Posts

The Moment

--------------------------------------------------------- This is the first ever English story written by me. One might find it too bold by the Indian standards. --------------------------------------------------------- Sameer and Ajit were best friends. When they were attending college they came close to each other due to their common interest in nature. They started to make long walks on the streets of the city identifying plants and birds. They started to visit parks and forest reserves. Their friendship had grown from their common interests to such a point where they had started to share their joys and sorrows. It was relationship of deep understanding and trust. Their class always used to talk about them that these guys see themselves as special as they were always together and never mixed in the group. They finished college; started hunting jobs and eventually entered into them. Their lives changed. With the stress and pressures at the work front, they started to lose on their...

स्वान्त

त्याच्या आयुष्यात रोजच दिवस उगवत होते आणि मावळत होते . परिस्थितीने हतबल झालेल्या त्याने एकदा अखेर तो निर्णय घेतला . दोलायमान मनस्थितीमध्ये दररोज जगणे त्याला असह्य झाले होते . त्याने आपला निर्णय पक्का केला होता . " बस्स संपवायचं सगळं ! दुस - याकडे मदतीसाठी हात पसरत याचकासारखं जगणं मला केवळ अमान्य .” एक ओझे उतरवून भार हलका झाल्यासारखे त्याला वाटले . पण हेही सूख क्षणभंगूर ठरले होते . निर्णय घेतल्यानंतर त्याची जबाबदारीही आली होती . कसे , कुठे , केंव्हा आणि तत्सम प्रश्न सहजासहजी त्याची पाठ सोडणार नव्हते . " बस्स शेवटचंच ! आता नाही चिंता करावी लागणार सारखी , अजून एकदाच आणि मग सगळं संपेलच .” त्याला हसू आले आपल्याच विचारांचे . “ साली इथेही तीच , जगण्याची इच्छा लावणारी आशा , आपल्याला धरून ठेवतेय .” तो पट्टीचा पोहणारा होता . समुद्राने त्याला एकेकाळी वेड लावले होते . तरूणाईत पदार्पण झाल्यानंतर समुद्र त्याला नेहमीच आकृष्ट करत असे . चहूबाजूने बंदीस्त असलेल्या तळ्यापेक्षा त्या असीम समुद्रात दूरवर जाण्यासाठी कित्येकजणांचे डोळे चूकवत जाणे त्याला आवडत असे . त्याने ठरवले , “ आपला शेवट त्याच...

टप्पा

आमच्या आयुष्यात टप्पा कधी आलाच नाही वाट नेमून दिली होती आधीच कोणीतरी त्यावर चालत गेलो जमेल तसे कसेतरी आमच्याकडेही हवे म्हणुन आम्ही शीतकपाट घेतले त्यात ठेवता येते म्हणुन अन्न जास्त शिजवत गेलो ज ास्त झालेल उरले म्हणुन परत त्यात ढकलू लागलो मोकळे बघवत नाहीत म्हणुन भरून काढले कपाटांनी कोपरे खन मोकळे सोडू नयेत म्हणुन सामानान्नी भरली कपाटे आता अशा कपाटान्शी आम्ही रोज थबकतो काय खावे काय घालावे ह्याचा विचार करत बसतो साठवत जातो कचरा घरात, शरीरात आणि मनातही, भाम्बावणा-या प्रश्नांना मिळत नाही उत्तरे. कन्टाळून टीव्ही समोर बसतो. "नवीन वर्ष आले" टीव्ही ओरडतो एकतीस डिसेंबरच्या रात्री फुटकळ विनोदावर हसतो, काटा येताच बारावर हैप्पी न्यू इयर म्हणतो झोपायला मोकळे होतो. दिवस असतो उद्याचा चिंब घामट शरीराचा, चालत्या लोकलमध्ये मारलेल्या सराईत उडीचा असेच जाईल का हे ही वर्ष कुठल्याच टप्प्याशिवाय टप्प्यानन्तर येणा-या उंच उसळीशिवाय मी नाही चेंडू कुणीतरी फेकलेला टप्पा तर माझ्याच हाती असलेला मग थांबावे क्षणभर, अंदाज घ्यावा रस्त्यांचा जपून ठेवलेली स्वप्ने, सत्यात ...

योजना

थांबावे थोडे... असतो आपण सर्वचजण अनंताचे प्रवासी तरीही लागते पाहावे नेहमी वाट जाते कुठेशी थांबावे थोडे... असतात वाटा सगळीकडे सगळीकडून येणा-या जसे मनी येईल तसे सहज घेऊन जाणा-या थांबावे थोडे... करावा लागतो नेहमी विचार कुठली आपली दिशा ठरवून निवडावी लागते तशीच वाट विचार आपला भक्कम करून थांबावे थोडे... मोजून घ्यावी आपली क्षमता कुठवर जाऊ शकतो आपण त्याही पुढे असेल जायचे तर मग काय करावे आपण थांबावे थोडे... आपण आलो जरी एकटे एकटेच संपणार तरीही साथीदार ते प्रवासातले विसर नसावा त्यांचा कधीही थांबावे थोडे... आखावी परिपूर्ण योजना विचार करूनी साकल्याने टाकावे मग निश्चीत पाऊल स्वतःवरच्या त्या विश्वासाने