Posts

Showing posts from March, 2024

खाणे पिणे अनपेक्षित वर्धा विशेष

Image
खाणे हि माझी आवड असली तरी त्यामागे माझा विचार जगण्यासाठी खावे असाच असतो. त्यामुळे चांगले जगण्यासाठी चांगले खायला मिळावे अशी अपेक्षा जीवनात असते. दुसऱ्यांनी टाकलेले फोटो किंवा व्हिडीओ बघून तो पदार्थ कधीतरी एकदा खायला हवा आणि त्याच्यासाठी आपण वणवण फिरत बसावे असे कधी वाटत नाही. जे काही समयानुसार अन्न पुढे येते, ते जे अनुभव देते त्याचा आधीच त्यामुळे मानसिक स्वीकार केलेला असतो. परंतु माझ्या कामानिमीत्त होत असलेल्या प्रवासामुळे ह्या खाद्यसंस्कृतीच्या विविधतेने नटलेल्या देशाचे वेगवेगळे पैलू अनुभवायला मिळत असतात हे माझे एक अहोभाग्यच म्हणायला हवे. आपण ज्याठिकाणी गेलेलो असतो तिथे खाणे शोधण्यापेक्षा त्या दिवसाचे निश्चित केलेले काम पुर्ण करण्याचे लक्ष्य असल्यामुळे जेवण हा विषय तसा दुय्यम असतो. जे मिळेल त्याला नावे न ठेवता भुक भागवणे ह्या उद्देशाला प्राधान्य असते. त्यामुळे रात्री तरी चांगले आपल्याला हवे तसे खायला मिळावे, स्थानिक प्रकारच्या जेवणाचा स्वाद घ्यायला मिळावा अशी साधी अपेक्षा असते. पण तेही बहुतांश वेळा नशिबात नसते कारण बरीचशी राहण्याची हॉटेले आणि त्याला जोडलेली रेस्टॉरंट ह्यामध्ये मिळणारे ...