Posts

#puttingdownthoughts About Community Based Organisations

#puttingdownthoughts My first job involved formation of some Community Based Organisations. The project, under which it was being done, stopped abruptly as the funding dried up. The concerned agencies stopped working, the staff, myself including, moved to some other organisations and the registered CBOs remained there blank, without any plan or activity. I remember the person from the office of the registrar of the co-operative societies was telling me once in his authoritative tone, “I am registering them only because they (applications) are coming along with a letter from a government department. If they don’t show any activity in the coming three years he was going to deregister them.” I was doing my job by bringing in my passion and with a strong belief that it was changing the life of the farmers in a great way. As I spent more time doing my job, I realised that that was not going to sustain for long. A few years later, the person from the registrar office was proved right.

खाणे पिणे अनपेक्षित वर्धा विशेष

Image
खाणे हि माझी आवड असली तरी त्यामागे माझा विचार जगण्यासाठी खावे असाच असतो. त्यामुळे चांगले जगण्यासाठी चांगले खायला मिळावे अशी अपेक्षा जीवनात असते. दुसऱ्यांनी टाकलेले फोटो किंवा व्हिडीओ बघून तो पदार्थ कधीतरी एकदा खायला हवा आणि त्याच्यासाठी आपण वणवण फिरत बसावे असे कधी वाटत नाही. जे काही समयानुसार अन्न पुढे येते, ते जे अनुभव देते त्याचा आधीच त्यामुळे मानसिक स्वीकार केलेला असतो. परंतु माझ्या कामानिमीत्त होत असलेल्या प्रवासामुळे ह्या खाद्यसंस्कृतीच्या विविधतेने नटलेल्या देशाचे वेगवेगळे पैलू अनुभवायला मिळत असतात हे माझे एक अहोभाग्यच म्हणायला हवे. आपण ज्याठिकाणी गेलेलो असतो तिथे खाणे शोधण्यापेक्षा त्या दिवसाचे निश्चित केलेले काम पुर्ण करण्याचे लक्ष्य असल्यामुळे जेवण हा विषय तसा दुय्यम असतो. जे मिळेल त्याला नावे न ठेवता भुक भागवणे ह्या उद्देशाला प्राधान्य असते. त्यामुळे रात्री तरी चांगले आपल्याला हवे तसे खायला मिळावे, स्थानिक प्रकारच्या जेवणाचा स्वाद घ्यायला मिळावा अशी साधी अपेक्षा असते. पण तेही बहुतांश वेळा नशिबात नसते कारण बरीचशी राहण्याची हॉटेले आणि त्याला जोडलेली रेस्टॉरंट ह्यामध्ये मिळणारे

आरक्षण, शिक्षण, रोजगार

 #puttingdownthoughts महाराष्ट्रातील नोकरी व शिक्षणातील आरक्षणमर्यादा काही दिवसांपुर्वी पास झालेल्या अधिनियमानुसार आता पुर्वीच्या ५२ टक्क्यांच्या वर गेली आहे. आरक्षण मिळालं तर आपले सर्व प्रश्न सुटतात असं समाजातील खुप मोठ्या वर्गाला वाटत असतं. त्यामुळे तो एक सत्ताकारणाचा विषय झालेला आहे. सध्याचं मराठा आंदोलन आणि त्यावरील सर्व बाजूची चर्चा भाषणं पाहिली तर असं वाटत राहतं की आरक्षित नोकऱ्या, संधी हे एका मर्यादीत संख्येत आहेत आणि त्या मिळवण्यासाठी सर्वत्र झुंबड उडाली आहे. विविध जातीसमूह हे मर्यादीत गाठोडं आपल्याकडेच कसं मिळवता येईल किंवा आहे त्यापैकी आपल्याकडेच कसे अबाधित राहील ह्याविषयी भांडत आहेत. प्रत्येकाला आपापल्या ’सग्यासोयऱ्यांची’ चिंता भेडसावत आहे.  तेंव्हा मनात आलं की आपणही आपल्या सग्यासोयऱ्यांच्या विषयी किमान विचार तरी करावा. तो विचार करता करता प्रत्यक्षात असं जाणवलं की ते विचार आपल्या खुल्या प्रवर्गातील तथाकथित साडेतीन टक्क्यामधल्या (प्रत्यक्षात दोन टक्केच असतील असं वाटतंय कारण लोकसंख्या प्रचंड कमी झाली आहे गेल्या दोन दशकात,) सग्यासोयऱ्यांपुरते मर्यादीत राहत नाहीत तर भारतातील कुठ

