Posts

Showing posts from December, 2023

रत्नागिरी जिल्ह्यातील आत्महत्या

  21-12-2023 साधारण दोन वर्षांपुर्वी सलग दोन तीन महिन्यात आजुबाजुच्या परिसरातुन आत्महत्यांच्या घटना एकामागोमाग ऐकिवात आल्या आणि एक विषय मनात चाळवला गेला. मी पुर्वी टाटा ट्रस्ट मध्ये नोकरी करत असताना विदर्भातील शेतकरी आत्महत्या ह्या विषयाशी संबंध आला होता आणि आपला परिसरही एखाद्या मानसिक महामारीच्या कडेलोटावर तर नाही ना अशी शंका मनाला चाटून गेली होती. साधारण विदर्भातील बऱ्याचश्या केसेस मध्यमवयीन पुरूष शेतकऱ्यांच्या होत्या. ज्यामध्ये शेतीचे कोसळलेले आर्थिक गणित आणि कुटूंबातील वाढते खर्च ह्यांचा ताळमेळ बसत नसल्याने होत असलेल्या ओढाताणीचे पर्यवसान आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यात होत होते. परंतु रत्नागिरीच्या परिसरातील ज्या केस ऐकल्या होत्या त्या सर्व तरूणांच्या होत्या. नेमके काय होत आहे ह्याची अधिक जाण व्हावी ह्यासाठी आमच्याकडील एका स्थानिक वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्या गेले पन्नास दिवस पाहत गेलो आणि काही निश्चित कल म्हणता येतील असे लक्षात आले. गेल्या पन्नास दिवसात रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत घडलेल्या १३ आत्महत्यांची नोंद मिळाली. त्यामध्ये १८-३० ह्या वयोगटामध्ये ५ होत्या तर ३१-६०...