Posts

Showing posts from September, 2013

देवा श्री गणेशा

“थॅंक गॉड, मी मुंबईच्या बाहेर आहे.” एखाद्या माझ्यासारख्या नास्तिकतेच्या जवळ जाणारे विचार असलेल्या माणसाच्या तोंडातून हे शब्द ऐकून माझ्या आजुबाजूच्या आस्तिकांना अत्यानंद झाल्याशिवाय राहणार नाही. पण हे शब्द सहजच तोंडी येतात. हे सांस्कृतिक आहे, वैचारीक आणि मानसिक नाही. हे माझ्या मनातले विचार माझा गणेशोत्सवादरम्यान काहीतरी दिवस जिथे गोंगाटापासून दूर राहताना होणारा आनंद दर्शवणारे आहेत. “मुंबई मुलतः मराठी माणसाची आहे आणि इथे मराठी भाषेलाच प्राधान्य मिळाले पाहीजे,” इ विचारांपासून मी दूर गेलो नसलो तरी ज्या पध्दतीने इथे आम मराठी जनता तिचे मराठीपण जपण्याचा प्रयत्न करत आहे त्याचे गणेशोत्सव हे उत्तम निदर्शक आहे. हे निदर्शक मला सांस्कृतिक अवनती होत असल्याचे जाणवून देत आहे. दोन वर्षांपुर्वी एका प्रवास विषयक इंग्रजी वाहिनीवर एक अमेरीकन सूत्रधार मुंबईचा गणेशोत्सव सादर करत होता. त्याचे सुरूवातीचे वाक्य माझ्या कायमचे लक्षात राहीले आहे. तो म्हणाला होता, “ही मी बघितलेली जगातली सगळ्यात मोठी स्ट्रीट पार्टी आहे.” ज्या गोष्टी पाश्चात्य जगामध्ये एका बंद खोलीत आम जनतेला त्रास न होता केल्या जातात त्या येथे धर्...