रत्नागिरी जिल्ह्यातील आत्महत्या

  21-12-2023 साधारण दोन वर्षांपुर्वी सलग दोन तीन महिन्यात आजुबाजुच्या परिसरातुन आत्महत्यांच्या घटना एकामागोमाग ऐकिवात आल्या आणि एक विषय मनात चाळवला गेला. मी पुर्वी टाटा ट्रस्ट मध्ये नोकरी करत असताना विदर्भातील शेतकरी आत्महत्या ह्या विषयाशी संबंध आला होता आणि आपला परिसरही एखाद्या मानसिक महामारीच्या कडेलोटावर तर नाही ना अशी शंका मनाला चाटून गेली होती. साधारण विदर्भातील बऱ्याचश्या केसेस मध्यमवयीन पुरूष शेतकऱ्यांच्या होत्या. ज्यामध्ये शेतीचे कोसळलेले आर्थिक गणित आणि कुटूंबातील वाढते खर्च ह्यांचा ताळमेळ बसत नसल्याने होत असलेल्या ओढाताणीचे पर्यवसान आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यात होत होते. परंतु रत्नागिरीच्या परिसरातील ज्या केस ऐकल्या होत्या त्या सर्व तरूणांच्या होत्या. नेमके काय होत आहे ह्याची अधिक जाण व्हावी ह्यासाठी आमच्याकडील एका स्थानिक वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्या गेले पन्नास दिवस पाहत गेलो आणि काही निश्चित कल म्हणता येतील असे लक्षात आले. गेल्या पन्नास दिवसात रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत घडलेल्या १३ आत्महत्यांची नोंद मिळाली. त्यामध्ये १८-३० ह्या वयोगटामध्ये ५ होत्या तर ३१-६० ह्य

ग. म.

Image
  कोकणातील ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृती भारताच्या इतर ग्रामीण भागातील लोकांप्रमाणेच साधी सोपी सरळ आहे. बहुतांश कोकणातल्या बाहेरच्या लोकांचा समज असतो तसा इथला ब्राह्मण समाज पांढरपेशा नाही तर शेती बागायतीची श्रमाची कामे करणारा आहे. प्रत्येक जातीची जशी स्वतःची खाद्य परंपरा ( cuisine ) विकसित झालेली आहे तशी इकडच्या ब्राह्मण समाजाचीही आहे. तिखट, मसाले, कांदा, लसूण, तेल ह्या घटकांचा कमीत कमी वापर ही त्याची पहिली ओळख आहे. तांदुळ, खोबरे ह्या दोन स्थानिक घटकांचा वापर जेवणात अपरिहार्यपणे असणे ही अर्थात त्याची दुसरी ओळख आहे. अर्थात मग त्यात पोटओळखी ही असतात विविध तालुके, जिल्हे, पोटजातींच्या अनुसार पण इथे सांगितलेले दोन मुद्दे किमान समान प्रकारचे असतात. ब्राह्मणी भोजन ह्या नावाखाली बऱ्याचवेळा पेशवाईतला थाट, लग्नातल्या पंगती वगैरे गोष्टींची चर्चा घडत असते पण गावात उपजीविकेसाठी चार पाच आघाड्यांवर धावणाऱ्या, संयुक्त मोठ्या कुटूंबांमध्ये राहणाऱ्या समाजाला ही दहा बारा किचकट पदार्थांची गुंतागुंत रांधणे आणि खाणे परवडत नाही. हि पदार्थांची गुंतागुंत सण, उत्सव, लग्न, मुंज अश्या क्वचित प्रसंगीच असते. त्य

अट्टहास टोमॅटोचा

साधारण असाच जुन किंवा जुलै महिना होता २०१२ सालचा. मराठवाड्याचा अजुन एक भीषण दुष्काळ पाहून झाला होता. अश्या कठीण परिस्थितीत पाण्याशी संबंधित नाविन्यपुर्ण पध्दतीने काम करणाऱ्या श्री. मधुकर धस ह्यांच्यासोबत मी त्यांनी काम केलेल्या जालना जिल्ह्यातील काही गावात फिरत होतो. एक पाणीदार माणूस म्हणून मधुकर भाउंची ओळख होती च पण त्यांची एक नवीनच बाजू मला फिरताना समजून आली. नुकत्याच दुष्काळाने तापून निघालेल्या माळरानावर नव्याने पडलेल्या पावसाने फक्त गवतच नव्हे आणि अनेकविध वनस्पती उगवून आल्या होत्या आणि मधुकरभाऊ मला अनेक वनस्पतींची माहिती आणि उपयोग सांगत होते. त्यातल्या जवळजवळ १०-१२ वनस्पती अश्या होत्या कि ज्यांचा भाजी म्हणून आहारात सहज उपयोग करता येण्यासारखा होता. मेंढपाळ कुटूबात जन्मलेल्या आणि रानामध्ये मेंढ्या चारण्यात बालपण गेले ल्या मधुकरभाऊंसारखं अनुभवसिध्द ज्ञान ज्यांच्याकडे आहे आणि जे त्याचा जीवनात उपयोग करू शकतात त्यांना टोमॅटोची किंमत १०० रुपये किलोपेक्षा जास्त झाली तरी काही फरक पडणार नाही. ज्यांना फरक पडतो ते सर्व लोक आज चिंतेमध्ये आहेत. ह्या किंमती खाली उतराव्या जेणेकरून लोक रस्त्यावर

Consistency Compounded

Typically every person in this world does not listen to each and every thing our parents tell us to do. If people were doing only that then world will not have changed in anyway. But then there are certain things, which these modern day business or fitness gurus wont tell you and not even your friends and colleagues. If your parents have told you the thing which I have now written about, then there is a high chance you might have overlooked or brushed it aside like I did in my youthful times.  While you have been watching or listening to podcasts on YouTube, a lot of advertisements of random self-proclaimed life gurus pop up. All try to sell you their training courses, online seminars on how to become smart, to have passive incomes, to have multiple incomes, to get out of your boring jobs and many more such subjects. Nobody tries to sell you the virtue of consistency. So I thought I would just write about it and share it silently reminding that one important thing our parents were remi