Posts

Showing posts from February, 2024

आरक्षण, शिक्षण, रोजगार

 #puttingdownthoughts महाराष्ट्रातील नोकरी व शिक्षणातील आरक्षणमर्यादा काही दिवसांपुर्वी पास झालेल्या अधिनियमानुसार आता पुर्वीच्या ५२ टक्क्यांच्या वर गेली आहे. आरक्षण मिळालं तर आपले सर्व प्रश्न सुटतात असं समाजातील खुप मोठ्या वर्गाला वाटत असतं. त्यामुळे तो एक सत्ताकारणाचा विषय झालेला आहे. सध्याचं मराठा आंदोलन आणि त्यावरील सर्व बाजूची चर्चा भाषणं पाहिली तर असं वाटत राहतं की आरक्षित नोकऱ्या, संधी हे एका मर्यादीत संख्येत आहेत आणि त्या मिळवण्यासाठी सर्वत्र झुंबड उडाली आहे. विविध जातीसमूह हे मर्यादीत गाठोडं आपल्याकडेच कसं मिळवता येईल किंवा आहे त्यापैकी आपल्याकडेच कसे अबाधित राहील ह्याविषयी भांडत आहेत. प्रत्येकाला आपापल्या ’सग्यासोयऱ्यांची’ चिंता भेडसावत आहे.  तेंव्हा मनात आलं की आपणही आपल्या सग्यासोयऱ्यांच्या विषयी किमान विचार तरी करावा. तो विचार करता करता प्रत्यक्षात असं जाणवलं की ते विचार आपल्या खुल्या प्रवर्गातील तथाकथित साडेतीन टक्क्यामधल्या (प्रत्यक्षात दोन टक्केच असतील असं वाटतंय कारण लोकसंख्या प्रचंड कमी झाली आहे गेल्या दोन दशकात,) सग्यासोयऱ्यांपुरते मर्यादीत राहत नाहीत तर भार...