Posts

Showing posts from May, 2010

स्वान्त

त्याच्या आयुष्यात रोजच दिवस उगवत होते आणि मावळत होते . परिस्थितीने हतबल झालेल्या त्याने एकदा अखेर तो निर्णय घेतला . दोलायमान मनस्थितीमध्ये दररोज जगणे त्याला असह्य झाले होते . त्याने आपला निर्णय पक्का केला होता . " बस्स संपवायचं सगळं ! दुस - याकडे मदतीसाठी हात पसरत याचकासारखं जगणं मला केवळ अमान्य .” एक ओझे उतरवून भार हलका झाल्यासारखे त्याला वाटले . पण हेही सूख क्षणभंगूर ठरले होते . निर्णय घेतल्यानंतर त्याची जबाबदारीही आली होती . कसे , कुठे , केंव्हा आणि तत्सम प्रश्न सहजासहजी त्याची पाठ सोडणार नव्हते . " बस्स शेवटचंच ! आता नाही चिंता करावी लागणार सारखी , अजून एकदाच आणि मग सगळं संपेलच .” त्याला हसू आले आपल्याच विचारांचे . “ साली इथेही तीच , जगण्याची इच्छा लावणारी आशा , आपल्याला धरून ठेवतेय .” तो पट्टीचा पोहणारा होता . समुद्राने त्याला एकेकाळी वेड लावले होते . तरूणाईत पदार्पण झाल्यानंतर समुद्र त्याला नेहमीच आकृष्ट करत असे . चहूबाजूने बंदीस्त असलेल्या तळ्यापेक्षा त्या असीम समुद्रात दूरवर जाण्यासाठी कित्येकजणांचे डोळे चूकवत जाणे त्याला आवडत असे . त्याने ठरवले , “ आपला शेवट त्याच...