातो कचरा घरात, शरीरात आणि मनातही, भाम्बावणा-या प्रश्नांना मिळत नाही उत्तरे. कन्टाळून टीव्ही समोर बसतो. "नवीन वर्ष आले" टीव्ही ओरडतो एकतीस डिसेंबरच्या रात्री फुटकळ विनोदावर हसतो, काटा येताच बारावर हैप्पी न्यू इयर म्हणतो झोपायला मोकळे होतो. दिवस असतो उद्याचा चिंब घामट शरीराचा, चालत्या लोकलमध्ये मारलेल्या सराईत उडीचा असेच जाईल का हे ही वर्ष कुठल्याच टप्प्याशिवाय टप्प्यानन्तर येणा-या उंच उसळीशिवाय मी नाही चेंडू कुणीतरी फेकलेला टप्पा तर माझ्याच हाती असलेला मग थांबावे क्षणभर, अंदाज घ्यावा रस्त्यांचा जपून ठेवलेली स्वप्ने, सत्यात ...

योजना

थांबावे थोडे... असतो आपण सर्वचजण अनंताचे प्रवासी तरीही लागते पाहावे नेहमी वाट जाते कुठेशी थांबावे थोडे... असतात वाटा सगळीकडे सगळीकडून येणा-या जसे मनी येईल तसे सहज घेऊन जाणा-या थांबावे थोडे... करावा लागतो नेहमी विचार कुठली आपली दिशा ठरवून निवडावी लागते तशीच वाट विचार आपला भक्कम करून थांबावे थोडे... मोजून घ्यावी आपली क्षमता कुठवर जाऊ शकतो आपण त्याही पुढे असेल जायचे तर मग काय करावे आपण थांबावे थोडे... आपण आलो जरी एकटे एकटेच संपणार तरीही साथीदार ते प्रवासातले विसर नसावा त्यांचा कधीही थांबावे थोडे... आखावी परिपूर्ण योजना विचार करूनी साकल्याने टाकावे मग निश्चीत पाऊल स्वतःवरच्या त्या विश्वासाने