Posts

Showing posts from January, 2016

शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा आणि काही विचार

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा मुद्दा तसा नवीन नाही. नव्वदच्या दशकात हा मुद्दा प्रकाशात आला आणि त्यानंतर माध्यमांच्या व राजकारण्यांच्या अजेंड्यावर राहिला आहे. तरीही तो सुटलेला आहे असे दिसत नाही. असे का? ह्या प्रश्नावर मला काम करण्याची संधी माझ्या सामाजिक क्षेत्रातील कामामुळे मला मिळाली. त्यामुळे मला ह्या विषयाबद्दल विचारही करता आला. हे विचार लिखीत स्वरूपात मांडणे व इतरांबरोबर शेअर करणे महत्वाचे वाटले म्हणून हा ब्लॉग प्रपंच. सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यायला लागेल की सर्वसाधारण शेतकरी हा काही सर्व मानवी भाव भावना व विचारांचे कल्लोळ ह्यांना नियंत्रणामध्ये ठेवू शकणारा स्थितप्रज्ञ योगी नाही. तो ही मर्त्य मानव आहे. आत्महत्या करणारी माणसे अती ताणतणावांखाली जगत असतात आणि ते सहन करण्याची क्षमता जेंव्हा संपते तेंव्हा हे जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे ही मानसिक प्रक्रीया शेतकऱ्यामध्ये आणि शहरी माणसामध्ये काही वेगळी नसते. मग ग्रामीण शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शहरी लोकांच्या आत्महत्या ह्यामध्ये फरक जो आहे तो फक्त सांस्कृतिक आणि भौगोलिक ठरतो जो त्यांच्या जीव...