Posts

Showing posts from April, 2018

बदललेल्या पार्ल्याच्या निमित्ताने

मी मुंबईकर आहे पण पक्का नाही. मी मुंबईत वाढलो परंतु माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी हे शहर सोडले आणि तरीही मुंबईचे माझे आकर्षण आणि प्रेम तसेच आहे. ह्या शहराचा आत्यंतिक अभिमान मला कधी वाटला नाही तरीही मला येथे परत परत यावेसे वाटते. कदाचित त्याच ओढीने मी हा लेख लिहितोय. माझ्या आजोबा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गावाकडून आंबे, आंबापोळी, फणसपोळी, तळलेले गरे इ वस्तू ते आणत असत. त्याच्या पार्ल्यातल्या डिलिव्हरीचे काम आम्हा नातवंडांकडे लागलेले असायचे. ते करता करता पार्ल्याच्या रस्त्यांवरून वाट मिळेल तसे भटकणे हा माझा छंदच झाला. माझे मित्रही असेच पायी भटकणारे मिळाले असावेत त्यामुळे बहुदा. पार्ल्यात आलो की मी एकदा तरी भटकून येतोच. तीस वर्षापुर्वी रस्त्यावरून चालताना झाडांवरची जांभळे खाता येत होती. दारावर फेरीवाले, दिवाळीला उटणं विकणारे काका अगदी सहज येत होते. मी ज्या पुर्व पार्ल्यात वाढलो तो बहुतांशी सुशिक्षित मध्यमवर्गीय मराठी भाग होता. शासकीय नोकऱ्या करत आपल्या शांतताप्रियतेच्या कोशात जगत राहणारी कुटंबे येथे स्थिरावली होती. आमच्यावर संस्कार करण्याचे ध्येय असणाऱ्या शाळा आणि व्यायामशाळा होत...